२४.रोजनिशी

वैभवला एक नवीन छंद जडला आहे. तो नियमितपणेरोजनिशी लिहितो. त्याने लिहिलेली तीन दिवसांची रोजनिशी वाचूया.

१५ नोव्हेंबर शाळेजवळच्या बस स्टॉपवरून संध्याकाळी साडे पाच वाजता बसमध्ये चढलो. एक आजोबा आणि त्यांची लहानगी नात यांच्याजवळ मला जागा मिळाली. कंडक्टरनेमाझा पास बघितला व आजोबांकडे तिकिटाचे पैसे मागू लागला. आजोबांनी खिशात हात घातला; पण त्यांच्या हाताला पैशाचेपाकीट लागेना. कंडक्टर म्हणाला, “अहो आजोबा! लवकर पैसे काढा.” आजोबा म्हणाले, ‘‘बापरे! पैशांचेपाकीट बसस्टॉपवर कुणीतरी मारले वाटते. घरून निघताना मी ते खिशात टाकले होते.” कंडक्टर म्हणाला, “त्याला मी काय करू? तुम्हांला नीट सांभाळता येत नाही. चला पुढल्या स्टॉपवर उतरून जा.” चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोरानेरडू लागली. आजोबाही कावरेबावरेझाले. मी दप्तराच्या खिशात हात घालून माझेखाऊचे पैसेकाढले, त्या पैशांतून आजोबांचेव त्या मुलीचे तिकीट काढले. माझ्याजवळचा बिस्किटाचा पुडा छोटीला दिला. तिनेडोळे पुसले. ती खुदकन हसली.

१६ नोव्हेंबर शाळेच्या सहलीबरोबर ‘नागझरी’ ला गेलो होतो. रस्त्यात एक शिवार लागले. शिवारातील कणसे, ओंब्या पाहिल्या. तेथे हरभऱ्याचे डहाळे लागले होते. ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. शेतात घुसलो आणि डहाळेउपटू लागलो. तेवढ्यात तिकडून कोणीतरी जोरात ओरडले. शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय आम्ही डहाळेउपटले, हेपाहून गुरुजी आमच्यावर खूप रागावले. आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली. खरंच, आमचं चुकलंच होतं. शिवार फिरून झाल्यावर परतताना मात्र त्या शेतकऱ्याने आम्हां सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसेडहाळेही दिले.

१७ नोव्हेेंबर आज वर्गातील आठ-दहा मुलांना मुख्याध्यापकांनी विशेष कामासाठी बोलावले होते. आम्ही खाली रांगेत जाताना राजूने मला जोरात ढकलले. त्याला सर्वांत पुढे उभे राहायचे होते आणि मलासुद्धा. आमच्या दोघांमध्येवादावादी सुरू झाली. तेवढ्यात आमचे सर आले. त्यांनी दोघांनाही वर्गात बोलावले. वर्गात गेल्यावर आम्हांदोघांनाही सर खूप रागावले अन् म्हणाले, ‘‘रांगेत सर्वांत पुढे राहण्यासाठी भांडता? त्यापेक्षा सगळ्या कामांत सर्वांत पुढे कसे राहाल याकडे लक्ष द्या.’’ आम्ही दोघेही खाली मान घालून वर्गात बसलो. क्षुल्लक भांडणामुळेच मुख्याध्यापकांकडून मिळणारी विशेष कामाची आमची संधी हुकली होती, म्हणून मला सारखे वाईट वाटत राहिले.

१८ नोव्हेेंबर आज माझा वाढदिवस होता. खूप मजा आली. ……..