२६. पाण्याची गोष्ट

(प्रसंग १ रत्नाच्या घरी)

(मुले शाळेत जायला निघाली. जाताना रत्नाला बोलवायला तिच्या घरी आली )

मीना : (दारात उभी राहून) रत्ना, ए. रत्ना, अग चल की, उशीर झालाय. आज परिपाठाच्या तासभर आधी बोलवलंय ना, पाहणे यायचेत शाळेत. चल पटकन

रत्ना : (धावत येते) आले SSS

मीना : लवकर नीघ बाई. अजून जाताना सकीनाला बोलवायचंय.

रत्ना : तुम्ही निघा गं मला काय लवकर यायला होत नाही. आज मंगळवार, आमच्याकडचा पाण्याचा दिवस सकीनापण पाणीच भरत असेल. तिच्याकडे जाऊन बघा ती येते का.

रवी : तुमच्याकडे पाणी मंगळवारी येत? आमच्याकडे रविवारी येतं, म्हणून मी अन् कौशा रोज लवकर येऊ शकतो

कीशा : (तक्रारीच्या सुरात)
गेल्याच्या गेल्या रविवारी शिवारफेरी बुडली की आपली तरी मी सरांना म्हणाले होते, शिवारफेरी रविवारी ठेवू नका म्हणून पण ते म्हणाले, बाकी दिवशी शाळा सोडून कसं जाणार ?

मोहन : (ऐटीत)
आमच्याकडे पाणी सोमवारी येतं, पण मला काही फरक पडत नाही. माझ्या बाबांनी नळाच्या पाइपाला डायरेक्ट मोटर बसवलीय. पाणी आलं, की नुसत बटण चालू करायचं. लगेच पाणी घरात.

कौशा : (वैतागून) आम्हांला तर रविवारची तयारी शनिवारीच करावी लागते. सगळे हंडे, कळश्या, तपेल्या बादल्या, डबे नेऊन आम्ही रात्रीच रांगेत ठेवतो. सकाळपासून नळाजवळ थांबायचं. नळ फुसफुसायला लागला, की सगळ्यांची धावपळ सुरू होते. कधीकधी तर एखाद्या दम लागलेल्या म्हाताऱ्यासारखा अर्धा-अर्धा तास नळ फुसफुसत राहतो. पाण्याऐवजी नुमती हवा देत राहते

दीपकदादा : रत्नाऽऽऽ, कुठे गेली होतीस ? (मागे) बादली भरून वाहिल्याचा आवाज येतो.)

रत्ना : शीऽऽ, ही पाण्याची कटकट कधी संपणार कुणास ठाऊक!

मोहन : आम्ही पुढे जाऊ का?

दीपकदादा : एss, पाच मिनिटं थांबा. आता पाणी जाईलच. मग सगळे सोबत जा तुम्हाला सगळ्यांना पाण्याची कटकट वाटतीय माझ तर दहावीच वर्ष आहे. दर मंगळवारची सकाळ पाण्यात जाते. आईची दिवसपाळी असली, की आम्हांला दोघांनाच पाणी भराव लागत.

कौशा : आणि शाळेत सर सांगतात, पाण्याची बचत करा. पाणी अडवा पाणी जिरवा पाण्याची बचत करायला पाणी आलं तर पाहिजे, पाणी अडवा, म्हणजे या मोहनच्या घरच्यांसारख अडवायचं का?

दीपकदादा : तुम्हांला मी एक गंमत दाखवतो. थांबा जरा (घरात जाऊन आणतो.) मी आमच्या पर्यावरण अभ्यासाच्या प्रकल्पासाठी एक चिकटवही बनवली. ती वाचा, म्हणजे तुम्हांला पाण्याबद्दलच्या बन्याच गोष्टी समजतील.

(दीपकदादा कोशाच्या हातात चिकटवही देऊन शाळेला जायला निघतो. बाकीचे सर्वजण सकीनाकडे जाऊन सोबत शाळेत जातात.)

(प्रसंग २ शाळेची मधली सुट्टी)

सकीना : SS सगळ्यानी पटकन जेवण आटपा. दीपकदादाची वही वाचायचीय

मोहन:  हो, ना शाळेत आलो तेव्हा परिपाठ,

सकीना चिकटही वाचू लागते.

