आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण पाहतो, अनुभवतो त्यापेक्षा काही भिन्न गोष्टी जगात इतरत्र आढळतात. विविध वन्य जीवांच्या संदर्भातील शैक्षणिक व माहितीपर होणारे कार्यक्रम आपण दूरचित्रवाणीवर पाहत असतो. त्या वन्यजीवांविषयी जाणून घेण्याचे कुतूहल आपणांस वाटते. आपल्याकडेतेका उपलब्ध नाहीत? तेआपल्याकडील वन्य प्राण्यांप्रमाणेकानाहीत? त्यांच्यात हा फरक का निर्माण झाला? याविषयीच्या कारणांचा आपण शोध घेऊया.
भौगोलिक स्पष्टीकरण
पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांत भूस्वरूपे, हवामान, मृदा यांच्यात भिन्नता आढळते. ही भिन्नता प्रामुख्यानेत्या-त्या भागांत उपलब्ध सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्यावर अवलंबून असते. सूर्यप्रकाश व पाणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवापर्यंत बदलत जाते. याबाबतचा अभ्यास मागील इयत्तांमध्ये केला आहे. भूस्वरूपे, हवामान, मृदा या तीन घटकांतील बदलांचा प्रभाव वनस्पती, प्राणी व मानवी जीवन यांच्यावर पडत असल्यामुळेजैवविविधतेत बदल होतो.
पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडांत विशिष्ट अक्षवृत्तांच्या दरम्यान हवामान, वनस्पती व प्राणिजीवन यांत साधर्म्य आढळते. अभ्यासाच्या दृष्टीनेहवामान, वनस्पती व प्राणी यांमध्ये आढळणाऱ्या साधर्म्यामुळेकाही प्रदेशांचा वेगळेपणा प्रकर्षानेलक्षात येतो. हेप्रदेश नैसर्गिक घटकांवर अवलंबून असल्यानेत्यांना नैसर्गिक प्रदेश म्हणतात. अशा प्रदेशांतील नैसर्गिक पर्यावरणाचा मानवासह सर्व सजीवसृष्टीवर परिणाम झालेला आढळतो. पृथ्वीवरील भूप्रदेश या नैसर्गिक प्रदेशात विभागला जातो.पाठातील तक्त्यांच्या व नकाशाच्या आधारे त्याची माहिती करून घेऊया.
मागील तक्त्यामध्ये दिलेले नैसर्गिक प्रदेश विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विशिष्ट अक्षवृत्तीय भागांत आढळतात. उष्ण तापमान व पाण्याची उपलब्धता यांवरून या नैसर्गिक प्रदेशांचेस्थान व विस्तार निर्धारित होते. या प्रदेशांशिवाय स्थानिक परिस्थितीमुळेकाही प्रदेश वेगळेदिसून येतात. यांत प्रामुख्यानेमाेसमी, भूमध्व पश्चिम युराेपीय हवामानाच्या प्रदेशांचा समावेश होतो. पश्चिम युरोपीय व मोसमी हे विशिष्ट वाऱ्यांच्या प्रभावामुळेलक्षात येतात, तर भूमध्य सागरी प्रदेश हा तेथील पावसाळ्याच्या विशिष्ट कालावधीमुळेलक्षात येतो. येथे हिवाळ्यात पाऊस पडतो, म्हणूनच तो इतर प्रदेशांपेक्षा वेगळा दिसून येतो. खालील तक्ता पहा.
तक्त्यांत दिलेल्या एकूण नऊ प्रदेशांशिवाय काही प्रदेश त्यांच्या विशिष्ट खंडीय स्थानामुळे वेगळेदिसून येतात. उदा., चिनी प्रदेश, सेंट लॉरेन्स प्रदेश इत्यादी. या सर्व प्रदेशांचे विस्तार आकृती ६.१ मध्ये पहा.
विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना जैवविविधतेतील बदल उत्तरोत्तर कमी होत जातात. त्यामुळेसाधनसंपत्तीच्या उपलब्धतेबाबत मर्यादा येतात. त्याचा परिणाम मानवी व्यवसायांवरही होतो. माॅन्सून प्रदेशात शेती व शेती पूरक व्यवसाय केले जातात. विषुववृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूड कटाई, डिंक, मध, रबर, लाख गोळा करणेइत्यादी व्यवसाय चालतात. तैगा प्रदेशातील वनामध्ये मऊ लाकूड आढळते. त्यामुळे तेथे प्रामुख्यानेलाकूडतोड व्यवसाय चालतो, तर टुंड्रा प्रदेशात फक्त शिकार व मासेमारी करावी लागते. गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेती केली जाते. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशांत पर्यावरण आणि उपलब्ध साधनसंपत्तीमध्ये खूप फरक असतो. साधनसंपत्तीचा वापर हा त्या त्या प्रदेशांतील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही लोकजीवनावर प्रभाव असतो.
हे नेहमी लक्षात ठेवा.
नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ मानवाचेच जीवन अवलंबून नसते, तर पृथ्वीवरील सर्वच सजीव त्यावर अवलंबून असतात. नैसर्गिक प्रदेशातील साधनसंपत्तीचा वापर करताना आपण आपल्याबरोबरच इतर सजीवांचादेखील विचार करणे आवश्यक आहे, तरच ‘वसुधैव कुटुंबकम्’ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल