12. आम्ल, आम्लारी ओळख

आम्ल (Acid)

तुमच्या लक्षात येईल, की काही पदार्थ चवीला गोड, काही कडू तर काही आंबट किंवा तुरट असतात. लिंबू, चिंच, व्हिनेगर किंवा आवळा यांसारख्या पदार्थांना आंबट चव, ही त्यांच्यात असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या संयुगांमुळे प्राप्त होते. ह्या आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ल असे म्हणतात. आम्ल पाण्यात विद्राव्य असतात व ते क्षरणकारकही असतात.

 प्राणी आणि वनस्पतींमध्ये सुद्धा आम्ले असतात. खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा सेंद्रीय आम्ल असेही म्हणतात. ही आम्ले क्षीण प्रकृतीची असल्यामुळे त्यांना सौम्य आम्ल (weak acid) म्हणतात. काही आम्ले तीव्र प्रकृतीची असतात. ती दाहक असतात. उदा. सल्फ्यूरिक आम्ल (H2 SO 4 ), हायड्रोक्लोरिक आम्ल (HCl), आणि नायट्रिक आम्ल (HNO3 ). ह्या आम्लांना ‘खनिज आम्ल’ असेही म्हणतात. त्यांची संहत द्रावणे त्वचेवर पडल्यास त्वचा भाजते तसेच त्यांची धुरी श्वसनाद्वारे किंवा तोंडाद्वारे शरीरात गेल्यास ही हानिकारक ठरते. संहत आम्ले हळू हळू पाण्यात घालून त्यांचे विरल आम्लात रूपांतर करता येते. अशी विरल आम्ले संहत आम्लाच्या तुलनेत थोडी कमी हानिकारक असतात.

 तुम्ही खाण्याच्या सोड्याचे विरल द्रावण जर चाखले, तर ते काहीसे तुरट/कडवट जाणवेल. जे पदार्थ तुरट/कडवट चवीचे व स्पर्शाला बुळबुळीत लागतात, उदा. चुन्याची निवळी (Ca(OH)2 ), खाण्याचा सोडा (NaHCO3 ), कॉस्टिक सोडा (NaOH) व साबण इत्यादी पदार्थांना आम्लारी म्हणतात. आम्लारी हे आम्लापेक्षा पूर्णपणे विभिन्न असतात. ते रासायनिकदृष्ट्या आम्लाच्या विरुद्ध गुणधर्मांचे असतात. तेही संहत अवस्थेत त्वचेला दाहक असतात. आपणांस माहित आहे की उर्ध्वपातित पाणी चवहीन असते. पाणी हे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसते.

दर्शक (Indicator)

 जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसतात, ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात. आम्ल किंवा आम्लारी पदार्थांची चव घेणे किंवा त्यांना स्पर्श करणे खूप अपायकारक असल्याने त्यांची ओळख करण्यासाठी दर्शक (Indicator) म्हणून विशिष्ट पदार्थांचा वापर केला जातो. जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना ‘दर्शक’ असे म्हणतात.

नैसर्गिक दर्शक बनविणे

साहित्य : जास्वंद, गुलाब, हळद, लाल कोबीची पाने, गालन कागद इत्यादी.

कृती : लाल जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या पांढऱ्या गालन कागदावर घासा. ह्या पट्ट्या कापून घ्या. हा झाला जास्वंदपासून तयार झालेला दर्शक कागद. त्याचप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या पांढऱ्या गालन कागदावर घासा. ह्या कागदाच्या पट्ट्या कापून घ्या. हा झाला गुलाबाचा दर्शक कागद. हळदीची पूड घ्या. त्यात थोडे पाणी घाला. ह्या हळदीच्या पाण्यात गाळण कागद किंवा साधा कागद थोडा वेळ बुडवून ठेवा. वाळल्यावर त्या कागदाच्या पट्ट्या तयार करा. ह्याप्रमाणे हळददर्शक कागद तयार करा. लाल कोबीची पाने थोड्याशा पाण्यात टाकून पाणी तापवा. कोबीच्या पानाचे द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये कागद बुडवून बाहेर काढा. कागद वाळवून त्याचे छोटे तुकडे करा. ह्या प्रकारे कोबीच्या पानांचा दर्शक तयार करून पहा.

