5. आम्ल, आम्लारी व क्षार

काही संयुगांच्या रेणूमध्येH+ हे आम्लारिधर्मी मूलक असल्याचे दिसते. ही सर्व आम्ले आहेत. काही संयुगांच्या रेणूमध्येOH चे हे आम्लधर्मी मूलक असल्याचे दिसते. ही सर्व संयुगे आम्लारी आहेत. ज्यांचे आम्लारिधर्मी मूलक H+ पेक्षा वेगळे असून आम्लधर्मी मूलक OH पेक्षा वेगळे आहे अशी आयनिक संयुगे म्हणजे क्षार (Salts) होत.

आयनिक संयुगे : एक पुनरावलोकन

आयनिक संयुगाच्या रेणूचेदोन घटक असतात व तेम्हणजेकॅटायन(धन आयन / आम्लारिधर्मी मूलक) व ॲनायन (ऋण आयन/आम्लधर्मी मूलक). या आयनांवर विरुद्ध विद्युतप्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत असतेव ह्यालाच आयनिक बंध म्हणतात. हेआपण मागील इयत्तेत पाहिलेआहे. कॅटायनवरील एक धनप्रभार व ॲनायनवरील एक ऋणप्रभार यांच्यातील आकर्षण बल म्हणजेएक आयनिक बंध होय.

स्थितिक विद्युतचा अभ्यास करताना आपण पाहिले आहे की निसर्गतः कोणत्याही वस्तूची प्रवृत्ती विद्युतप्रभारित स्थितीकडून उदासीन स्थितीकडे जाण्याची असते. असे असूनही विद्युतदृष्ट्या संतुलित म्हणजे उदासीन अशा अणूपासून प्रभारित असे आयन कशामुळे तयार होतात? अणूंच्या इलेक्ट्रॉन संरुपणावरून याचे स्पष्टीकरण मिळते. त्यासाठी सोडिअम व क्लोरिनच्या अणूंपासून Na+ व Cl हेआयन व त्यामुळेNaCl हा क्षार कसा तयार होतो ते आकृती 5.1 मध्ये दाखवलेआहे.

सोडिअम व क्लोरिन या अणूंमध्ये बाह्यतम कवच हेपूर्ण अष्टक नाही. मात्र Na+ व Cl ह्या दोन्ही आयनांमध्ये बाह्यतम कवच हेपूर्ण अष्टक आहे.

पूर्ण अष्टक असलेलेइलेक्ट्रॉन संरूपण हेस्थैर्याची स्थिती दर्शवतेआणि पुढेजाऊन Na+ व Cl ह्या विरुद्ध प्रभारित आयनांमध्ये आयनिक बंध तयार झाल्यामुळेNaCl हेअतिशय स्थैर्य असलेले आयनिक संयुग तयार होते.

आयनिक संयुगांचे विचरण

जेव्हा आयनिक संयुग पाण्यात विरघळतेतेव्हा त्याचेजलीय द्रावण तयार होते. स्थायुरूपात असलेल्या आयनिक संयुगात विरुद्धप्रभारित आयन एकमेकांना लागून असतात. जेव्हा एखादेआयनिक संयुग पाण्यात विरघळायला सुरुवात होतेतेव्हा पाण्याचेरेणूसंयुगाच्या आयनांच्या मध्ये घुसतात व त्यांनाएकमेकांपासून वेगळेकरतात, म्हणजेच जलीय द्रावण होताना आयनिक संयुगाचे विचरण होते. (पहा आकृती 5.2)

द्रावणामध्ये विलग झालेल्या प्रत्येक आयनाला सर्व बाजूंनीपाण्याच्या रेणूंनी घेरलेले असते.ही स्थितीदर्शवण्यासाठी प्रत्येक आयनाच्या संज्ञेच्या उजवीकडे (aq) (aqueous म्हणजेच जलीय) असे लिहितात.

अऱ्हेनिअसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत (Arrhenius Theory of Acids and Bases)

इ.स. 1887 मध्येस्वीडिश वैज्ञानिक अर्हेनिअस याने आम्ल व आम्लारी सिद्धांत मांडला. या सिद्धांतात आम्ल व आम्लारीच्या व्याख्या केल्या आहेत. व त्या पुढीलप्रमाणे आहेत.

आम्ल : आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात H+ (हायड्रोजन आयन) हे एकमेव कॅटायन तयार होतात. उदा. HCl, H2 SO4 , H2 CO 3 .

 

आम्लारी ः आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH- (हायड्रॉक्साइड आयन) हे एकमेव अॅनायन तयार होतात. उदा., NaOH, Ca(OH)2 .

आम्ल व आम्लारींचे वर्गीकरण (Classification of Acids and Bases)

1. तीव्र व सौम्य आम्ल, आम्लारी आणि अल्क (Strong and Weak Acids, Bases and Alkali )

आम्ल व आम्लारींच्या जलीय द्रावणांमध्येत्यांचे विचरण किती प्रमाणात होते त्यानुसार त्यांचे वर्गीकरण तीव्र व सौम्य या दोन प्रकारांत करतात.

