९. जनाई

दुपारची मोट थांबली तशी जनाई उसाच्या रॉ करून आवाज कानावर येऊ लागला. ‘अगंबाई, फडातून बाहेर आली. पाण्याची दारं मोडून कंबर विमान!” म्हणून तिनं वर बघितलं, पण वर काहीच धरली होती. पाल्यानं कापलेलं अंग सारं भगभगत नव्हते! नुसतं कोरडं आभाळ पसरलं होतं.. होत. केव्हा घरात जाऊन पडीन, अस तिला झालं होतं; पण थेट वस्तीवर न जाता बाट वाकडी करून ती शेंगांच्या वावरात शिरली. आज सोमवार दोन वेल उपटून घ्यावेत. पोरही चार शेंगा खातील आणि आपल्याही पोटाला जरा आधार होईल, म्हणून लगालगा ती शेंगांच्या बावरात आली नि भुलल्यागत बघत उभी राहिली.

गॅसबत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झागमाग करावा तसं ते वावर चमकत होतं. वर ऊन असलं तरी खाली गार वाटत होतं. शेंगांना आलेली पिवळी फुलं बेलबुट्टीगत दिसत होती. हिरव्या-पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विणला होता रात्रदिवस घाम गाळून आपल्या हातांनी काढलेल्या त्या कशियाकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला.

निळंभोर आभाळ. चिटपाखरूसुद्धा नव्हते आणि रौं रौं रॉ असा आवाज तेवढा कानावर येत होता. कुठून आवाज येतोय हे कळेना आणि झेंडू फुटल्यागत झाला. उभं राहायला नको म्हणून गडबडीन बेल उपटायला खाली वाकली आणि विमान समोरून अंगावर आल्याचा भास झाला’ खाली केलेली मान घर करून बघती, तर समोरच्या चार काकरीचे वेल उलथेपालथे होत होते. भुईमुगाच्या आया वर उचलत होत्या आणि पायाखालची जमीन हादरा देत होती. रौं रौं रौं असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्यांनी बघितलं तर काळ्या ठिपक्यांची एक चार बाव तुळी अंगावर धावून येत होती’ ‘अगंबाई, साप म्हणून जनाई झटक्यान मागे फिरली आणि जमिनीला पाय न टेकता वारं सुटावं तशी पळत सुटली मागे न बघता थेट वस्तीवर येऊन थडकली. धाब दणाणून गेलं होतं. तिच्या जिवात जीव नव्हता. पोटात घाबरा

 पडला होता. अंग सार घामाने थबथबल होत. तोंडावाटे शब्द फुटत नव्हता वाचाच गेल्यागत झाली होती. हातपाय थरथरत होते. ऊर धाडधाड़ करीत होता वस्ती कशी गाठली हेच तिला समजत नव्हतं. बस्ती गाठली हे तरी खरं का, म्हणून डोळ्यांनी ती भोवती बघत होती. मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचे सारे भाऊबंद गोळा होऊन येत होते.

बघता बघता सारी वस्ती गोळा होऊन आली. कालवा उडाला. ‘काय झालं आये? म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागली. जमा झालेली सारी माणस तोंडाकडे बघत राहिली आता काय सांगायचं? ऊर अजून धडपडत होता. कानातला आवाज जात नव्हता. काही बोलणंच सुदरत नव्हते आणि कसं सांगायचं? तोवर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला, “काय झालं जना? उनाची अशी आरडत पळत का आलीस?’

धाप लागलेला कर तिला घड बोलू देत नव्हता. घडला प्रसंग कसाबसा तिन वर्णन केला आणि लोकाच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली. ते ऐकून सारी वस्ती भ्याल्यागत झाली. भ्याच पडलं. आपल्या रानात एक भुजंग आहे. पंधरा-बीस एकर रान हिंडतोय, असं आपल्या वाडवडलांकडून भाऊबंदांनीही ऐकलं होतं. ऐकून सगळ्यांना माहीत होत; पण गेल्या दहा वर्षांत त्याच नाव कधी निघाल नव्हत. कधी कुणाची गाठभेट नव्हती. एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती, त्यावर त्याचा कधी दूम नव्हता. कैक वर्षे त्याचा विसर पडल्यागतच झाला होता. त्यावर आज जनाईला दर्शन दिल होतं. बस्ती सारी चपापल्यागत झाली होती. जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला. गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला एक विमान सारख फिरत राहिल.

ती घरात बसून भागणार नव्हत. जिवाचा घडा करून जनाई शेतावर जात राहिली. एक दिवस तो समोर येऊन ठाकल्यावर मात्र तिनस्यालाच बजावल

“का बाबा, आमची पाठ घेतलीयस? कशापायी भ्या दावाय लागलाईस? आमच्या रानात वस्तीला हाइलाईस, तर आमची राखन करशील का भ्या दावशील? तूच राखन कराय पायजेस कस कस चाललंय ते तू बघतोस न्हवं? कशा तन्हेन दिवस कंठाय लागलोय, हे काय तुला म्हाईत न्हाई? बाबा, लई जीव वैतागलाय माझा! वस्तीला हेस आमच्या लई न्हाई थोडी तरी तुला कळकळ याय पायजे कुणाचं पाठबळ हाय का सांग बघू आम्हांला ? माझ्याशिवाय कोन फुडं होऊन करनार हाय का आमच्या घरात ? मग बाईमानसाला इनाकारणी तरास देणं हे तुझं काम न्हाय! माझ्या बाटला तू जाऊनेस.. येच्यापरास काय तुला मी आता ज्यास्त सांगत न्हाई. सांगायचं ते तुला सगळं सांगितलंय. आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खातो, तबर आपला कुठंतरी गपगार निघून जा कसा. माझी भाकरी खाऊन झाली म्हंजे मी जुंदळा कापायला लागनार बग! असं बसून कसं भागल? दिवस बुझस्तवर मला सगळं रान मोकळ कराय पायजे. हे बग, आता शेवटचं तुला हात जोडतो, मी मरायलाच आलोय काय करायचं ते तुझं तू ठरीब… खाऊ मी भाकर आता?”

परवानगी घेतल्यागत करून जनाई तिथन हलली. बांधाच्या एका झाडाखाली सावलीला येऊन बसली. फडक्यातली भाकरी काढून हातावर घेतली आणि रानाकडे बघत निवांत घास मोडू लागली. तिथे दोन घटका बसून तिनं सावचित्तानं जेवण केल. दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातल्या. संग आणल्याल तांब्याभर पाणी प्याली डर्रकन दोन ढेकर आले आणि मग ती उठली. आडवा पदर बांधून रानात शिरली. हातात विळा घेतला आणि मनगटासारखी घाट भराभरा खाली जमिनीला लोळण घेऊ लागली.

शंकर पाटील