10. अवकाश मोहिमा

अवकाश मोहीमा (Space missions)

तंत्रज्ञानात व विशेषतः अवकाश तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाशयानांची निर्मिती केली गेली व अवकाशयात्रा करणे शक्य झाले. तेव्हापासून हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षांमध्ये अवकाशात प्रस्थापित केले गेले आहेत. या शिवाय सूर्यमालेतील विविध घटकांचा जवळून अभ्यास करण्यासाठी काही विशिष्ट यंत्रे सूर्यमालेतील विविध घटकांकडे पाठवून अवकाश संशोधन मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. याविषयी आपण या पाठात जाणून घेणार आहोत.

अवकाश मोहिमांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून विविध प्रकारचे संशोधन करणे तसेच उपग्रहांचा आपल्या जीवनोपयोगी गोष्टींसाठी उपयोग करणे हे पहिल्या प्रकारच्या मोहिमांचे उद्दिष्ट असते. दुसऱ्या प्रकाराच्या मोहिमांचे उद्दिष्ट सौरमंडलातील वा त्या बाहेरीलही विविध घटकांकडे अवकाशयाने पाठवून त्या घटकांचे जवळून निरीक्षण करणे व त्यांना जाणून घेणे हे असते.

माहीत आहे का तुम्हांला?

अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा युरी गागारीन होता. त्याने सन 1961 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली. सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी (1969) व्यक्ती नील आर्मस्ट्राँग (अमेरिका) ही होय. भारताच्या राकेश शर्मायांनी सन 1984 मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या. सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांनीही अमेरिकेच्या ‘नासा’ (National Aeronautics and Space Administration) या संस्थेच्या अवकाशयानातून अवकाश भ्रमण केले.

 

अवकाश मोहीमांची गरज व महत्त्व

अंतराळ मोहिमांद्वारे प्रक्षेपित केल्या गेलेल्या कृत्रिम उपग्रहांमुळे आज जग एक ‘वैश्विक खेडे’ झाले आहे. आज आपण क्षणार्धात जगातील कोणत्याही भागात असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. घरबसल्या जगभरातील घडामोडींची माहिती प्राप्त करू शकतो. अंतरजाल (Internet) चे महत्व तर तुम्ही सगळे जाणताच. त्याद्वारे कुठलीही माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. येणाऱ्यार्नैसर्गिक आपत्तींचीही पूर्वसूचना मिळून सतर्क राहणे शक्य झाले आह.लढाईत शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल तसेच भूगर्भात खनिज पदार्थांचा साठा कोठे आहे

कृत्रिम उपग्रह (Artificial satellite)

नैसर्गिक उपग्रह म्हणजे पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू होय. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. सौरमंडलातील इतर काही ग्रहांना एकाहून अधिक नैसर्गिक उपग्रह आहेत. नैसर्गिक उपग्रहाप्रमाणेच एखादे मानवनिर्मित यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्यास कृत्रिम उपग्रह म्हणतात (आकृती 10.1 पहा).

पहिला कृत्रिम उपग्रह ‘स्पुटनिक’ (आकृती 10.2 पहा) हा रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला. आज असे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. हे उपग्रह सौर उर्जा वापरत असल्याने त्यांच्या दोन्ही बाजूला पंखांसारखे सौरपॅनेल लागलेले असतात. पृथ्वीवरून येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी व पृथ्वीकडे संदेश पाठविण्यासाठी उपकरणे बसविलेली असतात. प्रत्येक उपग्रहामध्ये त्यांच्या कार्यानुसार लागणारी इतर उपकरणे असतात. असा एक उपग्रह आकृती 10.1 मध्ये दाखविला आहे. पृथ्वीवरून उपग्रहाकडे जाणारे आणि उपग्रहाकडून पृथ्वीवरील भ्रमणध्वनी, भ्रमणध्‍वनी मनाेरे, इत्यादीकडे येणारे संदेश दाखवले आहेत. विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतात. त्यांच्या कार्यानुसार त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे केली जाते.

कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा (Orbits of Artificial Satellites)

 सर्व उपग्रह एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करीत नाहीत. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासूनची उंची किती असावी, भ्रमणकक्षा वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार असावी, विषुववृत्ताला समांतर असावी की विषुववृत्ताशी कोन करणारी असावी, या सर्व गोष्टी उपग्रहाच्या कार्यानुसार ठरतात.

भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी उपग्रहाला उपग्रह प्रक्षेपकामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येते. त्यानंतर त्या उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने विशिष्ट वेग (vc ) दिला जातो. हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालूलागतो. या वेगाचेसूत्र पुढीलप्रमाणेतयार करता येईल. जर m वस्तुमानाचाउपग्रह पृथ्वीच्या केंद्रापासूनrउंचीवर व पृष्ठभागापासून h उंचीवर vc या चालीने परिभ्रमण करत असेल तर (आकृती 10.3 पहा)त्यावर कार्य करणारेअभिकेंद्री

उच्च कक्षा (High Earth Orbits) : (भूपृष्ठापासून उंची > 35780 km)

ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्‍ठापासून उंची 35780 km किंवा जास्त असते त्या कक्षांना उच्च कक्षा म्हणतात. आपण पुढील उदाहरणात पाहणारच आहोत, की भूपृष्ठापासून 35780 km एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास 24 तास लागतात. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला सुद्धा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. या उपग्रहाची कक्षा जर विषुववृत्ताला समांतर असेल तर, पृथ्वीला स्वतः भोवती परिवलन करण्यास लागणारा कालावधी व उपग्रहाला पृथ्वी भोवती परिभ्रमण करण्यास लागणारा कालावधी एकच असल्याने पृथ्वीच्या सापेक्ष हा उपग्रह अवकाशात जणू काही स्थिर आहे असा भास होतो. एकाच गतीने संमांतर चालत असलेल्या वाहनातील प्रवाशांना शेजारील वाहन स्थिर असल्याचा भास होतो, तसेच इथे घडते. म्हणून अशा उपग्रहांना भूस्थिर उपग्रह (Geosynchronous Satellite) असे म्हणतात. असे उपग्रह भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतात. म्हणून हवामानशास्त्र, दुरध्वनी, दूरचित्रवाणी, आकाशवाणी यांच्या संदेशवहनामधेही यांचा उपयोग होतो.

मध्यम कक्षा (Medium Earth Orbits) : (भूपृष्ठापासून उंची 2000 km ते 35780 km)

ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची उंची भूपृष्‍ठापासून 2000 km ते 35780 km च्या दरम्‍यान असते अशा कक्षांना मध्यम कक्षा म्हणतात. भूस्थिर उपग्रह हे विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करतात. त्यामुळे, उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी ते फारसे उपयुक्त ठरत नाहीत. त्यासाठी मग ध्रुवीय प्रदेशांवरून जाणाऱ्या लंबवर्तुळाकार मध्यम कक्षा वापरण्यात येतात. या कक्षांना ‘ध्रुवीय कक्षा’ असे म्हणतात. या कक्षांमध्ये उपग्रह जवळपास 2 ते 24 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. काही उपग्रह भूपृष्ठापासून जवळपास 20,200 km उंचीवर वर्तुळाकार कक्षेतून भ्रमण करतात. दिशा-दर्शक उपग्रह या कक्षांमध्ये भ्रमण करतात.

निम्न कक्षा (Low Earth Orbits) : ( भूपृष्ठापासून उंची 180 km ते 2000 km)

ज्या उपग्रह भ्रमणकक्षांची भूपृष्‍ठापासून उंची 180 km ते 2000 km असते अशा कक्षांना निम्न कक्षा म्हणतात. शास्त्रीय प्रयोगांसाठी अथवा हवामान अभ्यासासाठी वापरले जाणारे उपग्रह निम्न कक्षांमध्ये भ्रमण करतात. त्यांच्या कक्षांच्या उंचीनुसार जवळपास 90 मिनिटात त्यांचे एक परिभ्रमण पूर्णहोते. आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक (International Space Station), हबल दुर्बिण हे सुद्धा याच प्रकारच्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात.

