अणूरेणूतुनि शब्द प्रगटति… ‘चला चला पुढती’
विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती
नवयुग आले प्रभा तयाची पहा दिसत दिव्य
शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य
हृदयांतरिच्या अशांततेचा वणवा झणि विझला
उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्गनवा दिसला
नवी चेतना अंतरि स्फुरली दुबळेपण गेले
नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले
मानवतेच्या मार्गावरती उठती जरि ज्वाला
अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला
नको खिन्नता… नको दीनता
नवसूर्य पहा उगवतो
उत्कर्ष पहा झळकतो
संघर्ष पहा बहरतो
नसानसातुन जोश उसळतो नव आशा चित्ती
अणूरेणूतुनि शब्द प्रगटति… ‘चला चला पुढती’