भौगोलिक स्पष्टीकरण
वरील चित्रात शेतातील पिके, तसेच घराजवळील नांगराचा फाळ या बाबी आहेत. यावरून तेशेतकऱ्याचे घर आहे, हेसहज कळते. शेतकरी शेळ्या, गाई-म्हशी, कोंबड्या पाळतो. या गोष्टीदेखील चित्रात दिसत आहेत. यांतून त्याला दूध, अंडी आदी उत्पादने मिळतात. कोंबड्या, शेळ्या विकून त्याला पैसा मिळतो. या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत असतो. या सर्व कृती नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. या कृती कृषी या सदरात मोडतात. हेव्यवसाय शेतीला पूरक असतात.
कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे. अन्नधान्य, वस्त्र आदी गरजांसाठी वनस्पती व प्राणी यांचा उपयोग होतो. शेतातील पिकांच्या उत्पन्नाबरोबर गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे; त्याचबरोबर रेशमाचे किडे व मधमाश्या पालन, फुलबाग, फळबाग, मत्स्यपालन (मत्स्यशेती), वराहपालन, एमूपालन इत्यादी व्यवसायांचाही समावेश कृषीमध्ये हाेतो. कृषी व्यवसायामध्ये मनुष्यबळ, प्राणी, अवजारे, तसेच इतर विविध साधन वे ापरली जातात. आधनिु क तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वांत महत्त्वाचा व प्रमुख व्यवसाय मानला जातो.
भौगोलिक स्पष्टीकरण
वरील चित्रांचे निरीक्षण केल्यावर कृषिव्यवसायात कालानुरूप झालेले विविध बदल आपल्या लक्षात येतात. पर्ूवी अादिमानवाला जंगलात भटकावेलागत होते. त्यातून मिळवलेल्या उत्पादनांतून तो आपला उदरनिर्वाह करत असे. नंतर त्याला शेतीची कल्पना सुचल्यामुळेशेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले. त्यातून वर्षभरासा वर्ष ठीच्या अन्नधान्याची तरतद ू मानव करू लागला. शेतातील पिकांबरोबरच मानव पशुपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन, फुलशेती, फळशेती यांद्वारेउत्पादनेघेऊ लागला.पर्ूवीचेभटकेजीवन सोडून तोएका ठिकाणी राहून कृषीसंबंधी विविध व्यवसाय करू लागला. वरील चित्रांत आपण कृषीत घडून अालेले विविध बदल पाहिले. आता आपण कृषी या सदराखाली येणाऱ्य विविध व्यवसायांची ओळख करून घेऊ या. या व्यवसायांतील विविध उत्पादनेआपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो. या व्यवसायांपैकी पारंपरिक व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखलेजाते.
पशुपालन : वेगवेगळ्या पशूंचेपालन करून त्यांपासून विविध उत्पादनेघेणे, त्यांचा विविध कामांसाठी वापर करणे व आपला निर्वाह चालवणे,हापशुपालनाचा मुख्य उद्देश आहे.
गुरेपालन : गाय, बैल, म्हैस, रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केलेजाते. शेतीच्या कामात वापरता येणारी व दुभती जनावरेपाळणे, हा एक व्यवसाय आहे. मिश्रशेतीचा तो अविभाज्य भाग असून, त्याचेस्वरूप आधनिु क व्यापाराचेआहे. भारतात या व्यवसायाचेस्वरूप अलीकडेबदललेआहे. व्यापारी तत्त्वावरील पशुपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यांसाठी केला जातो.
शेळी व मेंढीपालन : हासुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे. शेळीपालन व मेंढीपालन हे डोंगराळ तसेच निमओसाड, कोरड्या हवामान प्रदेशात केले जाणारे व्यवसाय आहेत. नागरी वस्त्यांपासून दूर, ग्रामीण व डोंगराळ भागांतील परिसरात असलेलेखुरटेगवत, झुडपे, बाभळी यांवर शेळ्या व मेंढ्या पाेसल्या जातात. भारतात मांस हाच मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो. लोकरीसाठीही मेंढीपालन केलेजाते.
कुक्कुटपालन : कृषी व्यवसायात जगात सर्वत्र कोंबडी वा या वर्गातील पक्ष्यांचेपालन कमी-अधिक प्रमाणावर आढळते. परसदारी वा शेतात कोंबड्या पाळणे, हा एक पारंपरिक व्यवसाय अाहे. हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्त्वावरही केला जातो; व्यापारी तत्त्वावर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते. यासाठी शास्त्रीय पद्धती वापरतात. भारतात हाव्यवसाय शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर चालतो, कारण या व्यवसायाला शहरातून आयती बाजारपेठ उपलब्ध होते. काही भागांत ससेपालन,एमूपालन व वराहपालनहे व्यवसाय केलेजातात.
मधमाशीपालन : मध व मेण यांसारखी उत्पादने मिळतात, म्हणून मधमाशीपालन व्यवसाय केला जातो. मध गोळा करण्यासाठी मधमाश्या फुलोरा आलेल्या झाडांवर फिरतात. त्यामुळेपरागीभवन चांगलेहोऊन झाडांची फलधारणा वाढते व परिणामी पिकाचेउत्पादन वाढते. मधमाशीपालनाचा व्यवसाय हा शेतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
मत्स्यपालन : मत्स्यशेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात. त्यांत पाणी साठवतात. या तळ्यांत मत्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातींचा वापर करण्यात येतो. माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संगोपन केलेजाते. खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये अनेक धोके असतात. जाळ्यात अनेक प्रकारचेमासे येतात. त्यांचे वर्गीकरण करण्याचेकाम वाढते. सर्वच माशांना सारखा भाव मिळत नाही, म्हणून एखाद्या विशिष्ट प्रकारच्या माशांची स्वतंत्र पैदास करण्यास सुरुवात झाली. त्यातूनच मत्स्यशेतीचा विकास झाला. वाम, रोहू, रावस, कोळंबी इत्यादी उत्पादन मत्स्यशेतीत घेतलेजात.
ेशीमशेती : रेशीम किड्यांच्या कोशांपासून रेशीमधागे मिळवले जातात.हेधागेअत्यंत सूक्ष्म व चिवट असतात. त्यांपासून मुलायम रेशीम वस्त्रनिर्मिती करता येते. काेशापासून धागानिर्मिती व धाग्यांपासून वस्त्रनिर्मिती हे स्वतंत्र व्यवसाय आहेत. यांचा समावेश कृषी या संज्ञेत होत नाही. शेतकऱ्यांना रेशीम किड्यांचे बीज वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवलेजाते. तुतीच्या झाडाचा पाला हे रेशीम किड्यांचेमुख्य खाद्य आहे. तुतीचेझाड कमीत कमी पंधरा वर्षे तरी जिवंत राहते, त्यामुळे दर वर्षी लागवडीचा खर्च वाचतो.
रोपवाटिका व्यवसाय : गेल्या काही वर्षांत फुलोत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्षशेती असेशेतीशी निगडित, परंतु वेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखालील क्षेत्र वाढत आहे. या प्रकारच्या उत्पादनांना चांगल्या दर्जेदार रोपांची, कलमांची, कंदांची व बियाण्यांची आवश्यकता असते. यातूनच रोपवाटिका हा व्यवसाय उदयास आला. या व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील चांगलेअसते.
शेतीचे प्रकार : एखादया प्रदेशातील भौगोलिक विविधता व सांस्कृतिक भिन्नता, तंत्रातील विविधता यांचा विचार करता शेतीच्या विविध पद्धती उदयास आलेल्या आहेत. शेती करण्याचा उद्देश, घेतली जाणारी पिके, शेती करण्याची पद्धती, वापरात येणारे तंत्र, भूमीचे उपयोजन इत्यादींवर शेतीचा प्रकार ठरतो. सर्वसाधारणपणे शेतीचे पुढील प्रकार करता येतील.
निर्वाह शेती :
पारंपरिक शेतीमध्ये सखोल शेती व स्थलांतरित शेती असे दोन प्रमुख प्रकार होतात. सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षांपर्यंत केली जाते. स्थलांतरित शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठरावीक काळानंतर त्याच जमिनीत पुन्हा शेती केली जाते.
सखोल शेती : कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेतीप्रकार म्हणजे सखोल शेती. जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने शेतजमिनीचे प्रमाण कमी या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते.
* या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते.
* या प्रकारातील शेतकरी व त्याचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते. शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते.
शेतीमध्ये प्राणिज ऊर्जेचा वापर जास्त होतो.
* अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो.
स्थलांतरित शेती :
भटकी शेती ही प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. उष्ण कटिबंधातील दाट अरण्यांच्या (वन) प्रदेशात तसेच डोंगराळ भागात या प्रकारची शेती केली जाते. शेती करण्यासाठी शेतकरी प्रथम वनातील जमिनीच्यातुकड्याची निवड करतो. तो जमिनीचा तुकडा शेतीयोग्य करण्यासाठी झाडेझुडपे, गवत कापतो. जमीन मोकळी करतो. कापलेली झाडे वाळल्यानंतर ती जाळतो. त्यानंतर शिल्लक राहणारी राख खत म्हणून मृदेत मिसळली जाते. पावसाळ्यापूर्वी पेरणी करताे व उत्पादन घेताे. (आकृती ९.६ पहा.) यातून मिळणारे उत्पादन अन्नाची गरज भागवण्यास पुरेसेनसते, त्यामुळे शिकार, मासेमारी व जंगलातील फळे, कंदमुळेगोळा करणे अशा गोष्टीही कराव्या लागतात. या प्रकारात जमिनीचा पिकाखालील कालावधी अल्प असून पडीक कालावधी दीर्घ असतो. जमिनीची उत्पादनक्षमता कमी झाल्यानंतर, दोन-तीन वर्षांनंतर, शेतीसाठी दुसरी जागा निवडली जाते.
व्यापारी शेती : व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्यशेती व मळ्याची शेती हे दोन प्रमुख प्रकार आहेत. या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादन मुख्यत्वे व्यापारी तत्त्वावर घेतलेजाते.
विस्तृत शेती ः
v शेताचे क्षेत्र २०० हेक्टर किंवा अधिक असते.
v मोठेशेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यांमुळेही शेती यंत्रांच्या साहाय्यानेकेली जाते. उदा., नांगरणीसाठी ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो.
v एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. उदा., गहू किंवा मका. याशिवाय बार्ली, ओट्स, सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात.
या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. उदा., यंत्रखरेदी, खते, कीटकनाशकांची खरेदी, गोदामे, वाहतूक खर्च यांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते.
v अवर्षण, कीटकांचा प्रादुर्भाव जसे टोळधाड तसेच बाजारभावातील चढउतार अशा प्रकारच्या समस्या विस्तृत शेतीशी संबंधित आहेत.
v समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती होते.
मळ्याची शेती ः
v शेतीचे क्षेत्र ४० हेक्टर किंवा अधिक असते.
v शेतीचे क्षेत्र डोंगरउतारावर असल्याने यंत्रांचा वापर फारसा करता येत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचेमहत्त्व अधिक असते.
v प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते, त्या पिकाची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे.
v या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचेउत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतलेजाते. उदा., चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी.
v या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहतकाळात (Colonial Period) झाला. बहुतांशी मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधातच केली जाते.
v दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, प्रक्रिया करणेइत्यादींमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते.
v मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्वया रण ऱ्हास, आर्कथि व व्यवस्थापनइत्यादी समस्या आहेत.
v या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशांत केली जाते.
मंडई बागायती शेती : मंडई बागायती शेती हा शेतीचा आणखी एक आधुनिक प्रकार आहे. हा शेतीप्रकार नागरीकरण व त्यामुळेतयार असलेल्या बाजारपेठेमुळे निर्माण झाला आहे. शहरी लोकांच्या मागणीमुळे निर्माण झालेली बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहराजवळच्या भागांत भाजीपाला व इतर पदार्थ पिकवतात. मागणी तसा पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमानुसारहा बागायती प्रकार शहरातील भाजीपाल्याची मागणी पूर्ण करतो. या शेतीचा आकार लहान असतो. जलसिंचनाचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर, कमी भांडवल, मनुष्यबळाचा वापर, बाजारपेठेची
मागणी, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबींचा समावेश यात होत असतो. ही शेती वाहतुकीच्या सोईसुविधांवर अवलंबून असते. जलद वाहतुकीवर या शेतीतील उत्पादनाचा दर्जा व किंमत ठरते, म्हणून या शेतीला ‘ट्रक शेती’ (Truck Farming) असेही म्हणतात. फलोद्यान/फुलशेती : मंडई बागायती शेतीचा एक उपप्रकार म्हणजेफळ व फुलांची शेती. या शेतीतील फळे व फुलेही मुख्य उत्पादनेहोत. ही शेती पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने केली जाते. शेतीचा आकार लहान F असतो. प्रत्येक रोपाची व्यवस्थित काळजी घेतली जाते.
