३. तोडणी

गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा अन् शंकरला उमगलंच नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवताच सगळी बैलं शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैलं अन् पोरांनी बादल्या, कळश्या घेतल्या व नदीवर गेली. दामूनंही आपली बैलं नदीवरून पाणी पाजून आणली. मीरा अन् वसंतनंझिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं तेवढ्यात पाेरं पाणी घेऊन आली. ‘आवं पाचूंदा सोडा,’ लक्ष्मीनं दिलेला आवाज दामूनं ऐकला अाणि पाचूंदा सोडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. तसा रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपआपल्या परीनं बैलांसमोर सरमड मोडून टाकलं. पिठलं-भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरुणं पसरली.

तांबडं फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली. तिनं जर्मलच्या पातेल्यात चहा ठेवला. शंकर जांभई देत उठला. त्यानं अंथरुणाची वळकटी केली. तारानं तोंडावर पोचारा मारला नि बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला. ‘हं घ्या, च्या घ्या.’ शंकरनं चहाचा कप हातात घेतला. ‘शंकर! अरे ये शंकर…आरं मामू चिठ्ठी देऊन गेलाय, थळात जायचंय. निघाया पायजे.’ दामूचा आवाज कानावर पडताच ‘हा आलू…. आलू’, असं म्हणून शंकरनं घटाघटा चहा पोटात ढकलला. सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरवलं अन् थळाचा रस्ता धरला. शंकर-तारानंही आपला काेयता सोबतीला घेऊन मीरा अन् वसंतला बरोबर घेतलं. आज ‘ऊसतोडणी’चा पहिला दिवस असला, तरी उघड्यावर झोपून थंडीनं अंग काकडून निघतं, म्हणून दुपारीच थळातून लवकर परतायचं, असं सगळ्यांनी ठरवलं होतं. थळात पाय ठेवताच शंकरनं उसावर घाव घालायला सुरुवात केली. मीरानं मोळ्या बांधल्या. दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही. हिरवा चारा मिळाल्यानं बैलं मस्त जोगली होती.

 सगळ्यांनी वाढे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं, तसं तारानंही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक गवसलं. ‘वश्या तुपलं पुस्तक…वश्या तुपलं पुस्तक.’ मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली अन् वसंत कोपीबाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला. त्यानं शंकरच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, ‘दादा, मले साळांत कवा धाडणार?’ थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरनं पाह्यलं असल्यानं ‘साळा बिळा काय बी नाय, बस झाली आता तुपली साळा. खाऊन घे…आन् झोप. तांबड्यात तोडीला जायचंहाय. जा, झोप जा,’ असं म्हणून गप्प केलं. शंकरच्या मागे उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाचटानं साळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हबकून गेला होता. त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला, तर मीराला फार वाईट वाटलं.

कोपीबाहेर अंधूक उजेडात तारानं चूल शिलगावून तवा ठेवला. भाकरी थापण्याच्या आवाजानं वसंतला जाग आली. शंकरनंनदीवर जाऊन गुंडभर, तर मीरानं कळशीभर पाणी आणलं. शंकरनंथळात जायची तयारी चालवली होती. मीरानं पाट्यावर मिरचीचंवाटण वाटून आईकडे दिलं. ‘मिरे अगं आवर लवकर, त्या वश्याला उटीव. आरं आवरा लवकर, गाड्या निघाल्या.’ शंकरच्या आवाजानं तारानं कालवणाला फाेडणी दिली. सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. शंकरनंही आपली गाडी जुंपली. तारा धुडक्यात काेयता, भाकरीचं पेंडकं अन काल ् वण घेऊन गाडीत बसली, तशी मीराही परकर सावरत बसली. वसंत कोपीमागं खुटून बसला होता. तारानं वसंतपाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं अन गाडी फुपाट् ् याच्या रस्त्यानंवाटेला लागली.

शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते, तर मीरा अन्वसंत त्याच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत हाेते. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली, तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला; पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावताच, ‘पोरा, मले तरी कुटं वाचता येतंय, मपली साळा तर दुसरीच झालीय’, असं आई म्हणाली. कागदावरच्या काय लिव्हलंय बग, काईच कळत नाईये.’’ पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्यानं तिनं शंकरला बोलतं केलं. ‘‘पोराचं शिक्षण तोडलं तुमी, कामाला हातभार लागतो…पण त्याच्या आयुष्याचं काय?’’ ‘‘अगं व्हईल समदं, आता कुटं गाडी जरासी रुळावर आलीय.’’ घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला. मीरानं डोक्यावरील मोळी खाली ठेवली. मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली. वसंत शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती, कारण मीराचंही शिक्षण कसंबसं आठवीपर्यंत झालं होतं. तो धावत जाऊन तिला म्हणाला, ‘‘ताई, मला सडकेवर कागद गवसला. त्यावर उत्कंठतेनं मीराकडे बघत होता. ‘‘ही वळ व्हय? हे तर संस्कृतमधलं वाक्य हाय. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ असं लिव्हलंय,’’ मीरा म्हणाली. ‘‘म्हणजे काय गं ताई?’’ वसंतनं विचारलं. ‘‘तमसो मा ज्योतिर्गमय, म्हंजी अंधारातून उजेडाकडं,’’ मीरानं सांगून टाकलं. ‘‘म्हंजे ग ताई?’’ पुन्हा वसंतनं विचारलं. ‘‘आता तुला कसं सांगू? हे बघ वश्या, तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं न्हाई म्हंजी अंधार, अन पुढल ् ्या वर्गात जाऊन शिकलास तर …’’ मीराचं बोलणं पुरं व्हायच्या आतच ‘‘तर काय व्हईल?’’ वसंतनं विचारलं. ‘‘तर वाचता येईल म्हंजी उजेड, म्हंजी अंधारातून प्रकाशाकडं,’’ असं म्हणत मीरा माघारी फिरली. तितक्यात वसंतनं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, ‘‘अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार? ताई, काही झालं तरी मी शिकणारच.’’ त्यांचंहे बोलणं ऐकून तडातडा तुटणाऱ्या उसागत वसंतचंही शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली. बाजार असल्यानं आज ‘तोडणी’ बंद होती. आजूबाजूच्या कोप्यावरली सारी पोरं शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपीबाहेर बसून काय करावं, या विचारात होता. शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली. पाट्यावर मीठमिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंतकडे पाहिलं. ‘‘वश्या, तू आज साळंला न्हाई गेलास व्हय रं?’’ वसंतनंहातातला खडा खाली फेकत ‘कसा जाणार?’ म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला. ‘‘अावं ओ वसंताची माय,’’ असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साद घातली. ‘‘आले ओ माय… आले…आले,’’ म्हणत खाली वाकत कोपीबाहेर आलेल्या ताराला पाहून ‘‘अावं समदी लेकरं साळंला गेली, अान् तुपलं?’’ वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली. बाजार घेऊन आलेल्या दामू अन् शंकरकडे लक्ष्मीची नजर जाताच शंकरकडे हात दाखवत, ‘‘हे बघा, यास्नीच इचारा की, का साळंला गेला न्हाई म्हणून,’’ लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली. लक्ष्मीनं शंकरकडे नजर लावून, ‘‘कावं भावजी, आपल्या समद्यांची पाेरं साळंला जात्यात, मग याला कशापाई घरी ठिवलं?

त्याचंशिकायचंवय हाय तर शिकू द्या की, मोटा झाला की कामच करणार हाय.’’ ‘‘व्हय व्हय, म्या बी त्येच म्हंती. हिचं बी शिकणं अर्धंच ऱ्हायलं.’’ मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारानं लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली. तारानं स्वत:च्या शिक्षणाची आबाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली अन श् ंकरला म्हणाली, ‘‘आवं ही लक्ष्मी माय काय म्हंतीया ते तर बघा. वश्याला साळंला घाला म्हंतीया. थोडंसं पैकं कमी मिळंल, पण तो आपल्यासारखा अडाणी तर न्हाई ना ऱ्हाणार. जाऊ द्या त्यास्नी साळंला.’’ शंकर म्हणाला, ‘‘लक्ष्मी वैणी समदं खरंय, पण…’’ हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली. ‘‘आता पनबीन काय बी सांगू नगंस. उद्यापास्नं त्येला साळंला धाड.’’ सगळं बाेलणं ऐकल्यानं दामूनं तोंड उघडलं. कोपीबाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंतला उभारी आली अन् तो कोपीबाहेर येऊन उभा राहिला. ‘‘आता समदीच म्हणत्यात तर जाऊ द्या, नाई म्हणू नका. पुढला इचार करा.’’ तारा म्हणाली. वसंतकडे पाहत ‘ये, पोरा ये’ म्हणून त्याला जवळ घेत तारानंवसंतला कुरवाळलं.

‘‘आता तुमी समदीच म्हंत्यात तर म्या तरी कशाला आडवा येवू? वसंता, ये इकडं पोरा. आता तू उद्यापास्न साळंला जायचं बरं का! हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू.’’ वसंतला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला. मीराच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. तिचेही डोळे पाण्यानं भरले. वसंतनं लगेच मित्रांना गाठलं. ‘आता म्या साळंला येणार,’ असंवसंत सगळ्यांना सांगत सुटला.