प्रकरण ५. विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा

इयत्ता नववीच्या संरक्षणशास्त्र अभ्यासाच्या पुस्तिकेत आपण हे शिकलात की जगात आपलेराष्ट्रहित आणि
मूलभूत मूल्यांची जपणूक करण्यासाठी, राष्ट्राने विश्वसनीय राष्ट्रशक्ती विकसित करणे गरजेचेअसते. राष्ट्रशक्तीसाठी
लागणाऱ्या वेगवेगळ्या घटकांविषयीही तुम्ही जाणून घेतले. आधुनिक, विकसित आणि सुबत्तेकडे वाटचाल करणारे
एक राष्ट्र व्हायचेअसेल तर भौतिक घटकांपैकी विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिक उत्पादन क्षमता हेघटक राष्ट्राने
प्राधान्याने विकसित करणेआवश्यक आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांच्यातील परस्परसंबंध

बऱ्याचदा विज्ञानाचेमूलभूत ज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा मेळ घालून तंत्रज्ञान विकसित होते. उदाहरणार्थ, आधीच अवगत असणाऱ्या पद्धती आणि ज्ञानाचा वापर करून विज्ञानाने विद्युतसुवाहकातून जाणाऱ्या इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाचा अभ्यास करता येतो. ह्या नव्याने सापडलेल्या ज्ञानाचा उपयोग करून अभियंतेअर्धप्रवाही विद्युतवाहक, संगणक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या इतर काही गोष्टींसारख्या नव्या साधनांचेआणि यंत्रांचेउत्पादन करू शकतात. या अर्थाने वैज्ञानिक आणि अभियंते या उभयतांना तंत्रज्ञ असेसमजता येईल. म्हणून विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांित्रकी ह्या तीन क्षेत्रांना संशोधन व विकासाच्या उद्देशासाठी प्रसंगी एक समजण्यात येते.

भौतिक आणि नैसर्गिक जगाच्या संरचनेचा आणि वर्तनाचा पद्धतशीर अभ्यास म्हणजे विज्ञान होय. तंत्रज्ञान हे प्रात्यक्षिक (व्यावहारिक) विज्ञानाचेउद्योग व व्यापारासाठी केलेलेउपयोजन आहे. विज्ञानातील ज्ञानाचा वापर करून प्रात्यक्षिक उद्देशानेअस्तित्वात आलेल्या पद्धती, प्रणाली व उपकरणांचा संदर्भ तंत्रज्ञान देते. एक आधुनिक उदाहरण म्हणजेसंगणक विज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स यांच्या एकत्रित उपयोजनानेउदयाला आलेलेमाहिती तंत्रज्ञान. अभियांत्रिकी हे तर गणित, विज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि प्रात्यक्षिक ज्ञान यांचेउपयोजन आहे. पदार्थ, घटक, अवजारे, यंत्रे, प्रणाली शोधून काढणे, त्यात नावीन्य आणणे, आराखडा तयार करणेआणि उत्पादन करणे यासाठी तेमदत करते.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योगांचा भारतातील विकास

प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात डोकावून पाहिलेतर असे दिसतेकी भारतानेजगाला खगोलशास्त्र, गणित, वस्त्रे-प्रावरणेआणि इतर अनेक क्षेत्रांमधील ज्ञान दिलेआहे. सतराव्या शतकात भारत आर्थिकदृष्ट्या आणि सैन्यदलाच्या दृष्टिने युरोपीय देशांच्या तुल्यबळ होता. सन १७८० मध्ये टिपूसुलतानाने ब्रिटिश फौजांशी लढताना त्यांच्याविरुद्ध अग्निबाण वापरून त्यांना चकित केलेहोते. ब्रिटिशांनी ह्या अग्निबाणांची नक्कल करून तेअग्निबाण सन १८१२ मध्ये नेपोलियनच्या विरुद्ध वापरले. परंतुअठराव्या शतकात युरोपमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे युरोपच्या औद्योगिक क्षमतेत वेगानेबदल झाला व ती झपाट्यानेप्रगत झाली. ब्रिटिश अमंलामुळेअशी औद्योगिक क्रांती भारतात मात्र घडून आली नाही.

