११. समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे

उंची व प्रदेशातील उंचसखलपणा नकाशात कसा दाखवला जातो, याची थोडी माहिती तुम्ही इयत्ता पाचवीत घेतली आहे. यावर आधारित पुढील कृती शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करा.

करून पहा.

वरील आकृती ११.१ (अ) मध्ये भूपृष्ठाची प्रतिकृती दाखवली आहे. ितचेकाळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरेद्या.
Ø सदर प्रतिकृतीत कोणकोणती भूरूपेदिसत आहेत?
Ø या प्रत्येक भूरूपासाठी वापरलेलेरंग कोणते? आता आकृती ११.१ (ब) मधील नकाशाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरेद्या.
Ø नकाशामध्ये काय काय दिसत आहे?
Ø नकाशात दिसत असलेल्या डोंगररांगांची सर्वसाधारण दिशा कशी आहे?
Ø नकाशातील कोणत्या दिशेस सपाट प्रदेश आहे?
Ø नकाशातील रेषांचेकमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य किती आहे?
Ø ही मूल्ये काय दाखवत असावीत?
Ø यानकाशात व तुम्ही अगोदरपाहिलेल्या प्रतिकृतीमध्ये काही साम्य आहेका? असल्यास तेकोणते?
Ø कोणती आकृती अधिक माहिती देते व ती माहिती कोणती?
Ø तुम्ही तयार केलेला ‘बटाटा टेकडी’चा आराखडा व या नकाशात काही सारखेपणा आहेका?

भौगोलिक स्पष्टीकरण

भूपृष्ठावरील विविध भूरूपांचा अभ्यास करताना या भूरूपांची समुद्रसपाटीपासूनची उंची, उंचसखलपणा, उतार, उताराची दिशा, त्यावरील जलप्रवाह यांचा अभ्यास करावा लागतो. यासाठी विशिष्ट प्रकारेतयार केलेलेनकाशे वापरतात. हेनकाशेम्हणजेसमोच्चता दर्शक नकाशे. या नकाशांतून आपल्याला भूरूपांची वरील प्रकारची वैशिष्ट्ये समजतात.पर्यटक, गिर्यारोहक, भटकंती करणारे, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक इत्यादींना तसेच कोणत्याही प्रदेशाचे नियोजन करताना या नकाशांचा खूप उपयोग होतो.

आकृती ११.३ (अ) मध्ये एक प्रतिकृती दिली आहे. प्रतिकृतीमधील उत्तर भाग मुळा-मुठा नद्यांच्या खोऱ्याचा आहे. त्यानंतर कात्रज-दिवेघाट ही डोंगररांग पश्चिमेकडून पूर्वेकडे विस्तारलेली दिसत आहे. त्या पलीकडेकऱ्हा नदीच्या खोऱ्याचा काही भाग दिसत आहे. (वरील प्रतिकृती व त्या खाली दिलेल्या समोच्चरेषा नकाशाचे (आकृती ११.३ (ब)) काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.)
Ø नकाशात पुरंदर किल्ला कोणत्या दिशेला आहे?
Ø नकाशातील कऱ्हा नदीच्या वाहण्याची दिशा कोठून कोठेआहे?
Ø नकाशात कोणत्या बाजूला डोंगररांग नाही?
Ø नकाशातील कोणता भाग आपल्याला प्रतिकृतीत दिसत नाही? तो का दिसत नसावा?
Ø कात्रज-दिवेघाट या डोंगररांगेची उंची कोणत्या दिशेने वाढत गेली आहे?
Ø उंच डोंगररांगा कोणत्या दिशेला आहेत?

वरील प्रश्नांची उत्तरेशोधताना समोच्च रेषांशी तुमची मैत्री होईल आणि समोच्च रेषांनी काढलेली प्रमुख भूरूपेतुम्ही ओळखूशकाल. l तुमच्या गावाची/शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची (मीटरमध्ये) शोधा. समुद्रसपाटीपासून तुमच्या गावाची/शहराची उंची दाखवणाऱ्या समोच्च रेषा काढायच्या आहेत. प्रत्येक समोच्च रेषेतील अंतर जास्तीत जास्त ५० मीटर घ्यावे. तुमच्या गावाच्या/ शहराच्या उंचीपर्यंत साधारणपणे किती समोच्च रेषा काढाव्या लागतील? l विद्‌यार्थी मित्रांनो, अशी कल्पना करा, की तुम्ही गिर्यारोहणासाठी गेला आहात. तुम्हांला ‘अ’ या डोंगराच्या किल्ल्यावर पोहोचायचे आहे. या डोंगराचा नकाशा आकृती ११.४ मध्ये दिला आहे. या नकाशातील समोच्च रेषांचे निरीक्षण करून तुम्ही या डोंगराच्या शिखरावर कोणत्या बाजूने सहज व सुरक्षितपणे पोहोचू शकाल, तो मार्ग पेन्सिलच्या साहाय्याने चित्रात दाखवा.