वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा र नाव वल्हवली.
वल्हवा रे नाव वल्हवली, वल्हवा र नाव वल्हवली ॥
नौका चाले कशी जलावरी जलावरी जलावरी,
आहे सारा भार मुलांवरी-मुलांवरी-मुलांवरी
लहान वीर महान धीर, रोखील वादळ वल्हवा रं वल्हवली ॥१॥
मोकाट पिसाट वारा आला येऊ दया र, येऊ दया रं,
डोंगरमापाच्या लाटा आल्या येऊ दया रं, येऊ दया रं,
छाती अफाट झेलेल लाट,
रोखील वादळ वल्हवा रं वल्हवली ||२|
झेंडा माथ्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी.
संचारवी जोम नव अंगी नव अंगी नव अंगी
डोले कसा बोले कसा,
धैर्यानं नाव तुम्ही वल्हवा रे वल्हवली ||३||
स्वातंत्र्य दौलत मोलाची रे मोलाची रे मोलाची रे.
सर्वांच्या जिवाच्या तोलाची रे तोलाची रे तोलाची रे.
ती एक आस तो एक ध्यास,
जोसानं नाव आता वल्हवा र वल्हवली ||४||
वसंत बापट