२३. छत्रपती राजर्षी शाहूमहाराज

१८९६ चा पावसाळा कोरडाच गेला. प्रजेला अप्रूप होतं. नंतरच्या वर्षीही उन्हाची तल्खली RFLC20 बाढू लागली होती. आभाळात कोरड ढंग जमायचे, निघून जायचे प्रजेच्या डोळ्यांतील पाणीसुद्धा आटलं. कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला

राजर्षी शाहूमहाराजांविषयी लोक बोलायला लागले, ‘इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं. काय रं बाबा, आबाळाची कुन्हाड पडली र मानंबर!’

 जनावरं उपाशी पडली. बळीराजाचं काळीज दगडाचं झालं. गावपांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली. गोरगरीब करपून जायला लागले, गावंच्या गावं ओस पडायला लागली.

शाहूमहाराजांचा जीव वरखाली व्हायला लागला. त्यांनी दिवाण बहाद्दूर रघुनाथराव सबनीसांना व निवडक अधिकाऱ्यांना बोलावलं. घोड्यावरून दौरा सुरू झाला. थंडीचे दिवस, बोचऱ्या थंडीची जाणीव घोड्यावरून काही होत नव्हती; पण फाटकंतुटकं पांघरून रानोमाळ फिरणाऱ्या गरीब रयतेची अवस्था महाराजांना कळत होती. गडहिंग्लज, रायबाग, कटकोळ भागात दुष्काळान झोडपलेल्या रयतेला धीर देत महाराज फिरत होते. भर दुपारी उन्हातान्हाचा मारा न जुमानता महाराज स्वतः भेटायला येत असल्यान पाण्याचा प्रश्नही ज्वलंतच होता. महाराजांनी

नव्या वर्षाच्या सुरुवातीला भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा सुरू झाला. हिरवीगार रानं उन्हानं करपून गेली होती. महाराज रानामाळान पायी जात होते. झोपडी झोपडीत जाऊन विचारपूस करत होते महाराजांच्या कानावर प्रजेचं गान्हाण येत होत.

महाराजांनी व्यापान्यांची बैठक बोलावली. बंधुनो, दुष्काळानं हाहाकार माजवलेला तुम्ही बघतच आहात. मी स्वतः संस्थानात दौरा काढून प्रजेची दयनीय अवस्था पाहिलेली आहे. तुम्ही जशी माझी प्रजा, तशीच शेतकरी आणि गोरगरीब मजूरही माझीच प्रजा. तुम्ही धान्याच्या किमती कमी केल्या, तर दोन वेळेला चार घास त्याच्या पोटात जातील तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किंमतीला करा. खरेदीच्या दरात प्रजेला धान्य मिळायला लागलं, तर प्रजा तुम्हांला दुवा देईल आणि आम्ही नुकसान होऊ देणार नाही. तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ.

त्यामुळे धान्याच्या किमती उतरल्या. प्रजेला रास्त दरात धान्य घ्यायला थोडंतरी परवडायला लागलं. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काही व्यापान्यांनी एकत्र येऊन थोडी पुंजी जमा केली त्या रकमेमधून एक स्वस्त धान्य दुकान सुरू झालं तिथून प्रजेला स्वस्त धान्य योग्य प्रमाणावर मिळायला लागल.

शहरातल्या बाकीच्या व्यापाऱ्यांवर या गोष्टीचा चांगला परिणाम झाला. त्यांनीही फायदा न घेता ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर धान्य विकायला सुरुवात केली. महाराजांनी दरबारातून बिनव्याजी कर्ज चाटायचा हुकूम दिला, व्यापारी कर्ज घेत, त्यातून धान्याची खरेदी करत ते धान्य विकत आणि रक्कम दरबारी जमा करत. अशी एक व्यवस्था तयार केली.

 युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या. ‘विहिरीतला महाराजानी दरबारात सांगितलं, “प्रजेला धान्य गाळ काढा. नदीकाठी विहिरी खोदा दरबारातून आणून दिल, जनावरांना चारापाणी आणून दिल लागेल तेवढा खर्च करा. महाराजांनी आदेश दिले. म्हणजे तेवढ्यावर भागत नाही. बाकी सगळं विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसा नाही. त्यांना पैसा देण्यासाठी काम काढायची. रोजगार हमी योजना राबवायची. आपल्याकडे रस्ते चांगले नाहीत, ते करून घ्या. ब्रिटिश हद्दीतसुद्धा रस्त्याची काम काढा.’

त्यांनी राज्यातल्या नदीनाल्यांची पाहणी सुरू केली आणि बांधकाम खात्यातल्या इंजिनिअर्सना घेऊन आखणी करायच्या तयारीला लागले. जिथं शक्य होत, तिथं नदी-नाल्यांवर बंधारे घालून वाया जाणारं पाणी अडवायची योजना राबवण्यात आली. नवे तलाव कुठे कुठे बांधता येतील, याचीही पाहणी झाली. बडगाव, शिरोळ, रुकडी या गावांत नवे तलाव बांधून लोकांना पाणी दयायला सुरुवात केली.

विहिरींचा गाळ काढून त्यांची खोली-रुंदी वाढवल्यामुळे तिथं पाणी साठायला लागलं. प्रजेची गरजेपुरत्या पाण्याची सोय झाली. शेतकन्यांची जित्राब उपासपोटी मरू लागली. महाराजांनी जनावरांच्या छावण्या उभ्या करून जनावर आणली. त्यांना वैरण, दाणागोटा देऊ लागले. राज्यानं उभारलेल्या सरकारी बट्टीत गरिबांची, शेतकऱ्याची जित्राब जगली. संस्थानच्या मालकीच्या जंगलात गुरे चारायला मोकळीक देण्यात आली.

महाराजांनी हुकूम दिला, “सगळा खजिना रिकामा करा, पण शेतकऱ्यांना जगवा, जनावरांना जगवा, प्रजेला जगवा कुणाची हेळसांड होऊ देऊ नका.

भराभर चक्रं फिरली. महाराज स्वतः फिरत होते. रस्त्याची काम होऊ लागली. गरीब रयतेच्या हातात चार पैसे पडू लागले.

महाराजांनी आणखीन एक गोष्ट हेरली होती. रस्त्याच्या कामावर बायका येतात. त्या कामात असतात, तेव्हा त्यांची चिल्लीपिल्ली झाडाखाली आणि इकडं तिकडं फिरतात, उपाशी राहतात, रडतात. त्यांच्याकडे कोण बघत नाही. म्हणून त्यांनी दरबारला हुकूम दिला, ‘आजच्या आज छावण्या उघडा आया नेमा आणि त्या पोराबाळांची व्यवस्था करा, प्रत्येक कामावर ही व्यवस्था करा,’

महाराजांच्या हुकमान रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी शिशु संगोपनगृह चालू झाली. बाया बापड्यांची करपणारी माया सावलीत विसावली.

श्रीराम पचिंद्रे