१०. ओळख भारताची

      खाली दिलेला भारताचा नकाशा पहा. या नकाशात भारतातील विविध नदया दाखवल्या आहेत. यांपैकी काही नदयांची नावे आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो. विविध देशभक्तीपर गीतांतही त्यांचा उल्लेख आहे. विविध नदया, पर्वत व पठारे यांनी आपला देश समृद्ध आहे. यांपैकी काहींची नावे नकाशात दिली आहेत. सांगा बरें, नकाशात दिलेल्या नावांपैकी कोणती नावे तुमच्या परिचयाची आहेत ? ती कोठे वाचनात आली आहेत त्याचा विचार करा. नकाशामधील या नावांना करा.

भारत प्राकृतिक नकाशाचा काळजीपूर्वक – अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा.
(१) पर्वत शोधा व त्यांची नावे लिहा. (२) नकाशातील डोंगरांची नावे लिहा.
(३) नकाशातील पठारे शोधा व त्यांची नावे लिहा.
(४) हिमालयात उगम पावून सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे लिहा. उंचीचा विचार

करून त्यांची वाहण्याची दिशा कोणती ते लिहा.
(५) कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्यांची नावे लिहा.
(६) गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी ‘, या नदयांच्या प्रवाहमार्गांचे निरीक्षण करा. त्यांच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे ते नोंदवा..

आपण नकाशा आणि त्यावर आधारित प्रश्नांद्वारे भारताच्या प्राकृतिक रचनेची माहिती जाणून घेतली. आपला देश विविध नदया, पर्वत, पठारे, मैदाने,
बेटे इत्यादींनी नटलेला आहे. भारतीय भूखंडाच्या तीन दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास ‘भारतीय द्वीपकल्प’ म्हणतात. आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगांनी तयार झाली आहे. आपल्या देशात वने, मैदाने, वाळवंटे इत्यादी, आहेत. सोबतची चित्रे पहा.
आपल्या देशाचा विस्तार मोठा आहे. शिवाय समुद्रसपाटीपासून उंचीतील फरक ८००० मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रदेशांनुसार भारताच्या हवामानात विविधता आढळते. हवामानातील या विविधतेमुळे वनस्पती, प्राणी व पक्ष्यांमधील विविधतासुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. तसेच पीकपाण्यातही विविधता आढळून येते. जसे, उत्तर भारतात गहू हे प्रमुख पीक आहे, तर किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात भात हे प्रमुख पीक आहे. मध्यभारतात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
या सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम आपले जीवनमान, चालीरीती, परंपरा, लोकजीवन व संस्कृतीवर झालेला आढळतो.
आपल्या देशात विविध जाती, जमाती व धर्मांचे लोक राहतात. विविध भाषा बोलल्या जातात. प्रदेशानुसार आहारात, पेहरावात, सण-उत्सव, इत्यादींमध्ये आपण ही विविधता सहज पाहू शकतो.

  वर दिलेल्या भारताच्या राजकीय नकाशाचे

१. आपले राज्य ओळखा. तुमच्या आवडत्या रंगाने ते रंगवा व राजधानीचे नाव लिहा.

२. सर्वांत उत्तरेकडे असणारे राज्य कोणते ते लिहा ?

३. सर्वांत दक्षिणेला असणाऱ्या राज्याचे नाव लिहा.

४. अतिपूर्वेकडील राज्ये वेगवेगळ्या रंगाने रंगवा. त्यांची नावे व राजधान्या कोणत्या ते लिहा.
निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे वहीत नोंदवा..
५. आकारमानाने मोठे असणारे राज्य पिवळ्या रंगाने रंगवा व राजधानीला करा.
ते रंगवा व राजधानीचे नाव लिहा.
६. लाल अक्षरांनी लिहिलेली नावे कोणते क्षेत्र दाखवतात ?

     भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वांत मोठे राज्य आहे. त्यानंतर मध्यप्रदेश व तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. गोवा हे भारतातील सर्वांत कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे.

      आता तुम्ही संकलित केलेल्या प्रत्येक राज्यांच्या वैशिष्ट्यांचे तक्ते तयार करून ते वर्गात चिकटवा. हे करत असताना संघराज्य क्षेत्रे विसरू नका. अशा प्रकारे तुमची विविध राज्यांच्या वैशिष्ट्यांनी युक्त अशी वर्गखोली तयार होईल.
भारतातील विविध प्रदेशांनुसार पिकांच्या उत्पादनातही आपल्याला फरक आढळतो. बाजारात किंवा दुकानात आपल्याला मिळणाऱ्या चहा, कॉफी, संत्री, आंबे इत्यादी वस्तू नेमक्या कोठे उत्पादित होतात, त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचतात हे आपण पुढील पानावरील नकाशावरून समजून घेऊया.

वरील नकाशाचे नीट निरीक्षण करा. या नकाशात भारतातील काही प्रमुख नगदी पिके व विविध प्रकारचे
वाहतुकीचे मार्ग दाखवले आहेत.

नकाशाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे दया.
(१) आपल्या राज्यात केशर कोठून आणावे लागेल ? त्यासाठी सोईचा मार्ग गिरवा.

(२) चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यांत होते ?

(३) आपल्या राज्यात लवंग आणण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा.

(४) सफरचंदाचे उत्पादन भारतातील कोणकोणत्या राज्यांत होते ते शोधा. त्या राज्यांच्या नावाभोवती ● करा.

५. नागपूरची संत्री बिकानेरला पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा.
६. पश्चिम बंगाल राज्यात कॉफी व आंबे
पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा.
हे नेहमी लक्षात ठेवा.
७. महाराष्ट्रातील कांदा अरुणाचल प्रदेश या राज्यात कोणत्या मार्गाने पाठवाल