आकृती ७.१ मधील चित्रांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
‘अ’ मधील डोंगर कशाचा बनलेला आहे?
‘ब’ मध्ये काय केले जात आहे?
‘क’ मध्ये आपणांस काय दिसते?
वरील तीनही बाबींचा एकमेकाशी स ं बं ध का ं य असावा?
‘अ’ आणि ‘क’ मधील घटकाचा आं पण कशासाठी वापर करतो?
आपल्या परिसरातील डोंगरावरून, नदीपात्रातून, जमिनीतून विविध प्रकारचे, रंगांचे, आकारांचे दगड गोळा करा. या दगडांचे निरीक्षण करून खालील माहितीची नोंद करा.
दगड सापडला ते स्थान.
दगडाचा रंग.
दगडावर दिसणारे ठिपके व त्यांचा रंग.
दगडाचे वजन (अंदाजे हलका/जड).
दगडाचा कठीणपणा (कठीण/ठिसूळ/मध्यम).
दगडाची रचना (एकजिनसीपणा/थर/पोकळपणा).
दगडाची सच्छिद्रता (अच्छिद्र/सच्छिद्र). तुम्ही गोळा केलेले दगड व त्याबाबतच्या माहितीची नोंद शिक्षकांना दाखवा. चर्चा करा.
पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच (शिलावरण) कठीण आहे, तसेच ते माती व खडक यांचे बनलेले आहे हे आपण मागील इयत्तेमध्येशिकलो आहोत.
भूपृष्ठावर व त्याखालीसुदधा खडक आढळतात. ् भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात.
खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. खडकांमध्येसिलिका, अॅल्युमिनिअम, मॅग्नेशिअम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. यांशिवाय इतरही खनिजे असतात.
* खडकांचे प्रकार
निर्मितीप्रक्रियेनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात.
अग्निजन्य खडक /अग्निज खडक/मूळ खडक
गाळाचे खडक /स्तरित खडक
रूपांतरित खडक
* अग्निजन्य खडक
ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपष्ठा ृ खाली शिलारस (मगॅ्मा) आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात.
अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अतं र्गत भागातील पदार्थपां ासून तयार होत असल्यामुळे त्यनां ा मूळ खडक असेही म्हणतात. बहुताश अं ग्निजन्य खडक हे कठीण व एकजिनसी दिसतात. हे खडक वजनाने देखील जड असतात. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही.
महाराष्ट्रपठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले अाहेत. या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. आकृती ७.५ पहा.
महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवर तळी किंवा हत्तीखाने आढळतात. वास्तविक हे दगडांच्या खाणींचे खड्डे आहेत. या खाणींतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यांवरील बांधकामासाठी केला गेला. खाणींमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्येपाणी साठवून तळी व तलाव निर्माण केले गेले होते.
* गाळाचे खडक
तापमानातील सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक तुटतात. खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात. अशाप्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकाचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो. नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात. या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे हे थर एकसंध हाेतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात.
गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. स्तरित खडकामध् ं गाळाचे थर स ये ्पष्टपणे दिसतात. गाळाचे थर एकावर एक साचताना काही वेळेस या थरामध् ं मृत ये प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात. त्यामुळे गाळाच्या खडकात ं जीवाश्म आढळतात. हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. सर्वसाधारणतः गाळाचे खडक सच्छिद्र असतात.
वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म (शेल), प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत. गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात.
जीवाश्म (fossil) गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती याच्ं या अवशेषावर ं प्रचड ं दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालातरा ं ने घट्ट होतात. यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीवसृष्टीबाबतची माहिती मिळते.
* रूपांतरित खडक
पृथ्वीवर ज्वालामुखी उद्रेक व इतर भू-हालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात. परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते. म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. रूपांतरित खडकांत जीवाश्म आढळत नाहीत. हे खडक वजनाला जड व कठीण असतात. खडकांचे रूपांतरण सोबत दिलेल्या तक्त्याद्वारे समजून घ्या.
दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्याने तसेच अतिउष्णतेमुळे त्याचे रूपांतरण हाेते. या कोळशाचे रूपांतरण हिऱ्यामध्ये झाल्यावर त्याची किंमत वाढते. कोळसा आपण जाळतो तर हिरा आपण दागिना म्हणून वापरताे.
आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या खडकाचे ं वितरण आकृती ७.५ मध्येदिले आहे. नकाशाच्या आधारे बेसाल्टशिवाय इतर कोणते खडक कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत त्यांची यादी करा. आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट खडक फार माेठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे. ग्रॅनाईट हा खडक राज्याच्या पर्व ू भागात व दक्षिण कोकणात आढळतो. जाभा खडक हा ं दक्षिण कोकणात आढळतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पर्वेूस व दक्षिण कोकणात खाण व्यवसाय चालतो. बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळे महारा ं ष्राट्च्या इतर भागामध् ं खनिज स ये ंपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत.