कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळरेषेत पंधरा-वीस झोपड्या होत्या. त्यातल्याच एका झोपडीत आम्ही राहत होतो. मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिती, त्यापण पावसाचं पाणी मुरून पडण्याच्या बेतात होत्या. फुटकीतुटकी कौल चरती टाकली होती. आतली जमीन तर सतत ओलसरच असायची. त्यामुळे त्या झोपडीत नेहमी कुबट वास यायचा उठून उभं राहिलं तर वरची कौल डोक्याला धाड्कन लागायची. मोठ्या माणसांना उभं राहून कसलंच काम करता येत नव्हत.
झोपडीत एका बाजूला चार-पाच फाटक्या हित बसून खायाच बाकळा पडलेल्या. त्याच वाकळा आम्ही अंथरायला- पांघरायला वापरत असू. सात-आठ जरमनची ताटं चिंध्यांची, फाटक्या कपड्यांची दोन-तीन गाठोडी, पाण्यासाठी दोन जरमनची पातेली, एक पत्र्याची उद्या म्होरल्या गावाला जानार हायती. तवा आजच घागर आणि अशोकदादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी, एवढाच आमच्या घरातला एकूण संसार शिवाय दारात एक राजण होता.
त्या झोपडीत अशोकदादा त्याची बायको सुमिती, लिंगाप्पा, मन्याप्पा, मधू आणि माझा चुलत भाऊ सिदपू असे सहाजण राहत होते. तशातच तीन व्हय?” चार दिवसापासून माझे वडील, आई, मी आणि माझी बहीण मंगल असे आम्ही आणखी चारजणही तियच आलो होतो. सर्वांना झोपायलासुद्धा जागा पुरत
उद्या आम्हांला पुन्हा बोरगावला पालांवर जायचं होत. आई आणि बाबा जायची तयारी करत होते. आईन दोन-तीन ताटल्या, वेगवेगळ्या रंगाची जोडलेली दोन पातळ एका मोठ्या पिशवीत भरली. बाबाही बारीकसारीक सामान दुसन्या पिशवीत भ लागले होते, तोच अशोकदादा ड्युटीवरून घरी आला. तो आईला सामान भरताना बघून म्हणाला,
“आई, कुठे जायची तयारी चाललीय?’ आई म्हणाली, “जातू गागाला… किती दीस
दादानं बाबांना विचारलं, “बाबा, कुठल्या गावाला जाणार?”
“आपल्या लोकांची बोरगावला पाल हायती. जायला पायजी.” बाबा म्हणाले.
आई मला म्हणाली, “इमे. गत काय हुबी हायीस. तुजी कापडं आन हिकडं. उशीर हुनुया निधाया. आईचं बोलणं ऐकून दादा म्हणाला, “आई, इमीला घेऊन जाऊ नको. मी तिला शाळेत घालणाराय.
शाळेत म्हटल्याबरोबर बाबांचं डोकं भडकलं.
बाबा रागानेच दादाला म्हणाले, “तुज डोस्क बिस्कं फिरल का काय? पुरीला साळंत पालतु म्हणतूस लय शिकलास महजी शेना झालास
दादा शांत आवाजात म्हणाला, “बाबा, तुम्ही उगीच चिडता त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? चांगली शिकली तर कुठतरी नोकरी करीत आजकाल शिक्षणावर सगळ चालत .दादाचा शहाणपणा बाबांना पटणार होता धोडाच ?
बाबा म्हणाले, “साळा सिकून काय करायचं? घरात खायाला आन न्हाय आन् हिच्या साळला पैक कुल आनायच? त्या परीस लगीनच कुट ठरतय का ?
“तिच्या शाळेचा खर्च मी बघतो. तुम्ही काळजी करू नका आणि लग्न करायला काय ती मोठी बाई झालीय का? आता कुठे ती सहा वर्षांची आहे. तुम्ही तिकड काय पण करा. मी इमीला शाळेत घालणाराय” दादा म्हणाला इतका वेळ गप्प बसलेली आई म्हणाली, “तुजा असंच केलं तुज्या साळसाठी म्या तुज्या बाचा तय मार खाल्ला तुजी आजी बरी, ती तुमच्या साळसाठी गावात न्हायली भाकरी करून घालाला तवा तुमी साळा शिकला. तुला, लिंग्याला आन् जिन्नूला म्हातारीनं संबाळल. आमी आस भीक मागत फिरत हुतू.. तुज्यामुळंच तर मदया, मन्या साळा शिकल्याती तुज्यासारखीच ती पोर कुटंतर काम करून खात्याली तू म्हणतूस तर इमीला ठिव तुज्याजवळ सिकली तर सिकेल. “
बाबा आईकडे रागाने बघत म्हणाले, मायलेकर काय करायच त्ये करा. उद्या पुरीचं लगीन झाल न्हाय म्हंजी घरात ठिवून बसाला लागल. ” काय?” बाबांचं बोलणं ऐकून बहिनी गालातल्या गालात हसली.
