नैसर्गिक संसाधने
यावरून असे लक्षात येईल, की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजेच हवेत आहेत. काही घटक पाण्यात आहेत, तर काही घटक जमिनीवर आहेत. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तीनही आवरणांत असतो. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात. पृथ्वीची ही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत. हे आपण मागील इयत्तेत शिकलो आहोत.
पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. यांपैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला आकृती १.२ वरून लक्षात येईल…
हवा
पृथ्वीसभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कॉर्बन डायॉक्साइड, सहा निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायॉक्साइड, सल्फर डायॉक्साइड, पाण्याची वाफ, धूलीकण या सर्वांचा समावेश होतो. तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे ८०% वायू असतात, तर स्थितांबरात हे प्रमाण सुमारे १९% टक्के असते. पुढे दलांबर व आयनांबरामध्ये वायूंचे हे प्रमाण कमी होत जाते. बाह्यांबर व त्यापलीकडे वायू आढळत नाहीत.
तुमच्या असे लक्षात येईल, की पृथ्वीसभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूंबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ (बाष्प) यांचा देखील समावेश हवेत होतो. हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे पृष्ठभागापासून वर जावे तसतसे कमी होत जाते .
हवेतील घटकांचे प्रमाण व काही उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.
वरील सर्व चित्रांत धुराचे उत्सर्जन विविध माध्यमांतून होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो, याला वायू प्रदूषण म्हणतात. वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यांमधल्या इंधनांच्या ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यांसारख्या इंधनांच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे.
ओझोनचा थर – संरक्षक कवच
वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन (0,) वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते.
वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यांमध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लुरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो.
ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी १६ सप्टेंबर हा दिवस जगभर ‘ओझोन संरक्षण दिन’ म्हणून मानला जातो.
पाणी
करून पहा.
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरात पाण्याचा वापर कोणकोणत्या कामांसाठी व किती होतो ते पहा. त्याची नोंद सोबतच्या तक्त्यात करा. याबाबत वर्गात चर्चा करा. एकूण वापरलेल्या पाण्याला घरातील व्यक्तींच्या संख्येने भागा. यावरून तुम्हांला प्रत्येक व्यक्तीला पि वापरासाठी किती पाणी लागेल ते कळेल.
वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात येईल, की पा पाण्याशिवाय दिवस काढणे हे आपल्या सर्वांना जवळजवळ अशक्य आहे. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज तीन ते चार लीटर पाणी पिण्याची गरज असते. इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी-जास्त असते. यावरूनच आपल्याला पाण्याचे महत्त्व लक्षात येते.
हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. पाण्याची काही वैशिष्ट्ये आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो आहोत.
पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील पाणी खारट आहे. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. तरीदेखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहे.
इतर पशू, पक्षी वरीलप्रमाणे पाण्याचा वापर करतात का ? आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते हे आपण शिकलो आहोत. जलचक्राला बाष्प पुरवण्याचे मोठे काम महासागराकडून होत असते. त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात.
पाणी मिळण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळी, झरे, सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच, त्याशिवाय मानव कूपनलिका, विहीरी खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा करत असतो. यासोबतच मानवाने नद्यांवर बंधारे, लहान मोठी धरणेही बांधली आहेत.
वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे. यामुळेच पाणीटंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
जमीन
तुमच्या असे लक्षात येईल, की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा रूपात पाहता येते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपणही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यांसाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनांतील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल व भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनली आहे आपण पाहू.
१. प्लॅस्टिकची पारदर्शक बाटली, मूठभर माती, थोडे दगड, वाळू, पालापाचोळा आणि पाणी घ्या.
२. बाटलीचा निमूळता असलेला वरचा भाग कापा. खालच्या भागात उरलेले साहित्य टाका व नंतर त्यात पाणी टाका.
३. त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्या व त्याचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा व उत्तरे दया.
- बाटलीतील मिश्रण कसे दिसते आहे ?
- त्यात थर आढळतात काय ?
- वरपासून खालपर्यंत या थरांमध्ये काय काय दिसत आहे ?
पृथ्वीवरील जमीन देखील याचप्रमाणे आपल्याला पहावयास मिळते तुमच्या जवळपास जर पाईपलाईन टाकायचे काम चालले असेल, तर त्यासाठी खणलेल्या खड्ड्यांचे नीट निरीक्षण करा सोबतच्या आकृतीप्रमाणे तुम्हांला जमिनीच्या खाली काही घर आढळतील
परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वांत वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होतो याला ‘कुथितमुदा’ म्हणतात हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी कीटकांनीयुक्त असते. या मातीच्या थराला मृदा म्हणतात त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकाचे तुकडे आढळतात ही मृदा अपरिपक्व असते. त्यापुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. हे थर मूळ खडकांचे असतात मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकांमधून येतात म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात
मृदा तयार होण्याची क्रिया
जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा व पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यांपासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर-घुशींसारखे कृदंत प्राणीही आढळतात तसेच जमिनीवरील झाडांची मुळेदेखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात मृदानिर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचा २५ सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्षे लागतात,
पूरपरिस्थिती, वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतींमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. म्हणूनच मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन वाढवणे. गवत, झाडे, झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप कमी होते.
एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषांपासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली होती. खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल/केरोसीन, पॅराफीन ही इंधने, तर डांबर, मेण यांसारखे उपयुक्त पदार्थ मिळतात.
पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर सजीव करतात. या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करतो. या संसाधनांच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला, तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. पुढील तक्ता पहा.
वरील कोष्टकाचा विचार करता ही संसाधने जरी अल्प प्रमाणात असली, तरी ती सर्व सजीवांसाठी पुरेशी आहेत. फक्त मानवाने स्वतः च्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणजेच या संसाधनांचा त्याने तारतम्याने वापर करायला हवा व ती स्वतःबरोबरच इतर सर्व सजीवांसाठी देखील आहेत याचे भान ठेवायला हवे.