७. अरण्यलिपी

प्राणी पाहण्यासाठी आपण कधीकधी जंगलात खूप भटकतो; पण एखाद्या वेळी एकही प्राणी आपल्याला दिसत नाही आणि आपण नाराज होतो, निराश होतो. जंगलात जरी प्राणी दिसले नाहीत, तरी त्यांच्या खाणाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात. त्या खाणाखुणा म्हणजे वन्य प्राण्यांची अरण्यलिपी होय.

वन्य जीव जंगलात ठरलेल्या पाऊलवाटेवरून ये-जा करतात. त्या पाऊलवाटांचे निरीक्षण करावे त्यात तुम्हांला वन्य जीवांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसतील पाणवठ्यावर गेलात, तर तेथील ओल्या मातीतही अनेक वन्य जीवांच्या पावलांचे ठसे तुम्हांस पाहायला मिळतील. उसे ताजे व स्पष्ट असतील, तर कोणता प्राणी पाऊलवाटेवरून गेला अथवा किती वेळापूर्वी पाण्यावर येऊन गेला याची माहिती मिळते. प्रत्येक जातीच्या प्राण्यांच्या पायांचे ठसे वेगवेगळे असतात अगदी सकाळी नरम जमिनीवरील धुळीत त्याच्या पायाचे ठसे स्पष्ट दिसतात. दिवस जसजसा पुढे सरकतो, तसतसे इतर प्राण्यांच्या वर्दळीने वाहणान्या वान्याने असे उसे पुसट होत जातात. पाणवठ्यावरील पाऊलवाटा रांगोळी घातल्यासारख्या सुंदर दिसतात. त्या पाहताना मनाला आनंद होतो.

वाघ वा बिबट्याच्या पावलांचा ठसा पाहायला मिळाल्यानंतर अधिक आनंद होतो, वाघाच्या पावलांचे ठसे इतर प्राण्यापेक्षा वेगळे असतात. वाघ पायांचा आवाज होऊ नये, यासाठी पालापाचोळ्यातून चालणे टाळतो. तो पाऊलवाटेवरून, नदीनाल्यांच्या पात्रांतून, बाळूवरून चालतो. अशा पाऊलवाटा तपासाच्या नदीनाल्यातल्या ओल्या बाळूत, मातीत वाघाचे ठसे आढळतात, त्यावरून ते वाघाचे क्षेत्र आहे हे आपल्याला कळते. प्रत्येक बापाच्या पायांच्या उशांत फरक आढळतो. वाघाच्या पायाचा अंगठा पंजाच्या वरच्या बाजूस असतो त्यामुळे अंगठ्याचा ठसा मातीत उमटत नाही. फक्त त्याचा तळवा व चार बोटांचा ठसा मातीत उमटतो. त्याचे करंगळीकडून तिसरे बोट मोठे असते. वाघाच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गणती केली जाते. चालताना तो मागचा पाय बरोबर पुढच्या पावलाच्या उशावर टाकतो. त्यामुळे पुढच्या पावलाचा ठसा पुसता जातो म्हणून शिरगणती करताना बाप व विटाच्या पाऊलखुणा आढळतात. हा साच्या पाऊलखुणा मागच्या पायाचे ठसे घेतात.

 वाघाच्या ठशावरून तो वाघाचा आहे का वाघिणीचा आहे, हेही ओळखता येते. वाघ-वाघिणीचे , पुढचे पाय चौकोनी असतात; परंतु त्यांच्या मागच्या पंजांत फरक असतो. वाघाचा पंजा चौकोनी असतो. त्याची लांबी-रुंदी सारखी असते; परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो. रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते.

नर-मादीच्या पावलांचे ठसे जवळजवळ दिसल्यास ते दोघे बरोबर होते, असे समजायला हरकत नाही. ज्या प्राण्यांच्या पायांच्या नख्या बाहेर आलेल्या असतात, त्यांच्या पंजाच्या ठशात बोटांबरोबर नख्याही उमटलेल्या दिसतात.

तरसाचा ठसा तीन इंच लांब असतो. जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो. त्याच्या पंजाचा तळवा व चार बोटे नख्यांसह मातीत उमटलेली दिसतात. चारही बोटांत अंतर असते. तळवा व बोटे यातही अंतर असते.

अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. बोटाबरोबर त्याच्या पाचही लांब नख्या ठशात उमटलेल्या असतात.

खूर असलेल्या प्राण्यांचे ठसेही पाणवठ्यावर, मातीत पाहायला मिळतात. ओलसर मातीत वा कोरड्या मातीत ठसे चांगले दिसतात. चिखलात खोल पाय रुतत असल्याने ठसे पूर्णपणे दिसत नाहीत.

गव्याच्या खुरांचा ठसा मोठा असतो. तो सहा इंच भरतो. पाळीव गुरांच्या खुरासारखा दिसतो.

हरणाच्या खुरांचा ठसा लहान असतो. त्याच्या खुरांच्या दोन अर्धवर्तुळाकार भागाच्या खुणा जवळ जवळ दिसतात. सांबर, बाराशिंगा, बौशिंगा, चिंकारा व काळवीट यांच्या खुरांचे ठसे कमी-जास्त आकारांचे असतात. भेकराच्या खुराचा ठसा अवघा एक ते सव्वा इंच असतो.

एकंदरीत वन्य प्राण्यांच्या ठशांवरून आपल्याला प्राण्यांची बरीच माहिती मिळते. त्यावरून प्राणी कोणत्या दिशेला गेला ते कळते. काही प्राण्यांच्या ठशांवरून तो नर होता की मादी होती, ते समजते.

चालताना त्यांचा मागचा पाय पुढच्या पायाच्या ठशावर पडत असतो. त्यामुळे एकच ठसा उमटलेला दिसतो; परंतु पळताना मागील व पुढील दोन्ही पायांचे ठसे दिसतात. त्यावरून तो चालत गेला, की पळत गेला ते कळते. दोन्ही पायांच्या ठशांमधील अंतर जेवढे कमी तेवढा तो वेगात पळत गेला असे समजावे. वन्य प्राण्यांच्या ठशांचे निरीक्षण करणे मजेशीर असते त्यात वेळ कसा जातो ते समजत नाही.

काही प्राणी ठरावीक ठिकाणीच विष्ठा टाकतात. विष्ठेचा आकार, रंग यांवरून ते प्राणी चटकन ओळखता येतात.

काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या  प्राण्यांचे न पचलेले भाग- I जसे केस, नखे व हाडे आढळून येतात. त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल हे ओळखता येते.

जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी- जसे हरिण, सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात.

वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडा-झुडपांवरील त्यांच्या नख्यांच्या खुणा, दातांच्या खुणा, त्यांचे विविध आवाज यांवरून त्यांची आपल्याला ओळख होते. ही एक प्रकारची अरण्यलिपीच होय.

जंगलवाचनाचा आपल्याला छंद लागला, की डोळ्यांनी, कानांनी, नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो. प्राण्यांचे आवाज, पायांचे ठसे, वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात. नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ, झाडेझुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही, ना कारण जंगलवाचनाचा अनुभव आपल्याला नवीनवी माहिती आणि वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळवून ना देतो.

– सुरेशचंद्र वारघडे