अलीकडच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी जलसिंचनाच्या सोई, रासायनिक खतांचा वापर,हरितगृहे इत्यादींचा अवलंब या शेतीत होताना दिसतो. (आकृती ९.९ पहा.) फुलशेतीतील प्रमुख उत्पादनेम्हणजे लिली, जरबेरा, ट्युलिप, डेलिया, शेवंती, झेंडू, निशिगंध इत्यादी फुले. यांना बाजारात चांगली किंमत मिळते. आंबा, सीताफळ, द्राक्ष, केळी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, चेरी, संत्री, रासबेरी, स्ट्रॉबेरी, मलबेरी इत्यादी देशी-विदेशी फळांचेउत्पादन फळशेतीत घेण्यात येते. (आकृती ९.१० पहा.) महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक इत्यादी ठिकाणी ही उत्पादने होतात. भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश, तसेच फ्रान्स व इटली हे देश फळे व फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत.
कृषिपर्यटन : कृषिपर्यटन हेपर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आहे. उष्ण कटिबंधीय देशांमध्ये विविध प्रकारची कृषी उत्पादनेहोतात, त्यामुळेकृषिपर्यटनास मोठा वाव आहे. कृषिप्रधान देशांमध्ये ग्रामीण भागातील संस्कृती, चालीरीती व जीवन यांचा उपयोग कृषिपर्यटनासाठी करून घेतला जातो. (अाकृती ९.१३ पहा) शेतकरी, त्याचेघर, आहारविहार, शेती, परिसर या सर्वांचेकुतूहल व नावीन्य शहरातील लोकांना असते. ते पाहण्यासाठी अनेक जण ग्रामीण भागात जातात. कृषिपर्यटनामुळेशेतकरी व त्यांच्या गावालाही आर्थिक लाभ होतो.
भौगोलिक स्पष्टीकरण
चर्चेनंतर तुमच्या असेलक्षात आलेअसेल, की दिसायला आकर्षक असणारी फळे व भाज्या नेहमी योग्
पद्धतीने पिकवलेल्या असतीलच, असे नाही. लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळावे, यासाठी फळे व भाज्यांवर कृत्रिम रसायने व औषधांचा वापर केला जातो. त्यांतून उत्पादन तर लवकर मिळतेच, शिवाय ते आकर्षकही दिसते. अशी उत्पादने आरोग्याला मात्र हानिकारक असतात. बाजारातून विकत आणल्यानंतर अशी फळे किंवा भाज्या कमी काळ टिकतात.
विपणन व्यवस्था :
शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते. भारतासारख्या देशामध्ये या व्यवस्थेचे महत्त्व खालील माहितीच्या आधारे स्पष्ट होईल.
* भारतातील शेती ही मोठ्या प्रदेशात विखुरलेली आहे.
* सर्व शेतकरी संघटित नाहीत.
* अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने शेतीमालाचे विपणन स्वतः करू शकत नाहीत, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची यंत्रणा उभी केली आहे. या ठिकाणी शेतकरी आपला माल आणतात व व्यापाऱ्यांना विकतात.
* शेतीतील बहुतांश माल हा नाशवंत असल्याने त्याची योग्य वेळेत व्यवस्था लावावी लागते. यासाठी शेतकरी संघटना, ग्राहकपेठ, सहकारी संस्था इत्यादींची मदत होते. यामुळे दलाल, मध्यस्थ इत्यादींकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक टाळता येते.
काही प्रकारचा कृषिमाल हा थेट उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून वापरता येतो. जागतिकीकरणामुळे कृषिमालाला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठही सहज उपलब्ध होऊ लागली आहे. अनेक प्रगतशील शेतकरी त्यांच्या शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतातच, I त्याशिवाय शेतात तयार होणाऱ्या मालाची सुयोग्य बांधणी (Packaging) करून विकतात. हॉटेल, मॉल यांच्यासाठी सुद्धा असा शेतमाल मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतो. आंतरजालाच्या मदतीने जाहिराती देऊन देशी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हा माल विकला जातो.