पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील; पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहेत. त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मानपदके देऊन गौरवले जाते.
‘परमवीर चक्र’ हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो.‘परमवीर चक्र’ हा फार दुर्लभ सन्मान आहे. आतापर्यंत फक्त एकवीस वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यातील चौदा वीरांना तर तो मरणोत्तर देण्यात आला आह.
‘परमवीर चक्र’ पदक दिसायला अगदी साधे आहे. कांस्य धातूपासून बनवलेले, छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे. गडद जांभळी कापडी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत. त्यांच्या मधे दोन कमलपुष्पे आहेत. ‘परमवीर चक्र’ पदकाचे डिझाइन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोपियन; परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या. या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम. त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच, शिवाय भारतातील कला, परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत.
इंद्रवज्र म्हणजे विजेचा कडाडणारा प्रहार. हे एक अजोड, अजिंक्य असे शस्त्र समजले जाते. दधीची ॠषींच्या परमोच्च त्यागामुळे हे शस्त्र अमोघ झाले आहे.
इंद्रवज्र कसे तयार झाले त्याविषयीची एक दंतकथा अशी ः हजारो वर्षापूर्वी एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले. निष्पाप माणसे पाण्यावाचून तडफडू आणि मरू लागली. या राक्षसावर कोणत्याच साध्यासुध्या शस्त्राचा परिणाम होईना- मग ते लाकडाचे असाे, नाहीतर धातूचे. त्याला हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता. तो कुठे मिळणार ? दधीची ॠषींच्या हाडांमध्ये असे दिव्य सामर्थ्य होते आणि दधीची ॠषींचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच मोठे होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचे दान केले. या अस्थींतूनच तळपणारे इंद्रवज्र तयार झाले. राक्षसाचे निर्दालन झाले.
दधीची ॠषींच्या अस्थींमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले. तसेच अमोघ सामर्थ्य भारतीय सेनेला मिळते, ते या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून !
फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखाँ १०८७७ एफ (पी ), पीवीसी. स्कॉड्रन नं. १८ : दी फ्लाईंग बुलेट्स
१४ डिसेंबर १९७१ रोजी शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाईक्त्षेराकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ सावध होतेच; पण धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुराळ्यामुळे त्यांना उडड् ाण करता येईना. धावपट्टी थोडी दिस लाग ू ेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर, अगदी खालन घोंगाव ू लागली ू होती, गोळ्यांच्या फैरी झाडत होती. तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाईंग ऑफिसर सेखाँचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. त्यांनी हल्खोर स ले ेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचक वेध घेतला. ज ू मिनीपासन ू फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालच ठ ू ेवली. शत्रू संख्ने ये जास्त होते; पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवन पळू ू न गेले. श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्र बचावले. परंतु हाय ! या भीषण युद्धात फ्लाईंग ऑफिसर सेखाँचे विमानही कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले. फ्लाईंग ऑफिसर सेखाँना मृत्यूप्रत्यक्ष समोर दिसत होता, मात्र त्याही परिस्थितीत कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड निर्धाराने ते शत्रूला सामोरे गेले. कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले. परमवीर फ्लाईंग ऑफिसर सेखाँ यांना सलाम !
देशसेवेसाठी प्राणांचे मोल देणाऱ्या या परमवीरचक्रधारकांची माहिती www.paramvirchakra. com. या इंटरनेटवरील संकेतस्थळावर जरूर वाचा. हे परमवीर विविध जातीधर्माचे आहेत असे तुम्हांला दिसेल. आपल्या जखमा आणि प्राणांतिक वेदनांची पर्वा न बाळगता परमवीरांनी शत्रूशी दोन हात कसे केले, त्यांच्या प्रक, स्फू रे र्तिदायक हकिकती जरूर मिळवा आणि वाचा.