‘मुंगी’ हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर 1 येतात, त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या, नाहीतर कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या. भारतात मुंग्यांच्या सुमारे एक हजार जाती आढळतात.
कीटकवर्गात सर्वांत जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात.
प्रत्येक वसाहतीत अनेक कामकरी मुंग्या, एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही नर मुंग्या असतात.
मुंग्या एकमेकांशी बोलत असतील का? कशा प्रकारे बोलत असतील? एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहीत होतो? असे नाना प्रश्न आपल्याला पडतात. आपण एकमेकांशी संवाद साधतो. माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादाकरिता विशिष्ट सोय करून दिली आहे. मुंग्यांनासुद्धा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशीच सोय केली आहे. मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकणांचा उपयोग करतात.
एखादया मुंगीला अन्नाचा साठा सापडला, की ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत येते. मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच सोडतात. इतर वेळेस नाही. मग इतर मुंग्या मिश्यांच्या साहाय्याने या गंधकणांचा माग काढत अन्नसाठ्यापर्यंत पोहोचतात; म्हणून आपल्याला मुंग्या नेहमी रांगेने चाललेल्या दिसतात.
आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात; पण एखादी मुंगी आपल्याच वसाहतीमधील आहे, की 1. दुसऱ्या वसाहतीमधील आहे, हे मुंग्यांनाच ओळखता येते. वेगवेगळ्या वसाहतींच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो. मुंग्या मिश्यांच्या साहाय्याने तो गंध ओळखतात. रांगेत जाणाऱ्या दोन मुंग्या एकमेकांना कधीकधी भेटताना दिसतात त्यामागे हेच कारण आहे.
एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना ला सावध करतात. यासाठी मुंग्या वेगळ्या प्रकारचे हे गंधकण बाहेर सोडतात. या गंधकणांचा सुगावा ठी लागताच इतर मुंग्या त्या मुंगीच्या मदतीसाठी ताबडतोब या धावत येतात. त्याबरोबर सावधानतेचा इशारा देणारे चा गंधकणसुद्धा हवेत सोडतात. त्यात एखाद्या मुंगीला चिरडले, तर या गंधकणांचा परिणाम अधिक तीव्र ना होतो. अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले त जातात.
संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभागदेखील घासतात त्यातून येणाऱ्या आवाजाच्या साहाय्याने त्या आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात. निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात.
स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात. काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट आम्लाचा फवारा शत्रूवर सोडतात. नकळत एखादया वेळेला लाल मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होते ते तुम्हांला सांगण्याची गरज नाही. वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला, की त्याला तेथून पळ काढावाच लागतो. काही जातींच्या मुंग्यांना आहे. दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. दंश करताच प्राण्याच्या शरीरात विष सोडले जाते.
या विषाचा मोठ्या प्राण्यांवर फारसा प्रभाव जाणवत नाही; परंतु अशा अनेक दंशांपासून होणारा दाह त्या प्राण्याला वसाहतीपासून दूर करण्यात यशस्वी ठरतो. या मुंग्यांचा प्रभाव हाणून पाडणारे त्यांचे बरेच शत्रूदेखील आहेत. अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्नसाखळीचा हा एक भागच आहे, हे आपल्याला कसे विसरून चालेल !
अशा या उद्यमशील, शिस्तबद्ध, सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
प्रकाश किसन नवाळे