10. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (Information Communication Technology : ICT ) या संज्ञेमध्ये संप्रेषणाची साधनेआणि त्यांचा वापर याचबरोबर त्यांचा वापर करून दिल्या जाणाऱ्या सेवांचाही समावेश होतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे निर्माण होणाऱ्या माहितीचा साठा प्रचंड वेगानेवाढत आहे. या माहितीच्या विस्फोटाकडेदुर्लक्ष केल्यास आपल्याजवळ असणारेज्ञान कालबाह्य ठरेल.

माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने : संप्रेषणासाठी माहिती निर्माण करणे, तिचे वर्गीकरण करणे, माहिती जतन करणे/साठवणे, माहितीचेव्यवस्थापन करणेइत्यादी सर्व क्रियांसाठी विविध साधनांचा वापर केला जातो. जसेटेलिफोनचा वापर संभाषणाद्वारेमाहितीची देवाणघेवाण करण्यासाठी होतो.

माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचेप्रमुख साधन असलेल्या संगणकाच्या पहिल्या निर्मितीपासून पाच पिढ्या मानण्यात येतात. संगणकाची पहिली पिढी 1946 ते1959 या कालावधीदरम्यानची मानण्यात येते. या काळात ENIAC हा संगणक तयार झाला. त्यामध्ये व्हॉल्वज वापरलेहोते. हे व्हॉल्वज आकारानेमोठेहोते. त्यांना वीजही खूप लागायची. त्यामुळे उष्णता निर्माण होई आणि पुष्कळदा संगणक बंद पडत असे. आजचे संगणक हेपाचव्या पिढीतील आहेत.

संगणकाचा आजच्या तंत्रज्ञान युगातील सर्वक्षेत्रीय प्रवेश ही बाबही संगणकाच्या वाढत्या वेगामुळेच शक्य झाली आहे. आपल्या सभोवताली असलेल्या कोणकोणत्या क्षेत्रात संगणकाचा वापर केला जातो?

संगणकाचे महत्त्वाचे घटक

मेमरी : ‘‘मेमरी’’ म्हणजे इनपूट युनिटकडून आलेली माहिती व तयार झालेले उत्तर साठवण्याची जागा. कॉम्प्युटरमध्ये दोन प्रकारची मेमरी वापरण्यात येते.

  1. कॉम्प्युटरची स्वत:ची (Internal Memory) 2. बाहेरून पुरवलेली मेमरी (External Memory) कॉम्प्युटरची Internal मेमरी दोन प्रकारची असते.
  2. RAM (Random Access Memory) ः ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्टस्पासून तयार केली जाते. कोणताही इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याला इलेक्ट्रॉनिक सप्लाय असेपर्यंतच काम करू शकतो.
  3. ROM (Read Only Memory) ः या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचूशकतो. मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही.

ऑपरेटिंग सिस्टिम : कॉम्प्युटर व त्यावर काम करणारी व्यक्ती या दोघांमध्येसुसंवाद साधण्याचे काम या प्रोग्राम्सद्वारे केले जाते. यालाच DOS (Disk Operating System) म्हणतात. ऑपरेटींग सिस्टिमशिवाय आपण कॉम्प्युटरचा वापर करू शकत नाही.

प्रोग्राम : प्रोग्राम म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह (Group) होय.

डाटा इन्फॉरमेशन : डाटा म्हणजे कच्च्या रूपातील माहिती (Information) होय.

1. Desktop वरील या Icon वर click करा.
2. File tab मधील New हे option निवडून Blank Document हा पर्याय निवडा.
3. स्क्रीन वरती दिसणाऱ्या कोऱ्या पानावरती keybord च्या सहाय्याने मजकूर type करा. type केलेल्या मजकुराची भाषा, आकार, अक्षर ठळक करणे, इ. Home tab मधील पर्यायांचा वापर करून मजकूर आकर्षक बनवा.
4. मजकुरामध्येequations type करण्यासाठी insert tab मधील equation हा पर्याय निवडा.

5. योग्य ते equation निवडून त्यामध्येगणितीय चिन्हांचा वापर करून type करा.

1. Desktop वरील या Icon वर click करा.
2. File tab मधील New हे option निवडून Blank Document हा पर्याय निवडा.
3. Screen वर दिसणाऱ्या Sheet मध्येज्या माहितीच्या आधारे आलेख काढायचा आहे ती माहिती type करून घ्या.
4. माहिती type करून झाल्यानंतर ती select करा व Insert tab मधील आवश्यक graph वर click करा.

5. आलेखाच्या आधारे माहितीचे विश्लेषण करा.

1. Desktop वरील या Icon वर click करा.
2.ज्या घटकावर आधारित Presentation बनवायचे आहे त्या घटकाशी संबंधित मजकूर, चित्रे किंवादोन्ही आपणाकडे
असणे आवश्यक आहे.
3. File tab मधील New हे option निवडून Blank Slide निवडा.
( Presentation नुसार आपणास आवश्यक अशी Slide निवडता येते)
4. निवडलेल्या Slide वर आपणास आवश्यक ती माहिती type करा व चित्रे Insert करा.
5. Design tab च्या सहाय्याने slide ला Design करा.
6. Animations tab च्या सहाय्याने slide ला animation द्या व slide show करा.