स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानात मोठी भरारी घेतली आहे. आज आपला भारत देश अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहे. यामध्ये शेती, वस्त्रोद्योग, आरोग्य रक्षण, औषधनिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान आणि आण्विक तंत्रज्ञान यांचा अंतर्भाव होतो.

राष्ट्रीय सुरक्षा वाढविण्यासाठी भारत सरकारने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात आरंभिक पावलेउचलली आहेत. यातील काही पावले नागरी उपयोगासाठी, तर काहींचे उपयोजन संरक्षणासाठी होते हे समजणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कृत्रिम उपग्रहांचा वापर नेहमीच्या भ्रमणध्वनी संपर्कासाठी केला जातो, तसेच तो संरक्षण फौजांच्या आपसातील संपर्कासाठीही केला जातो. त्याच प्रकारेअणुविज्ञानाचा उपयोग विद्युतनिर्मितीसाठी तसेच आण्विक शस्त्रास्त्रे बनवण्यासाठीही केला जातो.

प्रस्तुत पाठात भारताच्या सुरक्षिततेसाठी सैन्य दलाकडून वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या तीन क्षेत्रांवर भर दिला आहे. अवकाश तंत्रज्ञान, आण्विक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स. ही सर्व ‘द्विउपयोगी’ तंत्रज्ञानेआहेत.

अवकाश तंत्रज्ञान

मानवी अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी अवकाश तंत्रज्ञान हेमहत्त्वाचेआहे. कृत्रिम उपग्रह आता खूप ठिकाणी वापरलेजात आहेत. उदा., हवामानशास्त्र, दूरदर्शन प्रसारण, भ्रमणध्वनी दूरभाष्य, दिशादर्शन आणि आंतरजाल. अवकाश प्रणालींचा उपयोग अनेक क्षेत्रांमध्येही होतो, जसेकी वित्तीय व्यवस्थापन, शिक्षण, Tele-Medicine, विज्ञान संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापन. बाह्य अवकाशाचा उपयोग सैन्याच्या आधारभूत क्रियांसाठी केला जातो. उदाहरणार्थ भूपृष्ठ सर्वेक्षण, संपर्कआणि दिशादर्शन. डॉ. विक्रम साराभाई आणि इतर अनेक वैज्ञानिकांमुळेअवकाश तंत्रज्ञानाला उल्लेखनीय यश लाभलेआहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(Indian Space Research Organisation – ISRO) अग्निबाण, अंतराळयान आणि कृत्रिम उपग्रह यांची बांधणी व प्रक्षेपण करण्याच्याबाबतीत राष्ट्राला स्वयंपूर्ण केलेआहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था सन १९६९ मध्ये स्थापन झाली. तिचेउद्‌दिष्ट राष्ट्रीय विकासासाठी अवकाश तंत्रज्ञान कामी आणणे हे होते. भारतानेपहिला कृत्रिम उपग्रह ‘आर्यभट्ट’ सन १९७५ मध्ये बनवला, जो सोव्हिएट रशियाच्या प्रक्षेपक वाहनानेप्रक्षेपित केला गेला. भारताचा पहिला यशस्वी अवकाश प्रक्षेपण कार्यक्रम सन १९८३ मध्ये साध्य झाला. ‘रोहिणी’ या उपग्रहापासून सुरुवात करून इस्त्रोनेकृत्रिम उपग्रह प्रक्षेपक वाहने, सुधारित कृत्रिम उपग्रह प्रक्षेपक वाहने, ध्रुवीय कृत्रिम उपग्रह प्रक्षेपक आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक वाहनेयांची चाचणी घेतली आहे. भारतीय सुदूर संवेदन कृत्रिम उपग्रहाचा भूपृष्ठ सर्वेक्षणासाठी उपयोग हेभारतीय कृत्रिम उपग्रहाचेसंरक्षणासाठीचेपहिले प्रमुख उपयोजन होय.

