१०. गोमू माहेरला जाते

गोमू माहेरला जाते हो नाखवा ।
तिच्या घोवाला कोकण दाखवा ।।

दावा कोकणची निळी निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा ।।१।।

कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा ।।२।।

सोडून दे रे खोड्या साऱ्या
शिडात शीर रे अवखळ वाऱ्या
झणी धरणीला गलबत टेकवा ।।३।।