४. पर्यावरणाचे संतुलन

पर्यावरण
‘परिसर’ हा शब्द तुम्हांला माहीत आहे. ‘शाळेचा परिसर सुंदर आहे’, ‘बाजाराचा परिसर अस्वच्छ झाला आहे’, अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. परिसर म्हणजे आसपासची जागा. घराच्या, शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर अधिक मोठा असतो. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकांचा
आपल्या जीवनाशी संबंध असतो. जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते.
सजीव आणि निर्जीव एकमेकांवर अवलंबून असतात. यांच्यामध्ये काही देवाण घेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असतात. या आंतरक्रियांचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो.

     खालील चौकटीत दाखवलेली सजीव व निर्जीव घटकांची चित्रे पहा आणि पर्यावरणातील या विविध घटकांच्या परस्पर संबंधांची चर्चा करा.

अन्नसाखळी
खालील चित्रे पहा.

नाकतोडा गवत व पाने खातो. नाकतोड्याला पक्षी खातो.

खालील चित्र पहा.

     साखळीत अनेक कड्या आहेत. यांतील कड्या सुट्या झाल्या, तर त्यांना साखळी म्हणता येईल का ? साखळीतील प्रत्येक कडी एक संपूर्ण वस्तू असली, तरी ती मागे व पुढे असलेल्या कड्यांना जोडलेली आहे. एखादी कडी निसटली, तर साखळी खंडित होते.
सुरुवातीच्या चित्रांमध्ये वनस्पती, नाकतोडा, पक्षी असे वेगवेगळे घटक एका ठरावीक क्रमाने येतात. प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न ठरतो. ते अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत, म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत असे आपण म्हणतो. अशा साखळीला अन्नसाखळी म्हणतात. त्यातील प्रत्येक घटक एका अन्नसाखळीची एक कडी आहे.

खालील चित्रांत एक अन्नसाखळी दाखवली आहे. त्यातील एक कडी तुम्हांला ओळखायची आहे. पहिल्या व तिसऱ्या कडीत कोणती चित्रे आहेत ते पहा. त्यांचा परस्परसंबंध ओळखा व साखळी पूर्ण करा.

निसर्गात अनेक अन्नसाखळ्या असतात. त्यांतील एखादी कडी निसर्गातून नाहीशी झाली, तर ती अन्नसाखळी टिकेल का?

खालील चित्रामध्ये निसर्गातील काही अन्नसाखळ्या दाखवल्या आहेत, त्या समजून घ्या.

एकच सजीव वेगवेगळ्या अन्नसाखळ्यांचा घटक असू शकतो. त्यामुळे निसर्गात अन्नजाळे दिसते.

अन्नसाखळीतील मुख्य अन्न वनस्पती
प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न पर्यावरणातून मिळते.पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात. वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात. पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साइड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात, म्हणजेच प्रत्येक अन्नसाखळीचा आधार वनस्पतीच असतात.

पर्यावरणाचे संतुलन
आपल्या पर्यावरणात अनेक असतात. अन्नसाखळ्या पर्यावरणातील अन्नसाखळ्यांमुळे प्रत्येक सजीवाला

 अन्न मिळत राहते व तो जगत राहतो. पालापाचोळा, मृत शरीरे, प्राण्यांची मलमूत्र हे 

पदार्थ कुजवण्याचे काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात. यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. जमिनीतील पदार्थांचा वापर करून वनस्पतींची वाढ होणे आणि प्राणी व वनस्पतींचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत      जाणे, हे पर्यावरणातील महत्त्वाचे चक्र आहे.

         याशिवाय पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते.

सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरतात. त्यांनी सोडलेला कार्बन डाय ऑक्साइड वायू वापरून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात. या क्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणात मिसळतो. हेही एक नैसर्गिक चक्र आहे.
पर्यावरणात अशी इतरही अनेक चक्रे असतात. सजीव – सजीव व सजीव-निर्जीव यांमध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते. यामुळेच पर्यावरणातील अन्नसाखळ्या अबाधित राहतात. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली, की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.