एखाद्या वर्षी खूप पाऊस पडतो तर कधी अगदीच कमी जेव्हा कमी पाऊस पडतो, तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो पाण्यासाठी वणवण करानी लागते. शेतीसाठी तर राहूच दया, पिण्यासाठीसुद्धा पाणी मिळेनासे होते. अन्नधान्य, जनावरांचा चारा, वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात गावोगावी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो.

याउलट पाऊस पडला, जास्त तर अनेक समस्या निर्माण होतात. नद्या-नाले. तलावांना पूर येतो. शेते, घरे, शाळा, रस्ते पाण्याखाली जातात. पिके नष्ट होतात.

रवी : आता मी वाचतो.

जमिनीतून पाण्याचा उपसा अफाट वाढलाय त्यामुळे भूजलपातळी खालावत चालली आहे वाढते शहरीकरण च औदयोगिकीकरण यामुळे पाण्याचा वापर असाच राहिला, तर लवकरच पिण्याच्या पाण्याची नाई निर्माण होईल. पाण्यानी मनत क पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपल्या मनाने

महत्त्वाचे कर्तव्य आहे जमिनीतल्या पाण्याची खालावत चाललेली पातळी अशीन कमी होत राहिली, तर पाणी संपून जाईल नाही का? पावसाळ्यात पडणारे पाणी असेच बाहून जाते आणि उन्हाळ्यात ना नद्या तलावांत पाणी उरतं, ना विहिरी-कूपनलिकांमध्ये, म्हणूनच आपण सगळ्यांनी पावसाचे पाणी वाया न घालवता जमिनीत मुरवायला हवे. वाहते पाणी अडवून जमिनीखालच्या टाक्या, शेततळी या सर्वांमध्ये साठवायला हवे. जर आपण पाणी अडवून जमिनीत जिरवले नाही, तर जमिनी आपल्याला पाणी कुठून देणार? एक प्रकारे जमीन ही पाण्याची बँक आहे पाणी ही संपत्ती या बँकेत भरून बचत केली तरच भविष्यात पाण्याचा पुरेसा पुरवठा होईल.

कोशा :  आता माझा नंबर

स्वच्छ व निर्धोक पाणी हा आपल्या सगळ्याचा अधिकार आहे आजकाल बसस्टैंड, रेल्वेस्टेशन अशा ठिकाणी एकतर पिण्याचे पाणी मिळत नाही किंवा अनेकदा ते पिण्यालायक नसते म्हणून प्रवासामध्ये पाणी विकत घेण्याची पद्धत गेल्या बारा ते पंधरा वर्षात रूढ झाली आहे. एक लीटर पाण्यासाठी पंधरा ते वीस रुपये मोजावे लागतात रत्ना आता माझ्याकडे वही दया त्यामुळे पैसे नसणारे कोट्यवधी लोक स्वच्छ पाण्यास मुकतात सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध व्हायला हवे.

मीना : आता मी वाचते

पाण्यासाठी वणवण करावी लागते, त्यामुळे अनेक मुलींच्या व स्त्रियाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. देशभरातल्या लाखो मुलामुलींच्या | शिक्षणावर परिणाम होत आहे. मोठ्या शहरामध्ये पाण्याचा अखंड पुरवठा होत असताना काही छोट्या शहरांमध्ये आठवड्यातून किंवा दहा दिवसांतून | एकदाच पाणी मिळते ग्रामीण भागात तर अनेक (ठिकाणी पाण्याचा तुटवडा असल्याने स्वच्छतेचा

(प्रसंग ३ वर्गात)

(मुट्टी संपल्याची घट होते बाकीची मुले वर्गात येतात. सगळ्यांनी ती वाचा नाहीतर आपण अस करूया, त्याच्या पाठोपाठ साही वर्गात येतात व हातात पर्यावरण या सगळ्या माहितीचा तक्ता बनवून वर्गात लावूया अभ्यासाचे पुस्तक घेतात. )

सकीना : (सरांनाही देत) सर आम्हीपण पर्यावरण अभ्यासाच काहीतरी आणलंय.

सर : (वही उपटून पाहतात व खूश होतात.) मुलांनो, पाहा या रत्नाच्या दादानं पाण्याविषयी ही माहिती आणलंय आणि उद्या परिपाठाच्या वेळी शाळेत सगळ्यांना वाचून दाखवूया

रत्ना : – हो. पाण्याची बचत कशी करू शकतो, ते आम्ही लिहून

सगळी मुले : (एका सुरात) महत्त्वाच म्हणजे त्याप्रमाणे प्रत्यक्षात बागूया