खालील चित्रांचे नीट निरीक्षण करा. आपल्याला आवडलेले/हवे असलेले कपडे निवडून
त्याभोवती ● करा.
आता निवडलेल्या कपड्यांची एकूण संख्या चौकटीत लिहा. |______|
निवडलेल्या कपड्यांची संख्या व तुमच्या मित्रांनी निवडलेल्या कपड्यांची संख्या जुळते का ते पहा.
(१) निवडलेले कपडे कोणकोणत्या दिवशी घालणार आहात ?
(२) दिवसातून किती वेळा कपडे बदलणार
आहात ?
(३) निवडलेल्या कपड्यांपेक्षा अजून काही कपडे आपल्याकडे असावेत, असे वाटते का? वाटत असल्यास किती ती संख्या चौकटीत लिहा. |______|
(४) कपड्यांव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या वस्तू / दागिने घालायला आवडतील ?
(५) तुमचे कपडे तुम्ही मित्रांना घालण्यासाठी दयाल का ?
(६) जाहिरातींमधील कोणते कपडे तुम्हांला घालावेसे वाटतात?
- आपल्याला अनेक प्रकारचे पोशाख ( कपडे ) घालायला आवडतात आणि आपल्याकडे ते असावेत असेही आपल्याला वाटते.
- मुलांनो, या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर असे वाटेल, की आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या कपड्यांची संख्या जास्त आहे. कपडे हवे असणे आणि त्यांची खरोखरच गरज असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. गरज नसताना वस्तू हव्या आहेत असे वाटणे, हा आपला हव्यास असतो.
आपण प्रसार माध्यमांद्वारे कपड्यांच्या विविध जाहिराती पाहतो आणि त्याकडे आकर्षित होतो. अशा प्रकारे वस्तूंबद्दल निर्माण होणारे आकर्षण आपल्या हव्यासामध्ये भर घालते.
तुमच्या परिसरात उपलब्ध असलेल्या वस्त्रनिर्मितीच्या एका उद्योगाला भेट दया अथवा मुलाखतीसाठी तेथील कुशल कामगाराला बोलवा. या उदयोगाची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे मिळवा.
१. हा उदयोग कोणता आहे ?
२. या उद्योगातून निर्माण होणारे उत्पादन कोणते
३. वस्त्रनिर्मितीसाठी कोणता वापरतात ?
४. कच्चा माल कोठून आणला जातो ?
५. कच्च्या मालाचे स्वरूप काय असते?
६. तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी कोठे पाठवले जाते ?
७. या वस्त्रांचा वापर कोणत्या ऋतूमध्ये करतात ?
८. या उद्योगासाठी कोणकोणत्या प्रकारचे कामगार लागतात ?
९. हे कामगार कोठून उपलब्ध होतात ?
१०. आता वस्त्रोद्योगात पूर्वीपेक्षा कोणकोणते बदल
झाले आहेत ?
११. या उदयोगात तुम्हांला येणाऱ्या समस्या
कोणत्या ?
आपण वरील मुद्द्यांच्या आधारे वस्त्रोद्योगाची माहिती मिळवली. आता आपण महाराष्ट्र राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रनिर्मितीची उदाहरणे पाहूया. पैठणची पैठणी, येवल्याची साडी, औरंगाबादच्या हिमरू शाली, सोलापूरची चादर, इचलकरंजीचे हातमाग व यंत्रमागावरील कापड इत्यादी.
पुढील पृष्ठावरील नकाशाच्या आधारे हे आपल्या लक्षात येईल.
आपल्याला माहीत असलेला परंतु नकाशात न दाखवलेला वस्त्रोद्योग या नकाशाच्या सूचीत लिहा व नकाशात योग्य ठिकाणी दाखवा.
वस्त्रांतील विविधता जाणून घेण्यासाठी पालकांबरोबर कापड बाजारात जा. तेथे असलेल्या लोकांशी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा व वहीत नोंदवा.
१. वस्त्रांचे विविध प्रकार पहा व त्यांच्या नावांची यादी करा.
२. या यादीचे बाल, तरुण आणि वृद्ध अशा वयोगटांनुसार वर्गीकरण करा.
३. वस्त्रांपैकी साड्यांचे विविध प्रकार जाणून घ्या.
४. साड्यांच्या निर्मितीची प्रसिद्ध ठिकाणे नोंदवा.
५. तुम्ही नोंदवलेल्या साड्यांच्या नावांमधील ठिकाणे व प्रदेश लक्षात घेऊन त्याची नोंद वरील नकाशात करा.
प्रदेशांनुसार साड्यांच्या प्रकारांत अनेक पर्याय दिसतात. यावरून असे लक्षात येते, की आताच्या स्थितीत आपल्याला वस्त्रांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. हवामानाच्या विविधतेमुळे व वाहतुकीच्या सुविधांमुळे वस्त्रांमध्ये आपल्याला अनेक प्रकार उपलब्ध झाले आहेत. वस्त्रांमधील विविधता ही आपल्या देशाच्या विविधतेचा एक भाग आहे.
तुमच्या घरातील / परिसरातील वयस्कर व्यक्तींना भेटून खालील माहिती घ्या.
– त्यांच्या लहानपणी ते कोणकोणते कपडे वापरत होते ?
– त्यांनी सांगितलेल्या कपड्यांची यादी करा.
– ही यादी घेऊन कपड्यांच्या दुकानात जा व तेथे
त्यांपैकी कोणते कपडे उपलब्ध आहेत ते पहा.
-तुमच्या यादीतील कोणकोणते कपडे त्या दुकानात मिळतात याची माहिती घ्या.
-कोणते कपडे आता वापरले जात नाहीत ते शोधा.
-हे कपडे कोणत्या ठिकाणावरून येत होते याची माहिती घ्या.
-तसेच त्यांचा वापर का बंद झाला हे जाणून घ्या.
• परंपरेनुसार व काळानुसार वस्त्रांमध्ये बदल होत गेले – आहेत का, हे जाणून घ्या.
मानवाच्या उत्क्रांतीदरम्यान त्याच्या शरीरामध्ये अनेक बदल होत गेले. शरीरावरील केसांचे प्रमाण कमी होते गेले, हा त्यांपैकीच एक बदल होय. शरीरावरील केसांचे आवरण कमी झाल्याने मानवाला ऋतुबदलांपासून संरक्षणाची आवश्यकता भासू लागली आणि त्यातून वस्त्र ही गरज निर्माण झाली. मानवाने विविध काळांत वापरलेल्या वस्त्रांमध्ये विविधता दिसून येते. आदिम काळात सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नसे. त्यानंतर झाडांची सालं व पाने वापरली जाऊ लागली. पुढे तो शिकार करून मारलेल्या जनावरांचे कातडे वापरू लागला. कापसासारख्या वनस्पतींपासून सूत तयार करण्याची कला अवगत झाल्यावर सुती कापडाचा वापर होऊ लागला. खालील चित्रांवरून हे तुमच्या लक्षात येईल.
मुंबई हे कापड गिरण्यांसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होते. या बेटावर दमट हवामानामुळे लांब धाग्याचे कापड तयार करणे सुलभ होते. त्यामुळे मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले. कापड उदयोगाच्या भरभराटीमुळे भारताच्या विविध प्रदेशांतून रोजगारासाठी येऊन या ठिकाणी लोक स्थायिक झाले. तेव्हापासून मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र बनले.