भावानं म्हणजे दाजीनं ती पायानं अधू असल्यामुळे उद्या कोणी लम केल नाही तर कुठंतरी नोकरी तर करीत, म्हणून शाळेत घातल होत.
आईबाबा मंगल आणि मधूला घेऊन बोरगावला पालावर गेले
मला करमत नव्हत सारखी आईची आठवण येत होती. पहिल्यांदाच आईला सोडून राहायची वेळ आली होती.
आई जाताना म्हणाली होती, “माजी सब काडत बसू नगू साळत जात जा वयनीवर भांडू नगू ध्यान दिवून साळा सिक म्हंजी जाल,
दादा आठ वाजता कामावर निघाला होता. दादाला उशीर झाला होता. दादा गढबढीन कपडे घालत होता. कपडे घालता घालता तो वहिनीला म्हणाला, “सुमे, आज इमीला शाळेत घेऊन जा. तिचं नाव शाळेत घालून ये मला वेळ नाही. नाहीतर मीच गेलो असतो. पोर कुठे गेली? घरात कोणीच नाही? पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव
दादा कामावर गेला. वहिनीनं घरातली सर्व काम बा असाच हाय तुज्या बक्ताला साळंत घालताना भराभर आवरली.
आमच्या घरापासून शाळा फार जवळ होती. चार-पाच झोपड्या ओलांडल्या, की दगडी बांधकाम केलेली एक मोठी शाळा होती. तिथंच पहिलीचा वर्ग भरत होता. शाळेशेजारीच मोठे वडाच झाड होत.
वहिनी आणि मी शाळेत आलो वहिनीन बाईंना नमस्कार केला. वहिनीची बाईंबरोबर आधीची ओळख होती. माझे भाऊही त्याच शाळेत शिकत होते. फक्त त्यांचे वर्ग दुसरीकडे भरत होते. वहिनी म्हणाली, “हिचं नाव शाळेत घालायचंय.
बाईनी माझ्याकडे निरखून बघितलं आणि माझी माहिती विसरायला सुरुवात केली, “मुलीचं पूर्ण नाव?
वहिनी म्हणाली, “विमल नामदेव भोसले”.
बाईंनी नोंदवहीत लिहून घेतल
“हिची जन्मतारीख सांगा.
जन्मतारीख कोणाला माहिती होती? मी जन्मलेल वर्ष मात्र वहिनीला माहिती होत, विन जन्मतारीख सांगून टाकली
बाईंनी सर्व माहिती लिहून घेतली
“नारळ आणला का?” बाईनी वहिनीला विचारल.
वहिनी बाईच्या तोंडाकडे बघू लागली.
बाई थोडा वेळ थांबून पुन्हा म्हणाल्या, ‘शाळेत नाव घातलं म्हणजे नारळ किंवा सव्वा रुपया दयावा लागतो तुम्हांला माहीत नाही का ?”
बहिनी म्हणाली, “मी नारळ नाही आणला. पैसे तर माझ्याजवळ नाहीत. नंतर आणून देईन बहिनी घरी गेली. मी शाळेत बसले,
बाई वर्गात शिकवू लागल्या. थोड्या वेळान बाईनी मला जवळ बोलावलं. माझी पाटी घेतली. ‘ग, म, भ, न’ ही चार मुळाक्षरं लिहून दिली आणि ती गिरवायला सांगितलं.
मी माझ्या जागेवर येऊन बसले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी आले माझे सगळे भाऊही जेवणासाठी घरी आले होते. आम्ही जेवण करतो न करतो, तोपर्यंत शाळेची घंटा झाली.
वहिनीन पैशासाठी दोन-तीन डबे उपडून बघितले त्यांत काहीच नव्हत.
आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती. आम्ही तिला ‘लताक्का म्हणायचो. वहिनी लताक्काच्या घरात गेली. मीपण तिच्या मागोमाग गेले वहिनी लतावकाला म्हणाली, ‘लतास्का, तुमच्याजवळ सव्वा रुपया आहे का? इमीच्या शाळेत दयायचाय मी ‘ते’ आल्यावर परत करीन.
लताक्कान घरात सगळी शोधाशोध केली आणि माझ्या हातावर सव्वा रुपया ठेवला. मी तो घेऊन शाळेत गेले आणि माझं शाळेच नक्की झालं?
विमल मोरे