१०. मानवी वस्ती

भौगोलिक स्पष्टीकरण

पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित झाल्या. वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले. त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या. उदा., समद्रकिु नाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी. त्यांची वस्ती म्हणजे कोळीवाडा. वनप्रदेशातील लोकांचे व्यवसाय वनाेत्पादनावर अवलंबून असतात. यथे े राहणाऱ् आदिवासींची वस्ती म्हणजे आदिवासी पाडा. सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी शेतीव्यवसाय केला जातो. शेतकरी कुटुंबेआपल्या व्यवसायाच्या सोईच्या दृष्टीने आपल्या शेतामध्ये घरेबांधून राहतात. यालाच वस्ती या नावानेसंबोधलेजाते. कालांतराने वस्तीचा विस्तार झाला, म्हणजेत्यांना वाडी म्हणतात. ज्या मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडितअसतात;उदा., शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी, अशा वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात.

ग्रामीण वस्तीमध्ये मूळ व्यवसायाच्या अनुषंगाने हळूहळूइतरही पूरक व्यवसायांची वाढ होत जाते; त्यामुळे कामधंद्यानिमित्त आजूबाजूच्या प्रदेशांतील लोक तेथे येऊन स्थायिक होऊ लागतात; आणि मूळ ग्रामीण वस्तीच्या लोकसंख्येत वाढ होत जाते. वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरे, तसेच विविध सुविधा विकसित केल्या जातात. अशा वस्तीत द्‌वितीयक व तृतीयक व्यवसायांचेमहत्त्व व प्रमाण वाढते, तुलनेत पूर्वीच्या प्राथमिक व्यवसायांचेप्रमाण कमी होत जाते. यातूनच ग्रामीण वस्तीचेरूपांतर नागरी वस्तीत होते. धार्मिक, ऐतिहासिक, व्यापारी, शैक्षणिक, पर्यटन व प्रशासकीय कारणांमुळे देखील हळूहळू या वस्तीचे रूपांतर शहरात होते. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या व इतर सोईसुविधांमध्ये वाढ होत गेल्यास पुढे या शहराचेरूपांतर महानगरात होते.

विविध वस्त्यांचा विचार केला असता असे लक्षात येते, की मानव वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितींमध्ये वस्ती करून राहतो व तेथील निसर्गाशी जुळवून घेतो. निसर्गामध्ये असलेल्या स्थितीनुसार मानवी वस्तींचे आकृतिबंध निर्माण होतात. या पाठामध्ये आपण मानवी वस्तींचे प्रमुख आकृतिबंध व त्यामागची कारणे अभ्यासणार आहोत.

भौगोलिक स्पष्टीकरण

परिसरातील साधनसामग्रीचा वापर करून, घरे बांधून मानव राहू लागला. विज्ञानयुगात तर मानवाने निवाऱ्याच्या साधनात मोठी प्रगती केली.परिस्थितीनुरूप तो उत्तुंग इमारती बांधून राहू लागला. भविष्यात इतर ग्रह आणि उपग्रहांवर वसाहती उभारण्याचा विचार आता मानव करत आहे.

वस्तीमुळेमानवाला स्थैर्य मिळाले. ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीतील स्थैर्याची पहिली पायरी आहे. ग्रामीण वस्तीचा विकास व वाढीतूनच नागरी वस्ती निर्माण होत गेल्या. ग्रामीण वस्त्या संस्कृतीचे जतन करतात. ग्रामीण लोकसंख्येची वाढ ही नागरीकरणाची सुरुवात आहे.नागरी वस्त्या मानवी जीवनाची गतिमानता वाढवतात. नागरी व ग्रामीण लोकवस्तींत आर्थिक सहसंबंधही मोठ्या प्रमाणातअसतो.नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्नविषयक गरजांची पूर्ती ग्रामीण वस्त्या करत असतात. ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट आधुनिकता व विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारेहोत असतो.

वस्तीचे प्रकार व त्यांच्या वितरणाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील.

विखुरलेली वस्ती : विखुरलेल्या वस्तीत घरे दूर दूर आणि संख्येने कमी असतात. सामान्यपणे या प्रकारची वस्ती उंचसखल प्रदेश, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट, तसेच विस्तृत कृषिक्षेत्र असलेल्या ठिकाणी आढळते. (आकृती १०.५ पहा.)

वैशिष्ट्ये :
v विखुरलेल्या वस्त्यांमधील अंतर स्पष्टपणे पाहायला मिळते.
v या वस्त्यांची लोकसंख्या मर्यादित असते. उदा., पाडा, वाडी इत्यादी.
v या वस्त्यांमध्ये पुरेशा सोईसुविधा, सेवा उपलब्ध नसतात.
v या वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात, त्यामुळे प्रदूषणमुक्त असतात.
v दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती खेड्यांवर अवलंबून असतात.

केंद्रित वस्ती : ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवरे अशा पाणवठ्यांजवळ या प्रकारची वस्ती असते. राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. सामान्यतः सपाट व सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खाणकाम, व्यापारी केंद्र इत्यादी कारणांमुळेदेखील या प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात. याशिवाय संरक्षण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर सामाजिक व धार्मिक कारणांमुळे केंद्रित वस्त्यांची निर्मिती होऊ शकते. (आकृती १०.६ पहा.)

वैशिष्ट्ये :
v वस्तीमधील घरे जवळजवळ असतात.
v वस्तीमध्ये सामाजिक सेवा उपलब्ध असतात.
v वस्त्यांना स्थल व कालसापेक्ष वितरणामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो.
v या वस्तीतील जुन्या परिसरात रस्ते अरुंद असतात.
v या वस्तीमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, वंश व विचारप्रणालीचे लोक एकत्र राहतात, त्यामुळे अशा वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते.

रेषाकृती वस्ती : रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय प्रदेशाचा पायथा इत्यादी प्रदेशांलगत रेषाकृती वस्त्या आढळतात. या प्रकारची वस्ती अरुंद आकाराची व सरळ रेषेत असते. (आकृती १०.७ पहा.)

वैशिष्ट्ये :
v या वस्तीमधील घरे एका रांगेत असतात. कालांतराने वस्ती वाढत गेल्याने त्यांच्या अनेक रांगा होतात.
v रस्ते एकमेकांना समांतर असतात.
v घरांशिवाय वस्तीमध्ये काही दुकाने असतात.
v भविष्यकाळात रस्त्यांच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत राहते. उदा., भारतातील किनारपट्टीचे प्रदेश, प्रमुख नद्या, राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत अशा प्रकारच्या वस्त्या आढळतात.