२१. संतवाणी

आम्हां घरीं धन शब्दांचींच रत्नें ।

 शब्दांचींच शस्त्रें यत्न करूं ।।१।।

 शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन ।

शब्द वाटूं धन जनलोकां ।।२।।

 तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव ।

शब्देंचि गौरव पूजा करूं ।।३।।