२१. संतवाणी

पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ।।१।।

आषाढी कार्तिकी महापर्वें थोर । भजनाचा गजर करिती तेथें ।।२।।

साधुसंत थोर पताकांचा भार । मुखीं तो उच्चार नामामृत ।।३।।

आनंदाचा काला गोपाळकाला केला । हृदयीं बिंबला नरहरी ।।४।।

– संत नरहरी सोनार

संत नरहरी सोनार – संत नरहरी सोनार हे महाराष्ट्रातील थाेर संत कवी होते. प्रस्तुत अभंगात आषाढी-कार्तिकी वारी करून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला नित्यनेमाने जाणाऱ्या वारकऱ्यांचे वर्णन केले आहे.

माझें माहेर पंढरी । सुखें नांदु भीमातीरीं ।।१।।

येथें आहे माय बाप । हरे ताप दरुशनें ।।२।।

निवारिली तळमळ चिंता । गेली व्यथा अंतरींची ।।३।।

कैशी विटेवरी शोभली । पाहुनि कान्होपात्रा धाली ।।४।।

– संत कान्होपात्रा

संत कान्होपात्रा – सत कान ं ्होपात्रा या महाराष्ट्रातील थोर सत कं वयित्री. प्रस्तुत अभगात कान ं ्होपात्रा म्हणतात, की ‘माझे माहेर पढरपूर आ ं हे. तिथे भीमा नदीच्या तीरावर सुख, आनंद आहे. पाडुरं ग ं हे माझे आईवडील आहेत. विटेवर उभ्या असलेल्या पाडुरं गाच ं ्या दर्शनाने माझ्या मनातील चिंता, व्यथा, तळमळ दूर होते.’