आम्ल (Acid)

आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन (H+) उपलब्ध करून देते/निर्माण करते. उदा. पाण्यातील द्रावणात हायड्रोक्लोरिक (HCl)(aq) चे विघटन होते. HCl (aq) H+ + Cl – (हायड्रोक्लोरिक आम्ल) (हायड्रोजन आयन) (क्लोराइड आयन)

आम्लांची काही उदाहरणे ः

हायड्रोक्लोरिक आम्ल(HCl), नायट्रिक आम्ल (HNO3 ), सल्फ्युरिक आम्ल (H2 SO 4 ), कार्बोनिक आम्ल (H2 CO 3 ) (शीतपेयांमधील), लिंबू व इतर अनेक फळांतील ॲस्काॅर्बिक आम्ल, सायट्रिक आम्ल, व्हिनेगरमधील ॲसेटिक आम्ल, इत्यादी. आपण वापरत असलेल्या खाद्यपदार्थांमध्येही काही नैसर्गिक (सेंद्रीय) आम्ले असतात. ती सौम्य प्रकृतीची असल्याने खनिज आम्लाप्रमाणे हानिकारक/अपायकारक नसतात.

आम्लाचे गुणधर्म :

  1. आम्लाची चव आंबट असते.
  2. आम्लाच्या रेणूत हायड्रोजन आयन (H+) हा मुख्य घटक असतो.
  3. आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते.
  4. आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन CO2 वायू मुक्त होतो.
  5. आम्लामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो.

आम्लाचे उपयोग :

  1. रासायनिक खतांच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात.
  2. तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्ये, रंग (dyes/ paints), स्फोटक द्रव्येयांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लांचा वापर होतो.
  3. भिन्न-भिन्न क्लोराइड क्षार बनविण्याकरिता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात.
  4. विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी (विद्युत घट) मध्येही वापरतात.

 5.पाणी जंतुविरहित करण्याकरिता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो.

  1. लाकडाच्या लगद्यापासून पांढराशुभ्र कागद बनविण्याकरिता आम्लाचा वापर होतो.

खनिज आम्ले शरीराला हानिकारक असतात. पण अनेक सेंद्रिय आम्ले आपल्या शरीरात आणि वनस्पतींमध्येही असतात आणि ती हितकारक असतात.

  • आपल्या शरीरातील DNA (डि ऑक्सिरायबो न्यूक्लिइक ॲसिड) हे आम्ल असते, जे आपले आनुवंशिक गुण ठरवते.
  • प्रोटिन शरीरातील पेशींचा भाग असतात, ते ॲमिनो ॲसिडने बनलेले असतात. · शरीरातील मेद (Fat) हा मेदाम्लापासून (Fatty Acid) बनलेला असतो.

आम्लारी (Base)

 आम्लारी हा एक असा पदार्थ असतो ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साइड आयन (OH- ) उपलब्ध करून देतात/ निर्माण करतात. उदा. NaOH (aq) Na+ (aq) + OH- (aq) (सोडिअम हायड्रॉक्साइड) (सोडिअम आयन) (हायड्राॅक्साइड आयन

आम्लारीचे गुणधर्म :

1. आम्लारीची चव कडवट असते.

2. त्यांचा स्पर्श बुळबुळीत असतो.

3. आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH- )हा मुख्य घटक असतो.

4. सामान्यतः धातूंची ऑक्साइड आम्लारीधर्मी असतात.

 उदासिनीकरण ः आपण पाहिले की आम्लामध्ये हायड्रोजन आयन (H+) आणि आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH- )असतात. आम्ल व आम्लारीच्या संयोगाने क्षार व पाणी निर्माण होतात.

उदा