सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे, फळे, पटाईत होता. पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल. त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते. अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे.
सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडापूजनाने होते. आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडापूजनाला विशेष महत्त्व आहे.
होळी पौर्णिमेला दांडापूजन झाले, की सातपुड्यातील वाड्यापाड्यांतून ढोलांचा आवाज घुमू लागतो. कुडाच्या घराच्या सादीकोपऱ्यात, खुटीला, आढ्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात. मुख्य होळीच्या पंधरा दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते. लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्याभोवती फेर धरून नाचतात. मुले होळीनृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून ढोलाचा आवाज सान्या गावात, आसमंतात घुमू लागतो. अख्ख्या सातपुड्यात ढोलांवर थाप पडू लागते. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी चालू होते. पोटापाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे येतात.
आमच्या गावातील आमश्या डोहल्या आपल्या चिल्यापिल्यांना घेऊन सणासाठी गावात यायचा. अख्ख्या सातपुड्यात आमश्या डोहल्या प्रसिद्ध होता. आमश्या ढोल वाजवू लागला, की वाड्या पाड्यांवरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत.
ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. त्यावर कातडी चढवतात. कुणी ढोलाची पाने बसवतात. कुणी दोन्या आवळतात. ढोलासाठी लाकूड कोणते वापरायचे ? तो तासायचा कसा? त्याला कोणत्या प्राण्याच्या कातड्याचे पान लावायचे? तो आवळायचा कसा? ढोलाचा नाद अख्ख्या सातपुड्यात घुमवायचा कसा? ही सगळी माहिती आमश्या डोहल्याला होती.. जणूकाही या निसर्गाने त्याला ढोल बनवण्यासाठीच जन्माला घातले होते, म्हणून अख्खा सातपुडाच त्याला आमश्या डोहला म्हणत होता
होळीचा दिवस जवळ आला तसतसे पाड्यावरचे ढोल डोंगरदऱ्यांत आणि साच्या आसमंतात घुमू लागले आमश्याची ढोलावरची थाप मजबूत झाली. ‘यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू. अख्खा सातपुडा दणाणून सोडू, अशी जणू त्याने शपथ घेतली होती. होळीचा दिवस उजाडला. आमश्या सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता. हळूहळू त्याने
ढोलावर थाप मारायला सुरुवात केली. गावातील स्त्री-पुरुष, पोरेबाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागली नकळत नावाला सुरुवात झाली. सर्वजण एकमेकांचा होता. हात धरून बेधुंदपणे नाचत होते. आमश्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता. बघता बघता लहान सहान, थोरामोठ्यांनीही आमश्याच्या भोवती रिंगण धरले नाचाच्या चाली बदलत तहानभूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले. नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली ते समजलेही नाही. पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला. ढोलाचा वेग वाढला नसे नाचणारेही बेधुंद झाले आणि होळी जसजशी विझू लागली तसतसा ढोलाचा वेगही मंदावू लागला. आमश्याची ढोलावरची थाप एकदम मदावली तसा नाच एकदम थांबला. कधीही न थाबणारा आमश्याचा हात कसा काय थांबला, म्हणून सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले आणि एकदम आरडाओरड झाली. आमश्या डोहला ढोलाला सावरत धरतीवर कोसळला होता’ ढोलाच्या नादाबरोबर आमश्याचा श्वास अचानक बंद झाला.
आवाजाचे प्रतिध्वनी सातपुड्याच्या रागारागातून घुमत होते अख्खा गाव डोलीभोवती दुःख गिळत बसला
जंगल्या भगत डोलीजवळ आला त्याने कथा लावली. “आपण या निसर्गातील एक जीव, प्रत्येकाला जन्म आणि मरण निसर्गच देतो झाड जन्माला येते आणि एक दिवस मरते, म्हणून इतर झाडे दुःख करत बसत नाहीत. निसर्गचक्र थांबत नाही. प्राणी-पक्ष्यांचेही तसेच माणूस निसर्गातला एक क्षुल्लक जीव
जंगल्या भगत पुढे बोलू लागला, “आमश्या जन्माला आला होता तर त्याला मरण अटळ आता उद्या त्याला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल. तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल. त्याचं झाड होईल मोठं सागाचं झाड त्याचा कुणीतरी ढोल बनवेल. तो ढोल पुन्हा बाजू लागेल ढोलाच्या रूपाने आमश्या आपल्यातच राहील. डोंगरदऱ्यांतून नाद, लय आणि स्वर घुमू लागतील. आमश्याचा ढोल पुन्हा वाजू लागेल.
सकाळ झाली होती व सूर्यानेही आमश्याचे आमश्याची डोली सजू लागली सजवलेल्या डोलीत अखेरचे दर्शन घेतले होते.
– संजय लोहकरे