उपग्रह प्रक्षेपक (Satellite Launch Vehicles)

उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षांत स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकांचा (Satellite Launch Vehicles) उपयोग केला जातो. उपग्रह प्रक्षेपकाचेकार्य न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. प्रक्षेपकामध्ये विशिष्ट प्रकारचेइंधन वापरलेजाते. या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा वायू हा उष्ण असल्यानेप्रसरण पावतो व त्या प्रक्षेपकाच्या शेपटाकडून प्रचंड वेगानेबाहेर पडतो. याची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावरएक ‘रेटा’ (Thrust) कार्य करतो. प्रक्षेपकाला जो रेटा लावला जातो त्यामुळेप्रक्षेपक अवकाशात झेपावतो. उपग्रह किती वजनाचा आहेआणि तो किती उंचीवरील कक्षेत प्रस्थापित करायचा आहे, यानुसार प्रक्षेपकाचा आराखडा ठरतो. प्रक्षेपकाला लागणारेइंधनही यावरून ठरते. एकंदरच, प्रक्षेपकामध्ये इंधनाचेच वजन खूप जास्त असते. त्यामुळेप्रक्षेपक उडवतांना त्याच्यासोबत इंधनाचेखूप वजनही वाहून न्यावेलागते. मग यासाठी टप्प्याटप्प्यानेबनलेले प्रक्षेपक वापरतात. या युक्तीमुळेप्रक्षेपकानेउड्डाण केल्यानंतर टप्प्या-टप्प्यानेत्याचेवजनही कमी करता येते.उदाहरणार्थ, समजा एखादा प्रक्षेपक दोन टप्प्यांचा आहे.

प्रक्षेपकाच्या उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यातील इंधन व इंजीन वापरलेजातेव तेप्रक्षेपकाला ठराविक वेग व उंची प्राप्त करून देते. या पहिल्या टप्प्यातील इंधन संपलेकी इंधनाची रिकामी टाकी व इंजिन प्रक्षेपकापासून मुक्त होवून खाली समुद्रात किंवा निर्जन जागी पडते. पहिल्या टप्प्यातील इंधन संपताच दुसऱ्या टप्प्यातील इंधन प्रज्वलित झालेलेअसते. मात्र आता प्रक्षेपकात फक्त दुसराच टप्पा राहिल्यानेत्याचे वजन बरेच कमी झालेलेअसतेव आता तेअधिक वेगानेप्रवास करू शकते. बहुतेक सर्व प्रक्षेपक अशा दोन किंवा अधिक टप्प्यांनी बनलेली असतात. उदाहरण म्हणून आकृती 10.5 अ मध्‍ये भारताच्या इस्रो (ISRO) या संस्थेनेतयार केलेल्या एका प्रक्षेपकाचे(PSLV) चित्र दिले आहे

पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा (Space missions away from earth )

बहुतेक कृत्रिम उपग्रह आपल्या जीवनाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी वापरलेजातात. पण आपण मागील इयत्तेत कृत्रिम उपग्रहांवर ठेवलेल्या दुर्बिणीदवारे विश्वातील विविध घटकांची अधिक माहिती कशी मिळवता येते हे पाहिलेआहे. त्याचप्रमाणेकाही अवकाश मोहिमा विश्वाविषयीचेआपलेज्ञान वाढवण्यासाठी राबवल्या जातात. यात अवकाशयानेसौरमंडळातील इतर घटकांकडे, त्यांचेजवळून निरीक्षण करण्यासाठी, वापरली जातात. अशा मोहिमांतून नवीन माहिती समोर आली असून सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीला समजून घेण्यात प्रगती झाली आहे. अशा मोहिमांसाठी अवकाशयाने पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त होऊन अंतराळात प्रवास करू शकली पाहिजेत. आपण गुरुत्वाकर्षण या पाठात शिकलो आहोत की असे होण्यासाठी एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा, म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेग हा पृथ्वीच्या मुक्तिवेगाहून (Escape Velocity, vesc ) अधिक असणेआवश्यक असते. एखाद्या ग्रहावरील मुक्तिवेग हा खालील सूत्रानेकाढता येतो

