कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन असते. देशाच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक असतात. भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्येचा अभ्यास करूया.
भारत :
भौगोलिक स्पष्टीकरण
भारताची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२१ कोटी होती. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील क्रमांक दोनचा देश आहे. भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त २.४१% भूक्षेत्र व्यापतो, परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १७.५% लोकसंख्या भारतात आहे. जनगणना २०११ नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता ३८२ व्यक्ती प्रति चौकिमी होती.
भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे. प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना दिसतो. सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात अनेक शतकांपासून मानवी वस्ती स्थापित झालेली आढळते. शेती व उद्योगधंदे यांमुळे काही भागांमध्ये लाेकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या भागात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. उदा., उत्तरेकडील मैदानी प्रदेश, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगळूरू इत्यादी. याउलट पर्वतीय, डोंगराळ, शुष्क वाळवंटी प्रदेश तसेच घनदाट वनक्षेत्र जेथे सुविधांचा अभाव असतो. अशा प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ प्रमाणात आढळते.
ब्राझील :
भौगोलिक स्पष्टीकरण
ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. जनगणना २०१० नुसार सुमारे १९ कोटी लोकसंख्येसह ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही हा देश जगात पाचव्या क्रमांकावर आहे. पृथ्वीच्या भूभागापैकी ५.६% भाग ब्राझीलने व्यापला आहे, मात्र जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त २.७८% लोकसंख्या या देशात आहे. त्यामुळे या देशात लोकसंख्येची सरासरी घनता २३ व्यक्ती प्रति चौकिमी एवढी आहे.
ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे. बहुतांश लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या ३०० किमी हवामानामुळे वस्त्यांसाठी सुयोग्य बनला आहे. सुपीक जमीन व संसाधनांच्या उपलब्धतेमुळे कृषी व उद्योग यांची या भागात भरभराट झालेली दिसते. परिणामी या भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे. याउलट ॲमेझॉन खोऱ्यातील प्रतिकूल हवामान, जास्त पर्जन्यमान, दुर्गमता आणि दाट वने यांमुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात. त्यामुळे येथे लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.
ब्राझीलचा मध्य व पश्चिमी भाग हा कमी लोकसंख्येचा आहे. ब्राझीलमधील उच्चभूमींच्या या प्रदेशात लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आढळते.
लोकसंख्येची रचना :
लिंग गुणोत्तर :
दोन्ही देशांच्या संदर्भात लोकसंख्येची खालील वैशिष्ट्येठळकपणे जाणवतात.
l गेल्या अनेक दशकांत ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर १००० पेक्षा जास्त आहे.
l ब्राझीलच्या लिंगगुणोत्तराचा विचार करता या देशातील स्त्रियांची संख्या २००१ पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढली आहे.
l भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे.
l भारतात गेली कित्येक दशके लिंग गुणोत्तरात चढ[1]उतार झालेला पाहण्यास मिळतो. १९९१ नंतर लिंग गुणोत्तरात थोडी वाढ झाली आहे.
वय आणि लिंग-मनोरा :
लोकसंख्येच्या वय-रचनेचा विचार करता ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत असून, भारतात परिस्थिती वेगळी आहे. भारतात तरुण वयोगट जास्त आहे, म्हणजेच भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे.
लोकसंख्या वाढीचा दर :
लोकसंख्या वाढीचे प्रमाण ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झालेले आहे. भारतात अजूनही तशी स्थिती नाही. २००१ ते २०११ च्या दशकात भारताची लोकसंख्या १८.२ कोटीने वाढली.
l भारतातील लोकसंख्या वाढीचा दर १९७१ पर्यंत जास्त होता. त्यानंतर हा दर स्थिरावला. वर्तमानकाळात लोकसंख्यावाढीचा दर कमी होत आहे, परंतु लोकसंख्या वाढत आहे.
l ब्राझीलच्या आलेखाचेनिरीक्षण करता असे लक्षात येते, की लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असून पुढच्या दोन दशकांत ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यता कमी आहे
आयुर्मान :
देशाच्या सरासरी आयुर्मानात झालेली वाढ ही समाजाच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. आरोग्यविषयक सुविधा वाढल्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली आणि जीवनसत्त्वयुक्त मुबलक आहार मिळू लागला, की आयुर्मान वाढू लागते. विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे; परंतु सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर त्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे.
साक्षरता प्रमाण :
माहीत आहे का तुम्हांला ?
भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर दहा वर्षांनी जनगणना होते. त्याचप्रमाणे ब्राझीलमध्येIBGE म्हणजे Brazilian Institute of Geography and Statistics या संस्थेकडून दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येते. या दोन्ही देशांतील पहिले जनगणना सर्वेक्षण १८७२ साली झाले. भारताची जनगणना दशकारंभी होते (१९६१, १९७१ …..) ब्राझीलची जनगणना दशकांती होते (१९६०, १९७० …..)