१. इतिहास म्हणजे काय ?

१.१ इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र

१.२ इतिहासाची शास्त्रीय पद्धत

१.३ इतिहास आणि आपण

१.४ भूतकाळ आणि भविष्यकाळ

१.१ इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र

गेल्या वर्षी चौथ्या इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्यस्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केला. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे चारशे वर्षापूर्वीचा काळ. यालाच आपण चारशे वर्षे ‘जुना’ किंवा चारशे वर्षांपूर्वी ‘होऊन गेलेला’ काळ असेही म्हणू शकतो.

आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो.आत्ता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर; किंवा आज, काल, उद्या; किंवा या वर्षी, पुढील वर्षी इत्यादी शब्दप्रयोग करताना आपल्या नकळत आपण मनातल्या मनात काळ मोजत असतो. यामध्ये ‘आत्ता’, ‘आज’, ‘या वर्षी’ इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमानकाळ. ‘थोड्या वेळापूर्वी’, ‘काल’, ‘गेल्या वर्षी’ इत्यादी शब्द भूतकाळ दर्शवतात. ‘थोड्या वेळानंतर’, ‘उद्या’, ‘पुढील वर्षी’ इत्यादी शब्दांनी भविष्यकाळ समजतो. निघून गेलेला क्षण हा भूतकाळ असतो. आत्ताचा चालू क्षण हा वर्तमानकाळ असतो. भविष्यकाळ हा अजून यायचा असतो.

भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ, आज आपले वय दहा वर्षे असेल, तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात दहा वर्षांपूर्वी घडली, असा त्याचा अर्थ होईल. त्याचप्रमाणे दहा वर्षांनी म्हणजे भविष्यकाळात आपले वय वीस वर्षे असेल. आपल्या जन्मदिवसापासून आजपर्यंतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला, म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील, भूतकाळ होय. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला ‘इतिहास’ म्हणतात.

१.२ इतिहासाची शास्त्रीय पद्धत 

इयत्ता तिसरी व चौथीमध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हापुन्हा तपासून पाहता येणे, हे या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात.

आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. असे असले, तरी आजीआजोबा, आईवडील इत्यादी माणसे आपल्या लहानपणच्या गमतीच्या गोष्टी सांगत असतात. त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात, तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो. अशा वेळेस नेमके बरोबर कोणते असा प्रश्न आपल्याला पडतो. नेमके बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टींची बारकाईने तपासणी करावी लागते.

भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते. त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. असे असले, तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो. त्यासाठी उजवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते.. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही.

प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा-कहाण्या, लोकगीते इत्यादींना ‘इतिहासाची साधने’ असे म्हणतात. या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार असतात. भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले, याचा शोधण्यासाठी या साधनांमधून मिळणान्या पुराव्यांच्या खरेखोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही शास्त्रीय पद्धत होय.

१.३ इतिहास आणि आपण

शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदा., पर्यावरणशास्त्र, पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यांसारखे प्रश्न आणि त्यांवरचे उपाय यांचा अभ्यास करते, त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो.

माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामांतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो, उदा. एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या साहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात. गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. परंतु गावातील लोकामध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही, तर मात्र गावाच्या विकामात अब निर्माण होता.

भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, अनिष्ट काय, यांचा अभ्यास करणे शक्य होते. वर्तमानकाळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल, हेही इतिहासाच्या अभ्यासातून समजते.

भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रांतून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्यही इतिहास करतो. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. तसेच, माणसांच्या जीवनपद्धतीत कसे बदल होत गेले, हेसुद्धा समजून घेता येते..

प्रत्येक गावाचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. तसेच, पृथ्वी, पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणिसृष्टी, माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास आहे. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडवून आणान्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची माहिती मिळते.

२.४ भूतकाळ आणि भविष्यका

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे साखळीने जोडलेले विविध घटनांच्या अखंड उदा., मिळवण्यासाठी इंग्रज सरकारविरुद्ध असतात. भारतीयांनी स्वातंत्र्य  लढा दिला, एक ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. असे म्हणता येईल, की स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्यलढा या कृतीचा परिणाम आहे.

आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो. उदा., फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यांतून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा करावा, हे शिकून घेतले.

त्याने पुढे चाकाचा शोध लावला. पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टीमध्ये भर घातली. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित होत गेले. ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते.