प्रकरण ४. आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य

आपण मागील प्रकरणात मानवनिर्मित तसेच नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास केला. आपत्ती व्यवस्थापनाचेकार्य अनेक घटक करीत असतात. या प्रकरणात आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराच्या कार्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलेआहे.

नैसर्गिक आपत्तींचे राष्ट्रीय सुरक्षिततेवर होणारे परिणाम

आपत्तींमुळेजीवित, वित्त, स्थावर हानी होते. त्याचबरोबर सामाजिक व आर्थिक समस्या निर्माण होतात. त्याचे राष्ट्रीय सुरक्षिततेवरदेखील विपरीत परिणाम होतात. त्या संदर्भात काही उदाहरणे दिली आहेत.

१. भूकंप : २००१ मध्ये गुजरातमधील भूकंपाने हवाईदल तसेच लष्कराच्या केंद्रांची नासधूस झाली होती. सिक्कीममधील भूकंपानेभूस्खलन होऊन दळणवळणावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळेलष्कराला साधनसामग्री पुरवण्यात अडचणी आल्या तसेच सैन्यदलाच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

२. ढगफुटी : लडाख, विशेषत: लेहमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आणि सैन्याला साधन सामग्री पुरवण्यात अडचण आली होती.

३. चक्रीवादळ : ओडिशातील चक्रीवादळाचा तडाखा भारताच्या नौदलाच्या तळांना बसला होता.

४. त्सुनामी : डिसेंबर २००४ च्या त्सुनामीनेविशाखापट्टणम् व अंदमान निकोबार येथील नाविक दलांचेनुकसान झाले. तसेच अंदमान निकोबारमधील हवाई दलाच्या तळाला व धावपट्टीला हानी पोचली होती. ज्यामुळेकाही दिवस तेथील कार्य बंद पडले होते.

 ५. पूर : केदारनाथ येथील पुरामुळेदळणवळणाला फटका बसला. त्यामुळे हिमालयाच्या मध्य भागातील तसेच चीन लगतच्या सीमा क्षेत्राकडेसाधनसामग्री पोहोचवण्यास अडचण निर्माण झाली होती.

 ६. आग : आगीमुळेलष्कराच्या राखून ठेवलेल्या दारूगोळा साठ्यांचेनुकसान झालेआहे.

७. सागरी आपत्ती : नौदलाच्या पाणबुडीला लागलेल्या आगीमुळे व त्यामुळेझालेल्या स्फोटांमुळेभारताला २०१३ मध्ये एक पाणबुडी गमवावी लागली.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (National Disaster Management Authority)

नैसर्गिक आपत्तींचेएकूण व्यवस्थापन, प्रतिसाद आणि मदतीबाबत समन्वय करण्याची प्राथमिक जबाबदारी ही केंद्र सरकारच्या गृह खात्याची असते. पंतप्रधान हेराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचेअध्यक्ष असतात तर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख हेत्या त्या राज्याचे मुख्यमंत्री असतात. ह्या संघटना भारतातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्य करतात. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींना सामोरेजाण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची National Disaster Response Force (NDRF) निर्मिती केली गेली आहे.

सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा पोलीस आणि सशस्त्र सीमा दलांचे सैन्यदल NDRF मध्ये घेतले गेलेआहे. त्यातील प्रत्येक बटालियनमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञ, इलेक्ट्रिशियन, श्वान पथक आणि वैद्यकीय विशेषज्ञांचा समावेश केला जातो. त्यांना रासायनिक, जैविक, रेडिओलॅाजिकल आणि आण्विक आपत्तींना सामोरेजाण्याचेप्रशिक्षण दिलेलेअसते. भारतातील संवेदनाक्षम क्षेत्राचा आराखडा तयार करून, आपत्तीच्या ठिकाणी त्वरित पोचता येऊ शकेल अशा हेतूनेNDRF च्या बटालियन्स १२ ठिकाणी स्थापित केल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापनात लष्कराची जबाबदारी व कार्य

एखाद्या संकटामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी जशी NDRF ची प्राथमिक जबाबदारी असते, तसेच त्या
समस्येला सामोरेजाण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकारात असलेल्या लष्करालादेखील पाचारण केलेजाते. लष्कर हे कार्य नागरी व्यवस्थेला केलेली मदत या नावाखाली करते. राष्ट्राच्या जनतेची, त्याच्या साधन-संपत्ती आणि राष्ट्रहिताची
नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीपासून सुरक्षा करणे हेतेकार्य असते.

