2. आरोग्य व रोग

आरोग्‍य (Health)

 रोगाचा नुसता अभाव म्‍हणजेच आरोग्‍य नव्‍हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरीत्‍या पूर्णतः सुदृढ असण्याची स्‍थिती म्‍हणजे आरोग्‍य.

रोग म्‍हणजे काय ?

शरीरक्रियात्‍मक किंवा मानसशास्‍त्रीयरीत्‍या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्‍थिती म्‍हणजे रोग होय. प्रत्‍येक रोगाची विशिष्ट लक्षणे असतात.

रोगांचे प्रकार ः तुम्ही मधुमेह, सर्दी, दमा, डाऊन संलक्षण, हृदयविकार अशा विविध रोगांची नावे ऐकली असतील. या सर्व रोगांची कारणे व लक्षणे वेगवेगळी आहेत. विविध रोगांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते.

संसर्गजन्य रोग/संक्रामक रोग : दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक (कीटक व प्राणी) याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय.

सद्यःस्थितीतील काही महत्त्वाचे रोग

डेंग्यू (Dengue) ः साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यांपैकी एडिस इजिप्‍ती प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन -1-4 या विषाणूमुळे होतो.

 

लक्षणे

  1. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे.
  2. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखणे.
  3. रक्तातील रक्तबिंबिका (platelets) यांचे प्रमाण कमी होणे. त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होणे.

स्वाईन फ्लू ः संसर्ग होण्याची कारणे l स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. l स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव व थुंकीतून होतो.

 स्वाईन फ्लू ची लक्षणे

l धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे.

l घसा खवखवणे, शरीर दुखणे.

एड्स (AIDS) ः एड्स (AIDS – Acquired Immuno Deficiency Syndrome) हा रोग HIV (Human Immunodeficiency Virus) या विषाणूमुळे मानवाला होतो. यामध्‍ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्‍ती हळूहळू दुर्बल झाल्‍याने त्‍याला विविध रोगांची लागण होते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्याचे नेमके निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची चाचणी आहे. एड्सची लक्षणे व्यक्तिसापेक्ष असतात.

प्राण्‍यांमार्फत होणारा रोगप्रसार

ेबीज (Rabies) : रेबीज हा विषाणुजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू मज्जातंतूवाटे मेंदूत प्रवेश करतात. जलद्‍वेष (Hydrophobia) हे या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हणतात. रेबीज प्राणघातक रोग आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसांत दिसू लागतात.

 असंसर्गजन्‍य रोग ः जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. असे रोग काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात.

कर्करोग (Cancer) :पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशीसमूहास किंवा गाठीस दुर्दम्‍य अर्बुद म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यांसारख्या अवयवांत रक्त किंवा अन्य कोणत्याही उतीत होऊ शकतो.

कारणे ः अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारात चोथायुक्त अन्नपदार्थांचा (फळे व पालेभाज्यांचा) समावेश नसणे, अति प्रमाणात जंकफूड (वडापाव,पिझ्झा, इत्यादी) खाणे. यांसारखी अनेक कारणे असू शकतात. अनुवांशिकता हेही एक कारण असू शकते.

 लक्षणे 1. दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे. 2.उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज. 3. स्तनात गाठी निर्माण होणे. 4. अकारण वजन घटणे.

मधुमेह (Diabetes) : स्‍वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्‍तातील ग्‍लुकोज शर्करेच्‍या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्‍यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही, ह्या विकाराला मधुमेह म्‍हणतात.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. l रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यांसारखी लक्षणे आढळतात.

मधुमेहाची कारणे ः l अनुवंशिकता l अतिलठ्ठपणा l व्यायामाचा/कष्टाचा अभाव l मानसिक ताण/ तणाव

 हृदयविकार (Heart Diseases) : हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार अत्यावश्यक आहे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
छातीत असह्य वेदना होणे, छातीतील वेदनांमुळे खांदे, मान व हात दुखणे, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता, कंप जाणवणे.

हृदयविकाराची कारणे ः धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता.

औषधांचा गैरवापर ः कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्‍यक्‍ती औषधे घेतात. त्‍यांच्‍या अतिवापराने आपल्‍या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. जसे, जास्‍त प्रमाणात अथवा वारंवार वेदनाशामके (Pain Killers) घेतल्‍यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होतो. प्रतिजैविकांच्‍या (Antibiotics) अतिवापराने मळमळ, पोटदुखी,पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे इत्‍यादी लक्षणे तयार होतात.

जेनेरिक औषधे ः जेनेरिक औषधे यांना सामान्‍य औषधे असेही म्‍हणतात. या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्‍याही पेटेंट शिवाय केली जाते. ही औषधे ब्रॅन्‍डेड औषधांच्या समकक्ष व त्‍याच दर्जाची असतात. जेनेरिक औषध तयार करताना त्‍या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्‍या औषधांचा फॉर्मुला तयार मिळत असल्‍यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो त्‍यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रॅन्‍डेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते.

जीवनशैली आणि आजार ः जीवनशैली म्हणजे आहार-विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो. आजकाल उशीरा उठणे, उशीरा झोपणे, आहाराच्या वेळा सारख्या बदलणे, व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव असणे, जंकफूड (अरबट चरबट) खाणे अशा गोष्टींचे प्रमाणे वाढले आहे. यामुळेच आजारी पडण्याचे प्रमाणे वाढले आहे. आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये योग्य झोप, योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच व्यायामसुद्‍धा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा. प्राणायाम व योगासने तज्ज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली करावीत. विविध प्राणायाम व योगासनांचे व्हिडिओ पहा.

लसीकरण (Vaccination) ः आजार होऊ नये म्‍हणून, त्‍यांचा प्रतिबंध म्‍हणून लसीकरण करून घेणे हेही तितकेच महत्‍वाचे आहे. तुमच्‍या जवळच्‍या दवाखान्‍यातून लसीकरण तक्‍ता मिळवा व अभ्‍यासा.