10. आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती (Disaster)

पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात. त्यांना आपत्ती म्हणतात. नद्यांना येणारेपूर, ओला व कोरडा दुष्काळ, वादळे, भूकंप, ज्वालामुखी या काही प्रमुख नैसर्गिक आपत्ती होत. मानवावर अचानक ओढवलेली संकटेहोत. या घटनांमुळेपर्यावरणात आकस्मिक परिवर्तन घडून येतेतसेच अशा विध्वंसक घटनांपासून पर्यावरणाला हानी पोहोचते.

पर्यावरणातील साधनसंपत्तीचा आपल्या विकासासाठी उपयोग करतानादेखील पर्यावरणाला हानी पोहोचते. त्यातून अचानक व मानवाच्या नकळत काही आपत्ती ओढवतात. त्यांना मानवनिर्मित आपत्ती म्हणता येईल.

संयुक्त राष्ट्रसंघाने‘आपत्ती म्हणजेअशी घटना की ज्यामुळेअगदी आकस्मिकपणेप्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारचीहानी संभवते’ अशी आपत्तीची व्याख्या केलेली आहे. यातील आकस्मिकपणेव प्रचंड हे शब्द महत्त्वाचेआहेत. आपत्ती ही आकस्मिकपणेओढवतेत्यामुळे तिचा आधी अंदाज येऊ शकत नाही. म्हणून सावधगिरी बाळगता येत नाही. ज्या ठिकाणी आपत्ती येतेत्या परिसरातल्या मालमत्तेचेप्रचंड नुकसान होते. वित्त व प्राणहानीसारख्या घटनेचेसमाजावर दीर्घकालीन परिणाम होतात. हेपरिणाम आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदा आणि प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात होतात. आपत्ती ज्या ठिकाणी ओढवलेली आहेत्या भागातील जनजीवन विस्कळीत होते. आपदग्रस्तांची जैविक, आर्थिक तसेच अन्य प्रकारची हानी होते.

मागील इयत्तांमध्ये आपण विविध प्रकारच्या आपत्तींविषयी आणि उपाययोजनांविषयी माहिती घेतलेली आहे. कोणत्याही दोन आपत्ती सारख्या नसतात. प्रत्येक आपत्तीचा कालावधी एकसारखा नसतो. काही आपत्ती ह्या अल्पकाळ तर काही दीर्घकाळ राहतात. प्रत्येक आपत्ती ओढवण्याची कारणेसुद्धा वेगवेगळी असतात. आपत्तींचा पर्यावरणातील नेमका कोणत्या घटकावर जास्त परिणाम होणार आहेहेत्या आपत्तीच्या स्वरूपावरून लक्षात येते.

मागील इयत्तांमध्ये आपण विविध प्रकारच्या आपत्तींचेहोणारेपरिणाम आणि आपत्ती ओढवल्यास घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती घेतलेलीच आहे. आपत्तीचेअसेही वर्गीकरण करता येईल, जसेप्रलयकारी आपत्ती. उदा. ओडिशातील चक्रीवादळ, गुजरातमधील प्रलयंकारी भूकंप तसाच लातूरचा भूकंप व सातत्यानेआंध्रच्या किनाऱ्यावर दरवर्षी घोंघावणारी चक्रीवादळे,ज्यामुळेत्या त्या भागात हाहाकारउडाला, मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. पण तरीही सामान्य जनजीवन काही काळानेसुरळीत झाले. दूरगामी परिणाम साधणाऱ्या आपत्ती म्हणजेघटनेनंतरही त्यातील दुष्परिणाम एकतर गंभीर असतात किंवा त्या गंभीरतेत जसा काळ लोटतो तशी वाढच होत जाते. उदा. दुष्काळ, पिकांवर आरिष्ट, कर्मचारी संप, वाढणारी समुद्र पातळी, वाळवंटीकरण इत्यादी.