 

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान

क्षेपणास्त्रांचे वर्गीकरण

क्षेपणास्त्रांचे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळे निकष वापरलेजातात. त्यात त्यांचा पल्ला हा एक महत्त्वाचा निकष असतो.
टॅक्टिकल क्षेपणास्त्र : साधारण पल्ला १५० किमी ते३०० किमी (उदा. पृथ्वी I)
अाखूड पल्ल्याचे क्षेपणास्त्र : साधारण पल्ला ३०० किमी ते१००० किमी (उदा. अग्नी I)
मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र : साधारण पल्ला १००० किमी ते३५०० किमी (उदा. अग्नी II व K4 सागरिका)
मध्यम दूर पल्ल्याचे क्षेपणास्त्र : साधारण पल्ला ३५०० किमी ते५५०० किमी (उदा. अग्नी III व IV)
आंतरखंडीय क्षेपणास्त्र : साधारण पल्ला – ५५०० किमी पेक्षा अधिक (उदा. अग्नी V)

आण्विक तंत्रज्ञान

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच भारतानेआपला आण्विक कार्यक्रम सुरू केला. भारताचेआण्विक धोरण विकसित करण्यात डॉ.मेघनाद साहा आणि डॉ. होमी भाभा या दोन वैज्ञानिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताचेआण्विक धोरण दोन तत्त्वांभोवती गुंफलेलेआहे: शांततामय उद्देशाकरिता आण्विक ऊर्जा कामी आणण्यासाठी संशोधन व विकासाला चालना देणेआणि आण्विक कार्यक्रमात स्वयंपूर्णता प्राप्त करणे.

अणुऊर्जेचा वापर विद्युत निर्मितीसाठी करणेहा अणुसंशोधनाचा सर्वांत महत्त्वाचा पैलूमानला गेला. आण्विक ऊर्जा ही भारताच्या सुरक्षा आणि शाश्वत विकास योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारत सरकारचा अणुऊर्जा विभाग सन १९५४ मध्ये स्थापन झाला. त्याचेकार्य अणुशक्ती तंत्रज्ञान विकसित करणे, आण्विक किरणोत्सर्ग प्रारण तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी, वैद्यक, उद्योग आणि मूलभूत संशोधनात करणेहेआहे. भारताला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करणे, अधिक संपन्न करणेआणि नागरिकांचेजीवनमान सुधारणेहेअणुऊर्जा विभागांची परिकल्पना आहे.

सन १९७४ मध्ये भारतानेपोखरण येथेपहिली आण्विक चाचणी घेतली. आण्विक तंत्रज्ञानाच्या विधायक उपयोगांतील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी हा एक शांततामय अणुस्फोट घडवून आणला होता. भारताची आण्विक क्षमताही जगाला दिसून आली. तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी लोकसभेला सांगितलेकी ही चाचणी म्हणजेआण्विक ऊर्जेच्या शांततामय उपयोगासाठीच्या संशोधन व विकासकार्याचा भाग होता.

आण्विक शस्त्र चाचणी

१९९८ मध्ये भारतानेपोखरण येथेपुन्हा अनेक आण्विक चाचण्या केल्या. भारतानेजाहीर केलेकी तो आता एक आण्विक शस्त्रास्त्रधारी देश आहे. तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयींचेआण्विक चाचणीनंतरचे हेविधान आण्विक शस्त्रास्त्रधारी देश बनण्याच्या भारताच्या निर्णयामागची कारणेविशद करते. त्यांनी सांगितले की, आमच्याभोवती आण्विक शस्त्रास्त्रे वाढली आहेत. भारत हा दहशतवाद आणि छुप्या युद्धाचा बळीही ठरला आहे. जागतिक स्तरावर आण्विक शस्त्रास्त्रे धारण करणाऱ्या देशांनी आण्विक शस्त्रास्त्रमुक्त जग ह्या ध्येयाप्रत कोणतीही पावलेउचलेली नाहीत. म्हणून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी भारत हा आण्विक शस्त्रास्त्रधारी देश बनला आहे. ही शस्त्रास्त्रे आक्रमणासाठी किंवा कोणत्याही देशाला धमकावण्यासाठी वापरण्याचा भारताचा मानस नाही; ही शस्त्रास्त्रे आत्मसंरक्षणासाठी आहेत, भारत हा आण्विक धमक्या व दबाव यांना बळी पडणार नाही याची खात्री देणारी आहेत, भारतानेआण्विक तंत्रज्ञानाच्या शांततामय उपयोगाचेधोरण सोडून दिलेलेनाही. त्यानेजागतिक आण्विक नि:शस्त्रीकरणाला पाठिंबा देणेसुरू ठेवलेआहे. परंतुस्वसंरक्षणाच्या दृष्टीनेआण्विक शस्त्रास्त्र–सिध्दता करून त्याला क्षमता विकसित करायची आहे.