चंद्रमोहिमा (Moon missions)

चंद्र आपल्या सर्वात जवळची खगोलीय वस्तू असल्यामुळेसूर्यमालेतील घटकांकडे पाठवलेल्या मोहिमांमध्‍ये चंद्रमोहिमा या सर्वात पहिल्या अंतराळमोहिमा होत्या. अशा मोहिमा आजपर्यंत सोव्हियत युनियन, अमेरिका, युरोपियन देश, चीन, जपान व भारताद्वारेराबविल्या गेल्या आहेत. सोव्हियत युनियनने पाठवलेली लुना मालिकेतील अवकाशयाने चंद्राजवळ पोचली होती. 1959 मध्ये प्रक्षेपित केलेलेलुना 2 हेअसे पहिलेयान होते. तेव्हापासून ते1976 पर्यंत पाठवलेल्या 15 यानांनी चंद्राचेरासायनिक विश्लेषण केलेव त्याचेगुरुत्व, घनत्व व चंद्रापासून निघालेल्या प्रारणांचे मापन केले. अंतिम 4 यानांनी चंद्रावर उतरून तेथील दगडांचेनमुने पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये अभ्यासण्यासाठी आणले. या मोहिमा मानवरहित होत्या. अमेरिकेनेदेखील 1962 ते1972 मध्ये चंद्रमोहीमा राबवल्या. त्यांचेवैशिष्टय म्हणजेत्यांच्या काही यानांद्वारे मानवही चंद्रावरउतरला. जुलै 1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाउल ठेवणारा प्रथम मानव ठरला. सन 2008 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) या संस्थेनेचंद्रयान 1 चेयशस्वी प्रक्षेपण केलेव तेयान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले. वर्षभर त्या यानाने पृथ्वीवर माहीती पाठवली. या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजेचंद्रावरील पाण्याचेअस्तित्व. हेशोधून काढणारा भारत हा प्रथम देश ठरला.

मंगळ मोहिमा (Mars missions)

चंद्रानंतर पृथ्‍वीला दुसरी जवळची खगोलीय वस्तू म्हणजे मंगळ. मंगळाकडेही अनेक राष्ट्रांनी याने पाठविली. परंतु ही मोहीम अवघड असल्यानेत्यातील जवळजवळ अर्ध्या मोहिमा यशस्वी होऊ शकल्या नाही. मात्र आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी इस्रोनेकेली आहे. इस्रोनेअत्यंत्य कमी खर्चात नोव्हेंबर 2013 मध्ये प्रक्षेपित केलेले मंगलयान सप्टेंबर 2014 मध्ये मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झालेव त्याने मंगळाचा पृष्ठभाग व वायुमंडल याबद्दल महत्वाची माहिती मिळवली.

अंतराळात जाणारे पहिले भारतीय. भारत-रशिया संयुक्‍त अवकाश कार्यक्रमांतर्गत दोन रशियन अंतराळ संशोधकांसमवेत अवकाशात झेप. 8 दिवस अंतराळात वास्तव्य.

पंजाबमधून एरोनॉटीक्स ची अभियांत्रिकी पदवी व 1988 मध्ये कोलोराडो विद्यापीठातून डॉक्टरेट. संशोधन मोहिमेदरम्यान 336 तास अंतराळात.1 फेब्रूवारी 2003 ला अंतराळातून पृथ्वीवर परतताना कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला

2006 मध्ये डिस्कव्हरी मधून प्रथम अंतराळात International space station येथेप्रवास व 29 तास शटल बाहेर काम. 192 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम.

