५. वारे

सांगा पाहू !

वर्गाच्या खिडकीतून बाहेर पहा. कोणत्या वस्तू हलताना दिसत आहेत? कोणत्या वस्तू स्थिर आहेत?

 • हलणाऱ्या वस्तूूंपैकी कोणत्या वस्तू स्वतःहून हलत आहेत?
 • स्वतःहून न हलणाऱ्या वस्तू कोणत्या? त्या कशामुळे हलत नसाव्यात?

(वरील प्रश्नांतून विद्यार्थ्यांना वारा या संबाेधाकडे घेऊन जावे.) वाऱ्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो; परंतु आपण वारा पाहू शकत नाही. आपल्या सभोवतीच्या अनेक वस्तू जेव्हा हलतात, तेव्हा आपल्याला वारा अनुभवता येतो. म्हणजेहवेच्या वाहण्याचा वाऱ्याशी संबंध असतो. मग हवा का वाहते, असा आपल्याला प्रश्न पडतो.

करून पहा.

 •  समान आकाराची कागदाची दोन भेंडाेळी बनवा.
 • टेबलाच्या एका बाजूस दोन्ही भेंडाेळी ठेवा.
 • तुम्ही व तुमचा मित्र/मैत्रिणीनेकागदाची प्रत्येकी एक भेंडाेळी घ्या.
 • कागदाच्या भेंडाेळीला व टेबलाला अजिबात स्पर्श न करता भेंडोळी टेबलाच्या दुसऱ्या बाजूलापोचवण्यास काय करावेलागेल?
 • कोणाची कागदाची भेंडाेळी टेबलाच्या दुसऱ्या टोकाला प्रथम पाेहोचते?
 • कागदाची भेंडाेळी पोहोचण्यास उशीर कशामुळेझाला असेल?
 • आणखी वेगानेही भेंडाेळी दुसऱ्या टोकास पोहोचवणे कसेशक्य होईल?
 • पाण्याने भरलेली बाटली अशा प्रकारे टेबलाच्या दुसऱ्या बाजूला नेता येईल का ? बाटली दुसऱ्या बाजूकडेनेण्यासाठी वर वापरलेली पद्धत वापरता येईल का?

भौगोलिक स्पष्टीकरण

पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो, हेआपण शिकलो आहोत. जास्त दाबाच्या पटट्् याकडून कमीदाबाच्या पटट्् याकडे हवेची हालचाल क्षितिजसमांतर दिशेत होते. याहालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो. हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल, तेथे वारेमंद गतीने वाहतात. सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथेअधिक असेल, तेथे वारे वेगाने वाहतात. वाऱ्याचा वेगदेखील भिन्न भिन्न स्वरूपातअाढळतो. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणात मोजला जातो.

संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात विचार करता, पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारेआपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात तेमूळ दिशेच्या डावीकडे वळतात. आकृती ५.२ पहा. आकृतीमध्ये ही दिशा वक्र बाणाने दाखवली आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो.

वारेज्या दिशेकडून वाहत येतात, त्या दिशेच्या नावानेतेओळखलेजातात. उदा., पश्चिमी वारेम्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे. वाऱ्यांची वाहण्याची दिशा, कालावधी, व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यांवरून वाऱ्यांचेपुढील प्रकार पडतात.

ग्रहीय वारे : पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्‌ट्यांकडून कमी दाबाच्या पट्‌ट्यांकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. हे वारेपृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात. त्यामुळेत्यांना ग्रहीय वारेम्हणतात. उदा., पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. दोन्ही गोलार्धांत २५° ते३५°अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पटट्् याकडे वारे वाहतात. (आकृती ५.३ पहा.)पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यांवरपरिणाम होऊनत्यांची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलार्धात ह वे ारेईशान्कडून ये नैॠत्कडे, ये तर दक्षिण गाेलार्धात आग्नेयेकडून वायव्कडे ये वाहतात.ह

दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पटट्् याजवळ येऊन मिळतात. या वाऱ्यांना पूर्वीय वारेअसेम्हणतात. दोन्ही गोलार्धांत मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून ६०°अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पटट्् याकडे वारे वाहतात.(आकृती ५.३)पृथ्वीच्या परिवलनाचापरिणाम होऊनत्यांची मूळ दिशा बदलते. दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे, तरउत्तर गोलार्धात नैॠत्येकडूनईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यांना पश्चिमी वारेअसेम्हणतात. दोन्ही गोलार्धांत ध्रुवीय जास्त दाबाच्या पटट्् याकडून उपध्रुवीय (५५° ते६५°)कमी दाबाच्या पटट्् याकडेज वे ारे वाहतात, त्यांना ध्रुवीय व ारेअसेम्हणतात. या वाऱ्यांची दिशा सर्वसाधारणपणेपूर्वेकडूनपश्चिमेकडेअसते.