इलेक्ट्रॉनिक्स

भारत सरकारने देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली आराखडा व उत्पादन (Electronics System Design & Manufacturing – ESDM) यास चालना देण्यासाठी सन २०१२ मध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे राष्ट्रीय धोरण घोषित केले. ह्या धोरणाच्या उद्‌दिष्टांपैकी एक म्हणजे ESDM आणि अर्थव्यवस्था, संरक्षण, अणुऊर्जा व अवकाश विभागांमध्ये भागीदारी विकसित व्हावी हे आहे. याव्यतिरिक्त माहिती व संपर्क तंत्रज्ञान पायाभूत सुविधांची आणि देशाच्या सायबर अवकाशाची सुरक्षा करण्यासाठी एका संपूर्ण सुरक्षित सायबर परिसंस्थेची निर्मिती करण्याची योजना आहे.

इलेक्ट्रॉनिक्स हा भारताच्या संरक्षणसिX²Yतेचा महत्त्वाचा भाग आहे. संपर्क क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स हे सॅटेलाईट फोन, रडार, दिशादर्शित क्षेपणास्त्रे, विविध उपकरणांतील इलेक्ट्रॉनिक सर्किट इत्यादींमध्येवापरले जाते. स्वदेशी महासंगणक आणि महासंगणकीय तंत्रज्ञान विकसित करण्याचा कार्यक्रम भारताने सुरू केला आहे. हे महासंगणक आण्विक शस्त्रास्त्रांचा विकास करण्याच्या कामी मदत करण्यास सक्षम आहे. परम ८०० (PARAM 800) हा सीडॅकनेविकसित केलेला पहिला महासंगणक होय. या कामात डॉ. विजय भटकर यांचे योगदान मोलाचे आहे.

अनेक प्रकारचेतंत्रज्ञान, आंतरजाल (इंटरनेट) आणि सामाजिक संबंधांची वाढ यामुळेसायबर सुरक्षेवरील चर्चेला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. आंतरजालाचा उपयोग प्रचंड आहे. लोक आंतरजाल अणि सामाजिक संबंध संकेत स्थळांचा उपयोग करत असतात. सायबर अवकाशात चाललेल्या प्रत्येक गोष्टीची निगराणी करणेअशक्य आहे. विविध तंत्रज्ञानांतील जलद प्रगतीमुळेनवीन प्रकारचेधोके निर्माण होत आहेत आणि तेसमजून घेऊन त्यांची हाताळणी करणेगरजेचेआहे.

आज सायबर सुरक्षेला असलेलेधोकेअधिकाधिक प्रगत आणि जटिल झालेआहेत. वीजपुरवठा, बँका, रेल्वे, हवाई वाहतूक नियंत्रण अशा मूलभूत सामाजिक गरजांवर हल्ले होऊ शकतात. शासकीय कार्यालये, बँका, इतर काही पायाभूत सुविधा, देशभरातील कंपन्या यांना लक्ष्य करून हॅकर्स खंडणी मागूशकतात. अशी कृत्ये पारंपरिक कायदा व सुव्यवस्थेखालील प्रश्नात मोडत नाहीत. म्हणूनच त्यांना हाताळणेअवघड बनते. ह्या प्रश्नाची हाताळणी करण्यासाठी भारत सरकारनेसन २०१३ मध्ये, सायबर सुरक्षेशी संबंधित कारवाईसाठी व्याख्या आणि मार्गदर्शन करण्याकरिता आराखडा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेराष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण आखले.

संरक्षण क्षेत्रात भविष्यकाळात महत्त्वाचे बदल घडून आणणारी नवीन तंत्रज्ञानाची क्षेत्रे

  • कृत्रिम बुद्‌धिमत्ता आणि रोबोटिक्स
  • पार्टिकल बीम किंवा लेझर किरण शस्त्र
  • विद्युत चुंबकीय प्रणवदन
  • हलक्या वजनाचे उच्च मिश्रधातू आणि उच्च शक्तीचेसंमिश्र आणि उष्णता प्रतिरोधी पदार्थ
  • व्यवस्थेचे सूक्ष्मीकरण (Miniaturisation and Nano Technology)
  • रडारला शोधता येणार नाही असेस्टेल्थ (Stealth) तंत्रज्ञान