११. कठीण समय येता…

कृष्णाकाठी वसलेले राजापूर हे एक गाव. साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. उसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते. कारखान्यापर्यंत कच्चे-पक्के रस्ते आहेत. एकामागून एक उसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात.

एकेदिवशी बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती. मुंडासे गुंडाळलेला गाडीवान गाडी हाकत होता. गाडीवर त्याची सात-आठ वर्षांची मुलगी व बाजूलाच त्याची बायको बसलेली होती.

ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उताराला लागली. रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ येताच आवाज झाला. बैलगाडीचे एक चाक निखळून बाजूला पडले. उसाने भरलेली गाडी एका बाजूला कलल्यामुळे गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पहली वरून उसाचे बांधे तिच्या अंगावर पडू लागले गाडीवर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली. गाडीवान बैलांचा कासरा धरून धडपडत कसाबसा जमिनीवर आला; पण गाडी उलटली आणि बैलांच्या गळ्याला एकाएकी फास बसला. तो खड्डा तर उसाने पूर्णतः झाकला गेला.

नेमके याच वेळी दोन स्थानिक तरुण बाइकवरून कारखान्याकडे जाण्यास निघाले होते. त्यांनी हा सारा प्रकार पाहिला आणि मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून ते गाडीकडे धावले. पहिल्यांदा बैलांचा . गळफास सोडवून ते गाडीवानाकडे वळले. गाडीवान I • जखमी मुलीला उचलून घेऊन ‘सकू… सकू…’ म्हणत गाडीभोवती व्याकूळ होऊन फिरत राहिला; पण त्याच्या बायकोचा ठावठिकाणा लागत नव्हता. मोटरसायकलवरून आलेल्या एका तरुण मुलाने प्रसंगावधान साधून बाइकला किक मारली आणि शाळकरी मुलांचे पाढे ऐकू येत होते त्या दिशेला बाइक पळवली. शाळेच्या पायरीशी बाइक लावून थेट वर्गात गुरुजींच्या समोर हात जोडून उभा राहिला व म्हणाला, “सर… रस्त्यावर उसाची गाडी पलटी झाली अन् खड्ड्यात पडली आहे आणि एक बाई खाली दबून गेली आहे. त्या बाईचा जीव वाचवायला हवा. मुलांनी तिच्या अंगावरील उसाचे बांधे उचलले तरी ती बाई वाचेल. लवकर चला! प्लीज…’

शिक्षकांनी लगेच सूचना केली, “मुलांनो, आपल्या शाळेच्या बाहेर अपघात झाला आहे. तिकडे लवकर चला. शाळेच्या बाहेर पडा. ” तुफान आल्याप्रमाणे वर्गातले सारे विद्यार्थी भराभरा वर्गाबाहेर आले. सर्व विदयार्थ्यांना घेऊन शिक्षक घटनास्थळाकडे गेले.

पलटी झालेल्या गाडीजवळ येताच दोन्हीकडील वाहने अडवण्यासाठी चार-चार मुलांनी रस्त्यावर आडवी साखळी केली आणि बाकीच्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने दोरखंड बांधून गाडी सरळ केली. काही मुले भराभरा ऊस उपसू लागली. उसाच्या ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको निपचीत पडली होती. सर्वांच्या काळजात धस्स झाले, कारण तिचा श्वासही गुदमरला होता.

ते दोन तरुण, शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणले. गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यासारखी भेदरलेल्या नजरेने आईकडे पाहतच राहिली विद्यार्थिनींपैकी काहींनी त्या बाईच्या हातापायांचे तळवे घासले, तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करण्याचा प्रयत्न चालवला. बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली, तशी ‘ए.. ‘आयोऽऽ!’ म्हणून तिच्या मुलीने तिला मिठी मारली. सगळ्यांना हायसे वाटले. मुलाचेही डोळे पाणावले. त्या सर्वांना त्या बाईमध्ये आपापली आई दिसली असावी.

इतक्यात शाळेतून आणखी काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्यांनी आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केल्या. जखमी मुलीच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर पट्टी बांधली. गाडीवानाची बायको वेदनांनी म विव्हळत होती. कदाचित त्या बाईच्या हाताचे हाड फ्रेंक्चर झाले असावे.

इतक्यात एक सुमोगाडी रस्त्याने आली. विदयाथ्र्यांनी ती थांबवली तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी के आपली गाडी अँब्युलन्सप्रमाणे वापरायला दिली. त्या तरुणाच्या मोटरसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि त्या सुमोगाडीच्या पुढे लाल रंगाचा

रुमाल झेंड्यासारखा हालवत पुढे निघाला. समोरून 7 येणारी वाहने बाजूला होत होती. जखमी मायलेकी, गाडीवान, एक तरुण, शिक्षक आणि चार विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली.

इकडे अपघात झाल्याची बातमी कळताच पुढे गेलेल्या बैलगाड्यावरचे काही गाडीवान मागे आले. – त्यांनी ती पलटी झालेली गाडी बैलांसह हळूहळू मार्गी लावली. काही गाडीवान रुग्णालयात पोहोचले. त्या दोन तरुणांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयात पोहोचले. कर्ज, उसनवारीने अगोदरच खचलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती. कारखान्याचे अधिकारी त्याच्या जखमी कुटुंबाला धीर देऊन म्हणाले, “घाबरू नका…… तुमच्या मदतीला किती लोक आलेत पाहा. गाडीवान गोंधळला होता. त्याच्या पाठीवर हात ठेवत शिक्षक म्हणाले, “तुमची बायको जिवंत आहे हीच लाख मोलाची गोष्ट. काळजी करू नका, त्या लवकर बऱ्या होतील.’ कारखान्याचे अधिकारी म्हणाले, “दवाखान्याच्या खर्चाचे आम्ही पाहू. तुझ्या कामाचेही पाहू. तुला आणखी काही हवे असल्यास सांग.” धक्का बसलेल्या त्या गाडीवानाला हुंदके आवरता आवरेनात. अधिकाऱ्याच्या आश्वासनाने भारावून जाऊन त्याने अधिकाऱ्याचे, गुरुजींचे पाय धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

ज्या दोन तरुणांनी मदत केली, ते पत्रकार होते. त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले. अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्रे पाठवली.

 मनोहर भोसले