आपत्तीचे परिणाम ((Effects of disaster)

वरील प्रश्नांच्या आधारे आपण आपत्तींच्या गंभीर परिणामांविषयी जाणून घेतले आहे. पुरांमध्ये रहदारीचे पूल वाहून जाणे, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरणे, अन्नाची तूट निर्माण होणे अशा समस्या निर्माण होतात तर, भूकंपामध्ये घरांची पडझड होणे, जमिनीला भेगा पडणे असे परिणाम दिसून येतात. वणवा, दुष्काळ या आपत्तीही पर्यावरणावर गंभीर परिणाम करून जातात. परंतु ह्या आपत्ती नेमक्या कशा स्वरूपाच्या असतात? त्या येण्यापूर्वी निसर्गात काही बदल घडून येतात का? आपत्ती ओढवल्यानंतर त्याचे परिणाम किती काळ टिकतात? कसे? या सर्वांचा विचार होणे गरजेचे असते. यामुळे आपल्याला आपत्तीच्या स्वरूपाची आणि व्याप्तीची कल्पना येते.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीमुळे निश्चितच परिणाम होतो. पण तो आपत्ती व अर्थव्यवस्थेच्या सापेक्ष असतो म्हणजे बंदर उद्ध्वस्त झाले की, त्यांच्या पुन:उभारणीवर बराच निधी खर्च झाल्याने त्याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतात. आपत्तीचा सामाजिक नेतृत्वावरील परिणाम म्हणजे एखाद्या आपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक दिशाहीन बनतात. याचा परिणाम त्यांच्या कार्यातील सहभागावर होतो. आपत्तीकाळात प्रशासकीय अडचणी उद्भवतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना आपत्तीची झळ पोहचल्यास त्या अनुषंगाने असणारे इतर विभागही आपत्तीस सक्षमपणे तोंड देऊ शकत नाहीत. संबंधित सर्वविभागांना या आपत्तींचा फटका बसतो व तेथील सर्वव्यवस्था कोलमडून पडते.

आपत्तींचे स्वरूप व व्याप्ती (Nature and scope of disaster)

आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता काही महत्त्वाच्या बाबी विचारात घ्याव्या लागतील त्या पुढीलप्रमाणे.

1. आपत्तीपूर्वीचा काळ (Pre-disaster phase)
2. इशारा काळ (Warning phase)
3. आणीबाणीचा काळ (Emergency phase)
4. पुनर्वसनाचा काळ (Rehabilitation phase)
5. प्रतिशोधनाचा काळ (Recovery phase)
6. पुर्ननिर्माणाचा काळ (Reconstruction phase).

आपत्तीच्या स्वरूप आणि व्याप्तीचा सखोल विचार करता सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे तीनच भाग संवेदनशील असतात.

  1. आणीबाणीची अवस्था : या अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याच काळात वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येतात. त्यामध्ये शोध आणि बचाव कार्य, वैद्यकीय मदत, प्रथमोपचार, संपर्क व दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे, धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतर करणे, या व इतर अनेक कृती अपेक्षित असतात. ह्याच काळात आपत्तीचा अंदाज बांधता येतो.
  2. संक्रमणावस्था : या अवस्थेत आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम चालू करतात. जसे ढिगारे हलवणे, पाण्याचे नळ ठीकठाक करणे, रस्ते दुरुस्ती इत्यादी. जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल. आपद्ग्रस्ताचे पुनर्वसन कार्य हे या योजनेचे महत्त्वाचे अंग आहे. सर्वसाधारणपणे अशा नागरिकांना निरनिराळ्या संस्था रोख अथवा इतर मदत देऊ शकतात. त्यांना कायमस्वरूपी उद्योगधंदे अथवा इतर मिळकतीचे साधन उपलब्ध करून दिल्यावर त्यांच्यावरील मानसिक आघात ओसरण्यास कमीत कमी काळ लागतो व त्यांचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन होऊ शकते.
  3. पुनर्निर्माण अवस्था : ही अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची असते. कारण तिची सुरुवात संक्रमणावस्थेत होते ह्या काळात इमारतींची पुनर्बांधणी, रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत करणे इत्यादी कामे केली जातात. शेती व्यवसाय पूर्ववत सुरू होतो. पुनर्बांधणीचे काम पूर्णत्वास नेण्यास बराच कालावधी लागतो.

आजपर्यंत पृथ्वीने अनेक नैसर्गिक आघात सोसले आहेत. त्यांची वर्णने ऐकून मानवी मन सुन्न होते. यातील बहुसंख्य आघात अथवा त्या आघातामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती ही बहुतांश वेळा आशिया खंड व प्रशांत महासागराचा परिसर यात झालेली आहे. या व अशा आघातांमुळे पृथ्वीचे तसेच सजीवांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

खरे पाहता, कित्येक वर्षांच्या जुन्या प्रश्नांनी आता उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. जसे की वाढती लोकसंख्या, त्यांच्या वाढत्या गरजा, त्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्या, त्याचे स्वरूप आता टोकाच्या अवस्थेत आहे. त्यातून दुसऱ्या महायुद्धानंतर अशा आपत्ती अधिकच वाढत गेल्या आहेत. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, वांशिक आणि धार्मिक तेढ अशा अनेक कारणांनी देशात अशांततेचे वातावरण निर्माण होते. दहशतवाद, अपहरण, समाजातील संघर्षया बाबी आता नित्याच्याच झाल्या आहेत.

