४. सावरपाडा एक्स्प्रेस : कविता राऊत

दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा पुराळा पाण्यासाठी वणवण करणे, हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच अशा खेड्या पाड्यामध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते.

असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूडफाटा गोळा करणारी एक मुलगी तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिंपिक करून घेतला. स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे. कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे, सावरपाड़ा. हा पाढा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे कविताचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कास्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कास्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच ‘सावरपाडा एक्सप्रेस’ कविता राऊत चीनमधीत गुआंगजऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा

हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अव सेकंदाने हुकले, पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईन काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला.

अवघ्या चौथी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले नाशिक जिल्हास्तरीय शालेय फ्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमाक मिळवला, पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्या वेळी जाणवले नाही. कविताच्या पायामधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यानी त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे पडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे

हिन्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्यपदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला पुढे मग नाशिक येथे सराव आणि हरसूल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला अकरावीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला ती राहणार कुठे? हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. २४ ऑक्टोबर २००२ पासून पुढील पाच वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दांपत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचीती म्हणजेच कविताचे यश. एकापाठोपाठ एक विक्रस तिच्या नावावर झळकू लागले.

कविताच्या यशामुळे हरसूल, सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हरसूल परिसराची हीच भावना आहे.

नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हरसूल, सावरपाडा येथे जणूकाही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार, म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक ‘लई मोठ्ठी झालीय’ याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते.

कविता सांगते, ‘आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं, ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं.’

कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही.

बापलेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. ‘लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल,’ असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो जो भेटेल, त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता, तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहचू शकली नसती.

गेल्या काही वर्षांपासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली, तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण-समारंभ, उत्सव यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी.

कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे.

आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी. टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या-मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, ‘मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो.’

कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच  मानसिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. कविता  सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर  झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही.कविता ही तिच्या जीवनप्रवासाची नायिका आहे.

– संतोष साबळे