हेकार्य सुकर होण्यासाठी संपूर्ण राष्ट्राची कार्यात्मक अधिकारक्षेत्रात आखणी करून युद्धकालीन तसेच शांततेच्या काळात आपत्तींना सामोरेजाण्यासाठी नियोजन केलेगेलेआहे. साधनांची उपलब्धता, उच्च प्रतीची शिस्त व प्रशिक्षण आणि प्रतिसाद देणारी संघटना यामुळेआपत्ती व्यवस्थापनात लष्कर सक्षमतेनेकार्य करू शकते. सरकारद्वारेआपत्ती व्यवस्थापनात शेवटचा पर्याय म्हणून लष्कराला पाचारण केलेजाते.

लष्कराचेकार्य हेतीन टप्प्यात असते. (१) आपत्ती येण्यापूर्वी करण्याचे नियोजन (२) संकटाची आगाऊ वार्ता मिळाल्यानंतर करण्याची तयारी (३) आपत्ती आल्यानंतरचे कार्य

१. आपत्ती पूर्वीचा टप्पा

ह्या टप्प्यात संभाव्य आपत्तीला सामोरेजाण्यासाठी नियोजन केलेजाते. नियोजनात प्रामुख्यानेखालील गोष्टींचा समावेश करता येतो.

  • संभाव्य धोक्यांचेअवलोकन
  • भौगोलिक माहिती प्रणालीचा (GIS) वापर करून नकाशांचेनूतनीकरण
  • लष्करी व नागरी वस्त्यांदरम्यानच्या दळणवळणाच्या साधनांची तपासणी.
  • साधन सामग्रींची तळे, हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी लागणारी जागा व सोयी यांबाबत निर्णय घेणे.
  • आकस्मित येणाऱ्या समस्यांसाठी नियोजन करणे.

२. संकटवार्तेचा टप्पा

संभाव्य धोक्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतरचा हा टप्पा आहे. ही पूर्वसूचना पूर, चक्रीवादळ, त्सुनामी इत्यादींबाबत असूशकते. जर नागरी व्यवस्थेला असे वाटलेकी संभाव्य धोका फार मोठा असण्याची शक्यता आहेतर तेलष्कराला ह्याबाबत जागरूक करतात. यामुळेलष्कर त्या धोक्याला सामोरेजाण्याच्या तयारीत राहू शकते. मग लष्कर दळणवळणाची साधनेव्यवस्थित चालूअसल्याची व योग्य साधनसामग्री एकत्रित असल्याची खात्री करते.

३. आपत्तीनंतरचा प्रतिसाद

आपत्ती निर्माण झाली की लष्कर खालील कार्य करते.

  • जेलोक आपत्तीत सापडलेआहेत त्यांचा शोध घेणे व त्यांना वाचवणे.
  • वाचवलेल्या लोकांचे, तसेच ज्यांना धोका असेल त्यांचेस्थलांतर करणेआणि त्यांच्या निवाऱ्याची सोय निर्माण करणे.
  • अत्यावश्यक साधन सामग्री, खाद्य (भोजन) सामग्री, वैद्यकीय मदत पुरवणे.

 स्थलसेना, नौसेना तसेच वायुसेना गरजेनुसार हे कार्य पार पाडतात. उदाहरणार्थ नौदल समुद्रात किंवा पूरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी कार्य करू शकते, हेलिकॉप्टरद्वारे वायुसेना आपत्तीत अडकलेल्यांची सुटका करू शकते, किंवा विमानाद्वारे वैद्यकीय मदत, अन्नाची पाकीटेपुरवूशकतेआणि निवारा तसेच जिथेस्थानिक पातळीवर दंगे किंवा हिंसाचार चालूअसेल तेथेस्थल सेना लष्कर तैनात करू शकते.

लष्कराचे आपत्ती व्यवस्थापनातील कार्य संक्षिप्तपणे

१. अधिकार क्षेत्र आणि नियंत्रण – संकटादरम्यान मदतीसाठी संयोजन व नियंत्रण करण्यासाठी एक मध्यवर्ती अधिकार क्षेत्र असण्याची गरज आहे.

 २. सेवापुरवठा करण्याची सोय – अन्न व पाण्यासारखी साधन सामग्री पुरवणेतसेच दळणवळणाची साधनेकार्यरत ठेवणेगरजेचेअसते.

३. संकटग्रस्तांसाठी छावण्या उभारणे व त्या चालू ठेवणे – कोणत्याही आपत्तीग्रस्त लोकांना अशा छावण्यांची गरज असते.

४. वैद्यकीय मदत – तात्पुरतेदवाखानेसुरू करून तातडीची वैद्यकीय मदत पुरवली जाते.

५. रस्ते व पुलांची बांधणी व दुरूस्ती – आपत्तीग्रस्तांना तातडीने साधनसामग्री पोचवण्यासाठी आपत्तीमुळे कोलमडलेली रेल्वे व रस्ते वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याची गरज असते.