विकसित देशांमध्येकित्येक घातक रसायने उत्पादित करण्यास अथवा वापरण्यास मनाई आहे. मात्र त्याच विषारी अथवा मानवाच्या ऱ्हासास कारणीभूत होऊ शकतील अशा रसायनांचे उत्पादन मागास किंवा विकसनशील देशांमध्ये सर्रास केले जाते.

अणुभट्‌ट्यांपासून मानवाला असाच दुसरा धोका आहे. उदा. रशियातील चेर्नोबिल अणुभट्टीत स्फोटामुळेझालेली किरणोत्साराची गळती. त्याचेदुष्परिणाम आजही त्या भागात जाणवत आहेत. ही अणुभट्टी फक्त वीजनिर्मितीसाठी वापरली जात होती.आजच्या काळामध्ये अनेकदेश अणुशक्ती संपन्नआहेत.त्यातूनच निष्काळजीपणामुळे किरणोत्साराचा धोका वाढू लागला आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचेमहत्त्व ही सर्व राष्ट्रांची प्रथम गरज झाली आहे. ही सर्वसामान्य गरज जशी सरकारला, तशीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक, देशातील नागरिकांना आहे. कारण कोणत्याही आपत्तीत नागरिकच होरपळून निघतात. यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा थेट सहभाग अत्यावश्यक आहे. तसेच अशा योजनांमध्ये स्थल, काल आपत्तीनुरूप बदल करणेही विशिष्ट काळापुरती मर्यादित राहू नयेअशी अपेक्षा आहे. एकंदरीत आपत्ती कसलीही असो त्यावर मात करणेआवश्यक असते. यातूनच आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना निर्माण झाली आहे.

आपत्ती व्यवस्थापन (Disaster management)

आपत्ती लहान असो वा मोठी, अल्पकालीन असो वा दीर्घकालीन, त्यावर मात करणेमहत्त्वाचेअसतेआणि त्यासाठीआपत्ती व्यवस्थापन प्रभावीआणि परिणामकारक असणे गरजेचे आहे. लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणेव त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेआपत्ती व्यवस्थापन होय. आपत्ती ही एक जलद प्रक्रिया म्हणजेअपघात असतात. अशा आपत्ती वेळी आपण काय करावे? स्वतःचे, मालमत्तेचे, प्राण्यांचे सरंक्षण कसेकरावे?

आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम त्या आपत्तीमुळेहोणारेनुकसान कमीत कमी कसे होईल या दृष्टीनेप्रयत्न करणे गरजेचेआहे. आपत्ती या नियोजित नसतात परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांचे निवारण होऊ शकते.

आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय, काटेकोर निरीक्षणानेव माहितीच्या पृथक्करणानेआपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणेव त्यात वेळोवेळी वाढ करणे. जसेकी आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार होऊन त्याचा कृती आराखडा तयार करणेव या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच त्याचे व्यवस्थापन करणे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना

आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात शासन स्तरावर प्राधिकरणाची रचना केलेली आहे. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नियंत्रण व निवारणाचे कार्य कसे चालते ते खालील ओघतक्त्यात दाखविले आहे. आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 संमत केला गेला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण : जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जबाबदार असतात. समन्वयक या नात्याने समर्पक निर्देश देणे, अंमलबजावणी करणे आणि त्या अंमलबजावणीचा व त्यामधून मिळणाऱ्या माहितीचा सतत आढावा घेत राहणे, नियंत्रण ठेवणे अशा सर्व कामांसाठी योग्य नियोजन करण्याचे कार्य ते करतात. प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी आनुषंगिक योजना तयार करून राज्यस्तरावर तिला अनुमोदित करून घेणे ही जबाबदारीसुद्धा जिल्हाधिकारी यांची असते.

जिल्हानिहाय आपत्ती नियंत्रण कक्ष : आपत्ती आघातानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना होते. आपत्तीसंदर्भात विविध आढावेआणि माहिती व अतिरिक्त मदत घेण्यासाठी व त्यांचा सतत पाठपुरावा करण्यासाठी हा कक्ष विविध यंत्रणांशी, उदा. स्थलसेना, वायूसेना, नौसेना, दूरसंचार, दळणवळण, निमलष्करी दल (पॅरामिलिटरी फोर्सेस) यांच्याशी सतत संपर्कात असते. जिल्ह्यातील स्वयंसेवी संघटनांना एकत्रित करुन आपत्ती निवारणाच्या कार्यात त्यांचा उपयोग करून घेणेही जबाबदारी नियंत्रण केंद्राची असते.