इतर ग्रहांच्या मोहिमा :

इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठीही अनेक मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. यातील काही यानांनी ग्रहांची परिक्रमा केली, काही याने ग्रहांवर उतरली तर काही ग्रहांच्या जवळून, त्यांचे निरीक्षण करून पुढेगेली. या शिवाय लघुग्रह व धूमकेतूअभ्यासण्यासाठी अवकाशायाने पाठवली गेली आहेत व लघुग्रहावरील धूलिकण व दगड पृथ्वीवर आणण्यात यश मिळालेआहे. या सगळ्या मोहीमांतून आपल्याला मौल्यवान माहिती मिळत आहेआणि आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रान्ती विषयीच्या कल्पना अधिक स्पष्ट होत आहेत.

भारत व अवकाश तंत्रज्ञान

भारतानेही प्रक्षेपकांच्या विज्ञान व तंत्रज्ञानात खूप अभिमानास्पद प्रगती केलेली आहे. प्रक्षेपणासाठी वेगवेगळ्या प्रकारचेप्रक्षेपक तयार केलेआहेत जे2500 kg वजनापर्यंतचेउपग्रह सर्व प्रकारच्या कक्षांमध्ये प्रस्थापित करू शकतात. यात PSLV व GSLV हेप्रमुख आहेत. भारतानेअंतराळशास्त्र व विज्ञानात केलेल्या प्रगतीचेराष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठे योगदान आहे. दूरसंचार (Telecommunication), दूरचित्रवाणी प्रसारण (Television broadcasting) आणि हवामानशास्त्र-सेवा (Meterological services) यासाठी INSAT व GSAT उपग्रह मालिका कार्यरत आहे. यामुळेच देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकली. याच मालिकेतील EDUSAT उपग्रह तर फक्त शिक्षणक्षेत्रासाठी वापरला जातो. देशातील नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन(Monitoringand management of natural resources) आणि आपत्ती व्यवस्थापन(Disaster management) यासाठी IRS उपग्रहमालिका कार्यरत आहे. पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचेअत्यंत अचूक अक्षांश (Latitude) व रेखांश (Longitude) निश्चित करण्यासाठी IRNSS ही उपग्रह मालिका प्रस्थापित केली आहे

परिचय शास्त्रज्ञांचा

विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमांचेजनक म्हटलेजाते. त्यांच्या प्रयत्नांतून फिजीकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL) या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1962 साली भारत सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय अंतराळ संशोधन समिती’ची स्थापना करून 1963 साली देशातील पहिलेउपग्रह प्रक्षेपण केंद्र थुंबा येथे स्थापन केलेगेले.त्यांच्या प्रयत्नांतूनच भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात सोडला होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेच्‍या (ISRO) स्थापनेत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.

 

अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन

कृत्रिम उपग्रहांबरोबरच इतरही मानवनिर्मित वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. यात आता कार्यशील नसलेले उपग्रह, प्रक्षेपणाच्या वेळी सुटेझालेलेप्रक्षेपकांचे भाग व एखादा उपग्रह दुसऱ्या एखाद्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्‍तूवर आदळल्यामुळे निर्माण होणारेतुकडेअशा सर्व वस्तूंचा यात समावेश होतो. 2016 च्या एका अंदाजाप्रमाणे अशा निरूपयोगी वस्‍तूंचे1 सेमी हून जास्त लांबीचे2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. हेसगळेम्हणजे अवकाशातील कचराच होय.

हा कचरा कृत्रिम उपग्रहांसाठी धोक्याचा ठरू शकतो. उपग्रहांवर व इतर अवकाशयानांवर आदळून तो त्यांना हानी पोहोचवूशकतो. हा कचरा दिवसेंदिवस वाढत चाला आहे. लवकरच यामुळेनवीन अवकाशयानांचेप्रक्षेपण कठीण होऊन बसेल. त्यामुळेया कचऱ्याचेव्यवस्थापन करणेगरजेचेआहे. या दृष्टीनेकाही पद्धतींचेअध्ययन व काही प्रयोग करण्यात येत आहेत. या समस्येवर उपाय लवकरच सापडेल व उपग्रह व अवकाशयानांचे भवितव्य धोक्यात येणार नाही, अशी आशा आहे.