९. वारली चित्रकला

भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त, परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त अाविष्कार म्हणजे आदिवासी कला असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल.

महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यांत वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृण्मूर्ती, धातुकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्‍चितच वरच्या दर्जाचा आहे.

आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. वारली प्रदेशांत छोट्या-छोट्यापाड्यांतील घराच्या कुडांवर व भिंतींवर चौकोन-त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्गसंपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. त्यात आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदीनाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रेरेखाटलेली दिसतात.

वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोेकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला अाविष्काराचा शोध घ्यावा लागतो. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरीशुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात; परंतु चित्रांचे आकार मात्र, निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. वारली चित्रांतील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी? असाही प्रश्‍न पाहाणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. रंगाचा अतिशय कमी वापर. उदा., तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग तेचित्र रंगवण्यासाठी करतात. चित्र काढण्यासाठी साधे ‘रफ स्केच’ देखील तयार करत नाहीत. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात.

रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रतां त्रिकोण, चौकोन, वर्तुळ ह मूलभू े त आकारच असतात. चित्रतां जी उभी रषेा रगवल ं ली अस े तेते आपल शरीर. े त्यांच्या चित्रतां ील झाड पे ाहा. वारली चित्रकार ही झाड रे गवं ताना नहमी े च मुळाकडून वर शेंड्यापर्तयं रगवं तो. अगदी सहजपण त् े यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते. अन्य चित्रकार झाड काढताना त्याच्या नमके उलट े म्हणज वरून ख े ाली रषेा काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकड जे ाणार म े ्हणज मे ृत्कड यू ने णे ारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणार मे ्हणजे जीवनाचा विकास करणार उद े योन्मुख जीवन असते.

लग्नप्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिकदृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. सात-आठ स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो. त्या दिवशी ही भित्तिचित्रे चितारण्याचे काम केले जाते. ‘धवलेरी’ ही आदिवासींची पुरोिहत समजली जाते. ‘धवलेरी’ स्त्रिया लग्न लावण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडतात.

वारली संस्कृतीत भित्तिचित्रांतील रेषाकृतींना आगळेवेगळे महत्त्व असते. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला. पानाच्या आकारातून त्यानेत्रिकोण, अंडाकृती आकार घेतले. पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यांतून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे-आडवे रेषांचे आकार तो शिकला. जवळ जवळ असलेले पाच तारे पाहताना, ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. अनेक आश्‍चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणेयांच्या अवलोकनातून मिळाली. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृतीतून प्रगट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे.

वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. अाजकाल टी-शरस, स ्ट्‌ाडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्‍तू, भेटकार्डयांवर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यांसाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे, तर परदेशांतही उमटली आहे.