मला आठवत, लहानपणी मी नेहमी आमच्या अजोळाच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायची. तिथे एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला, की कुंभाराच्या हाताच्या चपळाईन लहान-मोठी मातीची भांडी तयार व्हायची फार गंमत वाटायची बघताना
आमच्या घरी त्या वेळी मातीचीच भांडी असायची सैंपाकाला मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी असले हरघडी लागणारं काय काय असायचं शेगड्या, चुलीपण मातीच्याच बनायच्या खेळायला बुंडूकली, पुजायला बैल अन् गणपती, मुखवटे, नक्षीची कमान असलं बरंचसं तिथं तयार व्हायच
कुंभार हा निर्मितीचा धनी. त्याची ही कलाकुसर पिढ्यानपिढ्यांची हरघडी लागणारी धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला, नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटलीत मांडायचे. बंदराला बैल तयार करून फळकुटावर ठेवायचे लई गंमत!
वडीलमाणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधीमधी आमचापण हात कोणत तरी एक काम करायला वळवळायचा.
आमच्या शेजारी जिनगराचं घर. तिथं पातळ गुलाबी रंगीत चुरमुन्या कागदात गुंडाळलेला, सोनेरी नक्षीतला अन् जिगान चकचकतेल्या शेंडीचा नारळ तयार झाला, की बघताना तहानभूक हरपून जायची. लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणं अन् लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला पाहिल्या म्हणजे तासन्तास बघत राहावंसं वाटायचं. जिनगरांचा मामा लई कसबी माणूस पाळण्यावरच्या खेळण्यासाठी राघुमैना तर अशा करायचा की खन्या खोट्यातली फसगत व्हावी’ खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची शोभा तर अशी भुलवणारी. की काय सांगावं ।
खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या त्या निमित्तान बुरूड गल्लीला गेलं, की तिथल्या खळ्या, सुप, करड्या, चाळण्या, परड, टोपल्या, पेट्या, पाळणे, चटया, खुर्च्या, टेबल बघण्याजोगी असायची. कारागिरीची लई किमया. एकेकाचा हात या कामी असा सरावलेला असायचा, की पाहणारानं वाहवा मांडलीच पाहिजे. सगळं कस मजबूत अन् देखणं, जउभारपण नाही. फुल वेचण्यासाठी बुरडाघरची परडी आमच्या हातात अशी नखन्यानं तोरा गारावनी, की गावातल्यांनी विचाराय “कुठन आणलीय
गाऽऽही परडी आमच्या पोरींलापण मिळल काय ?” तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी अशा वेळी तोंडावर हसू फुटायचन् ऐटी मिरवावी कारागिरीची एकेक वस्तू लागायचीच. पिढ्यानपिढ्या वाटायची.
ऐटीवरून निघाल म्हणून सांगते हा आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दाडगा नाद ठिपक्यांच्या तान्हेतऱ्हेच्या रांगोळया अंगणात ती अशी काढायची, की त्या भुईफुलांना बघून उभ्या करायचा. गावानं हेवा करावा!
आम्ही मुली तिच्या हाताखाली. शेणान सारवायचं काम आमच्याकडं ती सांगेल त्या रीतीन आम्ही ठिपक्या मांडायचो आणि मग तिच्या चिमटीतली शिरगोळ्याच्या पिठाची धार अशी गिरवायची तिच्या हाताबरहुकूम की पाहणारानं तोंडात बोट घातलंच पाहिजे!
आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती. आमच्याच वयाची. एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो, तर तिथं बाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिनसा इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हालवत एकजण उभी. लाकडाच्या मुठींना अडकवलेला वाखाचा कच्चा धागा, हिच्या हातांच्या अस्सल गिरक्यांसरशी पीळ धारण करायचा अन् मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एकात एक गुंफीत झक्कासपैकी दोरखंड तयार करायचा. फार सुंदर होती ही हातचलाखी’ कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची.
शिकी, मुस्की, गोफण, चापत्या, दोर, कासरे, पिशव्या असलं काय काय शेतकऱ्याच्या घरात लागणार विष मापैकी तयार व्हायच घेऊस वाटायच काद, बटाटे ठेवायला सेल चौकानातल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून यायच्या. ताकाचा डेरा घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान धाटणीची दोरी यायची. आपली कोणती एक कला जोपासणारी अन् त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी येरझारायची.
सुतारानं यावं अन् लाकडी खेळणी देऊन जाब. पालख-पाळणा आणून दयावा डाव, रवी घेऊन यावं. घरातले खांब त्याच्याच हातचे दरवाजे तोच
तीच गोष्ट शिष्याची. आमचे कपडे तर तो शिवून आणायचाच, पण रंगीबेरंगी तुकडेपण घेऊन यायचा. आमची आजी त्यांतून भावल्या करायची. अंगडी, टोपडी, नऊ खणाची चोळी, पायघोळ परकर, मुलांसाठी पांघरुणं, मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायची.
लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी ती अशी शिवायची, की घरोघरची मागणी आलीच पाहिजेल बारशाच्या वेळी कुंची तर अशी फैनाबाज शिवायची ती, की माहेरवाशिणीचा रुबाब सासरी जोकला गेलाच पाहिजेत, गुणगानांसह ज्याच्या त्याच्याजवळ ‘
– डॉ. सरोजिनी बाबर