4. पर्यावरणीय व्यवस्थापन

परिसंस्था (पुनरावलोकन)

जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असते. अन्ननिर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात. त्यांना खाणारे हरिण, शेळ्यामेंढ्या, गायी-म्हशी, घोडे-उंट असे शाकाहारी प्राणी महत्त्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ-सिंह यांसारखे हिंस्र प्राणीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचासुद्धा खरंच उपयोग असतो का? असा प्रश्न आपणांस कधीतरी पडत असेल. पण हे जीव घाणेरडे वाटले तरी अतिशय महत्त्वाचे आहेत. ते मुख्यतः निसर्गाची साफस फाई करतात.

म्हणजेच आपल्याभोवती असणाऱ्या या घटकांमुळेच आपले अस्तित्व आहे. यासाठी सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे.

पर्यावरण व परिसंस्था संबंध

पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण.

ैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव इत्यादींचा समावेश होतो. यातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. त्यांचे परस्परसंबंध फार महत्त्वपूर्ण असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचादेखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो. मूलत: पर्यावरणात दोन प्रमुख घटकांचा समावेश होतो

  1. जैविक घटक 2. अजैविक घटक . पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास ‘पारिस्थितिकी’ (Ecology) म्हणतात.

पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास परिसंस्था (Ecosystem) असे म्हणतात. पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. काही परिसंस्थांचा अभ्यास आपण मागील इयत्तांमध्ये केलेला आहेच. विचार केला तर पाण्याचे एखादे लहान डबके ही एक परिसंस्थाच आहे, तर आपली पृथ्वी ही सर्वांत मोठी परिसंस्था आहे. थोडक्यात, एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक, तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया, हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते.

पर्यावरण संवर्धन (Environmental conservation)

पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच, मुख्यत्त्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो.

आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकीएक प्रमुख समस्या आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचेवापदार्थाचे दूषितीकरण म्हणजेत्याचेप्रदूषण होय.पर्यावरणीय प्रदूषण म्हणजेनैसर्गिकघटनाअथवा मानवाच्या कृतीमुळेसभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल होय. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असेप्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे होय. मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेलेऔद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी कारणेपर्यावरणीय प्रदूषण घडवून आणतात.

प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्याच्या अस्तित्वावर होत असतो व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे.

पर्यावरण संवर्धनाची गरज (Need of environmental conservation)

पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहिती नसतात. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण-संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळू शकतील. याकरिता लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणा- विषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये रुजवली पाहिजेत, तरच उद्याची पिढी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणारी असेल. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.

आज जगातील सर्वविकसित, विकसनशील व अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणे ही निश्चित केली आहेत व त्यासाठी आवश्यक ते कायदेही करण्यात आले आहेत.

पर्यावरण संवर्धन : आपली सामाजिक जबाबदारी

पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्‌धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरविले. आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर प्रभुत्व स्थापन केले. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळ्या प्रकारची साधनसंपत्ती दिली, त्या साधनसंपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. सुखी-समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे आज पर्यावरण समतोलामध्येमानवाची भूमिका महत्त्वाची आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण, संवर्धन करण्याचे कामही तोच करू शकतो. बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्टच सर्वसामान्य लोकांना माहीत नसते व अजाणतेपणे काही कृती घडत राहतात.

पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता (Environmental conservation and Bio-diversity)

पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वांत घातक परिणाम हा सजीवांवर होत आहे. तुमच्या परिसरात याची काही उदाहरणे तुम्ही पाहिली आहेत का? आपली सजीवसृष्टी ही विविधतेने नटलेली होती. त्यात अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी अस्तित्वात होते. आज आपण पाहतो की आपल्या मागील पिढ्यांकडून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी आणि वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाहीत. याला जबाबदार कोण?

निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता ही तीन पातळ्यांवर दिसते.

आनुवंशिक विविधता : (Genetic Diversity)

एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता होय. उदा. प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे आनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो.

 प्रजातींची विविधता (Species Diversity)

 निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात यालाच प्रजातींची विविधता म्हणतात. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो.

 परिसंस्थेची विविधता (Ecosytem Diversity)

प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशादेखील दोन स्वतंत्र परिसंस्था असतात.

जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे (Hotspots of the biodiversity)

जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे. या क्षेत्रांनी एके काळी पृथ्वीचा 15.7% एवढा भाग व्यापलेला होता. आज सुमारे 86 % संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50 % आहेत.

भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1500 हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कोठे आहेत याविषयी अधिक माहिती मिळवा.

धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण

1. संकटग्रस्त प्रजाती (Endangered species)

या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते, किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो, की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ, लायन-टेल्ड वानर, तणमोर.

2. दुर्मीळ प्रजाती (Rare species)
या प्रजातींची संख्या बरीच कमी असते. या प्रजाती स्थानविशिष्ट असल्याने जलद गतीनेनामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ, रेड पांडा, कस्तुरी मृग.

3. संवेदनशील प्रजाती (Vulnerable species)
या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असतेआणि सातत्यानेघटतच राहते. सातत्यानेघटणारी जीवसंख्या हेच या प्रजातींबाबत चिंतेचेकारण आहे. उदाहरणार्थ, पट्टेरी वाघ, गीरचे सिंह.

4. अनिश्चित प्रजाती (Indeterminate species)

या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयींमुळे (उदाहरणार्थ,
बुजरेपणा) अशा प्रजातींबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ, शेकरू खार.