२. चला वृत्तेवापरूयात

पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या.

 पृथ्वीगोलावरील आडव्‍या रेषांना काय म्हणतात ?

 विषुववृत्त कोणकोणत्या खंडांतून व महासागरांतून जाते?

 ०° मूळ रेखावृत्त व ०° मूळ अक्षवृत्त (विषुववृत्त) जिथे एकमेकांना छेदतात त्या ठिकाणाभोवती

 अशी खूण करा.

 कोणते महासागर चारही गोलार्धांत विस्तारलेले आहेत ?

 कोणकोणते खंड चारही गोलार्धांत विस्तारलेले आहेत ?

सर्व रेखावृत्ते कोणत ्ते ्या दोन अक्षवृत्तांव र एकत्र येतात? आपण नेहमी पृथ्वीच्या संदर्भान्भा े विविध ठिकाणांबद्दल, प्रदेशांबद्दल, नद्यांबद्यां द्ल, रस्त्यांबद्त्यां द्ल बोलत असतो. ठिकाणाचे स्थान, प्रदेशाचा विस्तार किंवा नदी, रस्ता इत्यादी रेखीय बाबींचा विस्तार अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या आधारे नेमकेपणे सांगता येतो. त्यासाठी अक्षवृत्तेव रेखावृत्ते यांमुळे तयार हाेणाऱ्या वृत्तजाळीचा नेमका वापर कसा करायचा, ते आपण पाहू. शाळेतील जगाचा नकाशा किवं ा पृथ्वीगोल वापरून पुढील वर्णनाचा पडताळा घ्या.

पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते.

उदा., दिल्‍ली हे ठिकाण २८°३६’ ५०” उ. अक्षांश व ७७°१२’ ३” पू. रेखांशावर आहे.

 पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचा विस्तार सांगताना नेहमी त्याच्या सर्वदूर टोकांकडील अक्षवृत्ते व रेखावृत्ते विचारात घेतली जातात. उदा., ऑस्ट्रेलिया देशाचा विस्तार १०° ३०’ द. ते ४३° ३९’ द. अक्षवृत्ते व ११३° पू. ते १५३° ३०’ पू. रेखावृत्तादरम्यान आहे.

 पृथ्वीवरील नदी, रस्ता, सीमा इत्यादी रेषीय बाबींचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात. उदा., आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाऊन अॅलेक्झांड्रिया शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते. व्हिक्टोरिया सराेवराचे स्थान ०°४५’ २१” द. अक्षांश व ३३°२६’ १८” पू. रेखांश आहे. तसेच अॅलेक्झांड्रिया शहराचे वृत्तीय स्थान ३१°१२’ उ. अक्षवृत्त व २९°५५’ ०७” पू. रेखावृत्त आहे. नाईल नदीच्या वृत्तीय विस्तारासाठी हे अक्षांश व रेखांश विचारात घेऊन नाईल नदीचा वृत्तीय विस्तार ०°४५’ द. अक्षांश व ३३° २६’ पू. रेखांशापासून (उगमापासून) ३१° १२’ उ. अक्षांश व २९° ५५’ पू्. रेखांशापर्यंत (मुखापर्यंत) आहे असे सांगता येईल.

* चला, वृत्ते वापरूयात

आकृती २.३ च्या आधारे स्थान व विस्तार यांसंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे द्या

 ब्राझीलची राजधानी ब्राझिलीयाचे स्थान कोणत्या अक्षांश व रेखाशाने ं निश्चित होते?

 ५° १५’ उ. अक्षवृत्त ते ३३° ४५’ द.अक्षवृत्तांदरम्यान असणारा ब्राझील देश कोणकोणत्या रेखावृत्तांदरम्यान आहे?

 ब्राझील या देशाचा उत्‍तर – दक्षिण विस्तार कोणकोणत्या गोलार्धांत आहे?

 ब्राझील या देशाचा पूर्व-पश्चिम विस्तार कोणत्या गोलार्धांत आहे?

 साओ फ्रान्सिस्को नदीचा विस्तार कोणत्या वृत्तांच्या आधारे लिहिता येईल?

 माराजॉ बेटाचे स्थान अक्षवृत्त व रेखावृत्ताच्या आधार

* महत्त्वाची वृत्ते
आपण काही महत्त्वाच्या वृत्तांचा परिचय करून घेऊ.

 विषुववृत्तापासून २३°३०’ उत्तर तसेच २३° ३०’ दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात दोन दिवस लंबरूप पडतात. पृथ्वीवर इतर भागांत सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत. २३° ३०’ उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त व २३°३०’ दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात.

विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील ६६° ३०’ ही दोन अक्षवृत्तेदेखील महत्त्वाची आहेत. विषुववृत्त ते ६६° ३०’ उत्तर व दक्षिण अक्षवृत्तेयादरम्यान वर्षभरात २४ तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात. यांना अनुक्रमे आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त असेही म्हणतात.

  ६६° ३०’ उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून ९०° उत्तर व ९०° दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे २४ तासांपेक्षा जास्त असू शकतो. हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त ६ महिन्यांचा असतो. येथे दिनमानाच्या काळात आकाशात सूर्यक्षितिज समांतर दिसतो. वरील सर्व अक्षवृत्तीय मर्यादा या पृथ्वीचा आस २३°३०’ ने कलण्याशी संबधित आहेत. इयत्तापाचवीमध्ये आसाचे कलणे आपण शिकलो आहाेत.

 सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता यांनुसार पृथ्वीवर विविध तापमानांचे पट्टे (कटिबंध) तयार होतात. तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाबपट्टे निर्माण होतात.

 सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजे प्रदेशानुसार वनस्पती व प्राणी यांमध्येविविधता निर्माण होते.

 ०° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त (Prime Meredian) म्हणून महत्त्वाचे आहे. जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळांशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ‘ग्रिनिचचे रेखावृत्त’ (G.M.T= Greenwich Mean Time) म्हणूनही ओळखले जाते

  १८०° रेखावृत्त हेही एक महत्‍त्‍वाचे रेखावृत्‍त आहे. मूळ रेखावृत्‍तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे १८०° रेखावृत्तांपर्यंत इतर रेखावृत्‍ते काढली जातात. १८०° रेखावृत्ता संदर्भाने ‘आंतरराष्ट्रीय वाररेषा’ विचारात घेतली जाते.

 विषुववृत्त हे बृहतवृत्त अाहे तसेच एकमेकांसमोरील दोन रेखावृत्तेमिळून बृहतवृत्त तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्यांचा वापर होतो.