स्थानिक वारे : काही वारेकमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेनेमर्यादित क्षेत्रात वाहतात, हेस्थानिक वारेअसतात. हे वारेज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर त्यांचा परिणाम झालेला दिसून येतो. हे वारे निरनिराळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखलेजातात.

पर्वतीय वारे- वैशिष्ट् ःये

 • रात्री पर्वतशिखर लवकर थंड होते.
 • दरीचा भाग तुलनेनेउष्ण असतो.
 • पर्वतावरहवेचा दाब जास्त असतो.
 • पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात.
 • दरीतील उष्ण व हलकीहवा वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगानेखाली येते.
 • पर्वतीय वारेसूर्यास्तानंतर वाहतात.

भौगोलिक स्पष्टीकरण

जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते. जमीन स्थिर व अपारदर्शक असते, त्यामुळेउष्णतेचवहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते, म्हणून जमीन अधिक लवकर तापते. त्यामानानेपाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळेपाणी लवकर तापत नाही.परिणामी, जमीन व सागरी भागातील हवेच्या दाबात फरक पडतो. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते, तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो. समुद्राचेपाणी उशिरा तापते, त्यामुळेसमुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारेसागरी (खारे) वारेहोत. रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते. तेथेहवेचा दाब जास्त असतो. तेव्हा भूमीय (मतलई) वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशांत विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात. हे वारेसुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखलेजातात. उदा., फॉन, चिनूक, बोरा, लूइत्यादी. पुढील पृष्ठावरील तक्ता पहा.

हंगामी वारे (माेसमी) ः जमीन व पाणी यांच्या ॠतूनुसार कमी-अधिक तापण्यामुळे माेसमी वारेनिर्माण होतात. उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडेवाहतात. अाग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, उत्तर ऑस्टरेल्िया या प्रदेशांवर मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम हाेताना आढळतो. (आकृती ५.६ पहा.) भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा ॠतूंवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव होतो. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा यांशिवाय पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ॠतू होतात.

मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच असतात. भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी ही मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने होते. हे वारे विषुववृत्त ओलांडल्यावर नैॠत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. यांना नैॠत्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत विषुववृत्तालगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. यांना ‘ईशान्य मोसमी वारे’ म्हणतात. हे वारे कोरडे असतात. वाऱ्यांच्या स्थिर व अतिवादळी स्थितीचा विचार करता, आपल्याला अावर्ताचा अभ्यास करणे आवश्यक असते.

आवर्त ः एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात. (आकृती ५.७ पहा.) पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते. वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. आवर्त वाऱ्यांचे प्रभावक्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्यांचा कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते. उपग्रहाने घेतलेले चक्रीवादळाचे छायाचित्र आकृती ५.८ मध्ये पहा

हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा ‘L’ (Low) या अक्षराने दाखवतात. आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते. अावर्तांना ‘चक्रीवादळ’ असेही म्हणतात.

चक्रीवादळे : पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात, जपान, चीन, फिलिपाइन्स इत्यादी देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे ‘टायफून’ नावाने ओळखली जातात. ही वादळे जून ते आॅक्टोबर या महिन्यांत निर्माण होतात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे ती विनाशकारी असतात. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे ‘हरिकेन्स’ होय. ही वादळेसुद्धा विनाशकारी असतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी ६० किमी असतो. याशिवाय समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात. त्यांची तीव्रता कमी असते. ती विनाशकारी नसतात.

प्रत्यावर्त ः एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो. केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात. उत्तर गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. प्रत्यावर्ताच्या कालावधीत निरभ्र आकाश, कमी वेगाने वाहणारे वारे आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान असते. प्रत्यावर्ताची स्थिती बहुधा काही दिवस अथवा एक आठवड्याची असू शकते. असे प्रत्यावर्त समशीतोष्ण असू‍ कटिबंधात निर्माण होतात.

हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग ‘H’ (High) या अक्षराने दाखवतात. प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षाने जाणवतात. या प्रदेशांतून वारे बाहेर जात असतात, त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी असते. (आकृती ५.९ पहा . )