प्रथमोपचार व आपत्कालीन कृती (First Aid and action in Emergency)

मागील इयत्तांमध्ये तुम्ही आपत्तींमध्ये जखमी झालेल्यांवर कोणकोणतेप्रथमोपचार करायचे याची माहिती घेतली आहे. आपल्या वर्गातील सहकारी, आजूबाजूचे लोक हेकोणत्या ना कोणत्या आपत्तीत सापडतात, त्यांना इजा होते. अशा वेळी आपण घेतलेल्या माहितीचा वापर करणेत्यांच्या दृष्टीनेफायद्याचे ठरते.

कधी कधी आपल्या अनावधानानेसुद्धा आपत्ती ओढवतात. परिसरात वावरताना पुढे दिल्याप्रमाणेकाही चिन्हे दिसतात. त्यांकडेदुर्लक्ष करून चालणार नाही. अशी चिन्हे धोके टाळण्यासाठी फार उपयुक्त ठरतात.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपदग्रस्ताचेवहन करण्यासाठी पाळणा पद्धत, पाठुंगळीला मारणे, हातांची बैठक अशा विविध पद्धती वापराव्या लागतात. आपद्ग्रस्ताची शारिरिक स्थिती कशी आहे यानुसार वेगवेगळ्या पद्धती ठरतात. दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक लहान-मोठ्या आपत्तींना सामोरे जावे लागते. अपघात घडणे, गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीहोणे, भांडण-तंटे यातूनइजाहोणे, विजेचा झटका बसणे, भाजणे,उष्माघात होणे, सर्पदंश, श्वानदंश, विद्युत पुरवठ्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागणे, एखाद्या रोगाची साथ पसरणेअशा कितीतरी आपत्ती दिवसभरात आपल्या सभोवताली घडत असतात. या आपत्ती आपल्या घरी, शाळेत, आपण जेथेवावरतो तेथेघडून येतात. या आपत्तीकाळात आपली भूमिका नेमकी कोणती असावी? अचानक उद्भवलेल्या आपत्तीमुळेआपद्ग्रस्तास वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तत्काळ काही उपाययोजना मिळणेआवश्यक असते. अशा वेळेस प्रथमोपचार उपयोगी पडतो.

प्रथमोपचार पेटी (First-aid kit)

प्रथमोपचारासाठी आवश्यक असे साहित्य आपल्याजवळ असणे आवश्यक असते. प्रथमोपचाराच्या पेटीमध्ये हे साहित्य उपलब्ध असते. तुम्हांलादेखील अशी प्रथमोपचार साहित्याची पेटी तयार करता येईल. प्रथमोपचाराच्या वेळी आवश्यकतेनुसार स्थानिक परिस्थितीत उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करणेही महत्त्वाचे आहे.

अभिरूप सराव (Mock drill)

अभिरूप सराव (मॉक ड्रिल) हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी वेळेत मोजण्याचे एक साधन आहे. कोणत्याही आपत्तीशी संबंधित प्रतिसाद प्रक्रिया तपासण्यासाठी एखादी आपत्ती ओढवल्यानंतरच्या स्थितीचे आभासी संचलन करण्यात येते. त्यावेळी आपत्ती निवारणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वीरित्या होते की नाही हे पाहण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती त्यांना देण्यात आलेल्या कृती पार पाडतात. यावरून आपण आपत्ती निवारणासाठी उभी केलेली यंत्रणा किती सक्षम आहे हे पाहू शकतो.

‘आग लागणे’ या आपत्तीवर आधारित बचाव कार्याचा अभिरूप सराव अग्निशामक दलाच्या जवानांमार्फत अनेक शाळांमधून घेतला जातो. यामध्ये आग विझविण्यासंदर्भात, एखाद्या मजल्यावर अडकून पडलेल्या नागरिकास बाहेर काढण्यासंदर्भात तसेच आगीच्या प्रभावाखाली येऊन कपडे पेट घेतलेल्या नागरीकास कसे वाचवावे याबाबत काही महत्त्वाच्या कृती दाखविण्यात येतात. पोलिस दल तसेच विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत देखील असे उपक्रम राबविण्यात येतात.