तीव्र आम्ल (Strong Acid) : तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचेविचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात H+ व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ HCl, HBr, HNO3 ,H2 SO4 .

सौम्य आम्ल (Weak Acid) : सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचेविचरण पूर्ण होत नाही व त्याच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात H+ व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक या आयनांच्या बरोबरच विचरण न झालेले आम्लाचे रेणूमोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ, CH3 COOH, CO2

तीव्र आम्लारी (Strong Base) : तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असता त्यांचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात OH व संबंधित आम्लारींचे आम्लारीधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ  NaOH, KOH, Ca(OH)2 , Na 2 O.

सौम्य आम्लारी (Weak Base) : सौम्य आम्लारीपाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्या जलीय द्रावणात कमी प्रमाणातील OH व संबंधित आम्लारिधर्मी मूलकाबरोबरच विचरण न झालेेले आम्लारीचे रेणूमोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ NH3 .

अल्क (Alkali) : जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क म्हणतात. उदाहरणार्थ NaOH, KOH, NH3 यापैकी NaOH व KOH हे तीव्र आम्लारी आहेत तर NH3 हा सौम्य आम्लारी आहे.

2. आम्लारिधर्मता आम्लधर्मता (Basicity and Acidity)

आम्लाची आम्लारिधर्मता  : आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ आयन मिळूशकतात ती संख्या म्हणजे त्या आम्लाची आम्लारिधर्मता होय.

आम्लारींची आम्लधर्मता : आम्लारीच्या एका रेणूपासून विचरणाने जितके OH  आयन मिळूशकतात ती संख्या म्हणजे आम्लारीची आम्लधर्मता होय.

आम्ल आम्लारींची संहती (Concentration of Acid and Base)                

 जरी दोन्ही द्रावणांमध्ये द्राव्याची राशी समान असली तरी द्रावकाची राशी कमी-अधिक आहे. द्राव्याच्या राशीचे तयार झालेल्या द्रावणांच्या राशींशी प्रमाण वेगवेगळे आहे. पहिल्या चंचुपात्रामध्येहे प्रमाण जास्त आहे व त्यामुळे त्या द्रावणाची चव जास्त आंबट आहे. या उलट दुसऱ्या चंचुपात्रामध्ये लिंबूरसाचे एकूण द्रावणाशी प्रमाण कमी असल्याने चव कमी आंबट आहे.

खाद्यपदार्थाची चव त्यातील चव देणारा घटकपदार्थ कोणता व त्याचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे द्रावणाचे सर्वच गुणधर्म त्याच्यातील द्रावक व द्राव्य यांच्या स्वरूपावर तसेच द्रावणामध्ये द्राव्याचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते. द्राव्याच्या राशीचे द्रावणाच्या राशीशी प्रमाण म्हणजे द्राव्याची द्रावणातील संहतीहोय. जेव्हा द्रावणात द्राव्याची संहती जास्त असते तेव्हा ते संहत द्रावण असते तर द्राव्याची संहती कमी असते तेव्हा ते विरल द्रावण असते.

द्रावणाची संहती व्यक्त करण्यासाठी अनेक एककांचा उपयोग करतात. यांपैकी दोन एककांचा उपयोग जास्त वेळा करतात. पहिले एकक म्हणजे द्रावणाच्या एक लीटर आकारमानात विरघळलेल्या स्थितीत असलेल्या द्राव्याचे ग्रॅममधील वस्तुमान (ग्रॅम प्रति लीटर), दुसरे एकक म्हणजे द्रावणाच्या एक लीटर आकारमानात विरघळलेली द्राव्याची मोलमध्ये व्यक्त केलेली राशी. यालाच द्रावणाची रेणुता (Molarity, M) म्हणतात. एखाद्या द्राव्याची रेणूता दर्शविण्यासाठी त्याचे रेणूसूत्र चौकटी कंसात लिहितात. उदाहरणार्थ [NaCl]= 1 मोल/लीटर याचा अर्थ मिठाच्या प्रस्तुत द्रावणाची रेणूता 1M (1 मोलार) आहे असा होतो.

द्रावणाचा सामू(pH of Solution)

आपण पाहिले कीपाण्यात विरघळल्यावर आम्ल व आम्लारींचे कमी-अधिक प्रमाणात विचरण होते व अनुक्रमे H+ व OH- हे आयन तयार होतात. सर्व नैसर्गिक जलीय द्रावणांमध्येH+ व OH- हे आयन विविध प्रमाणात आढळतात व त्याप्रमाणे त्या द्रावणांचे गुणधर्म ठरतात.

उदाहरणार्थ, H+ व OH- आयनांच्या प्रमाणानुसार मृदेचे आम्लधर्मी, उदासीन व आम्लारिधर्मी असे प्रकार पडतात. रक्त, पेशीद्रव यांचे नियोजित कार्य यथायोग्य रीतीने होण्यासाठी त्यांच्यातील H+ व OH- आयनांचे प्रमाण ठरावीक असणे आवश्यक असते. सूक्ष्मजीवांच्या उपयोगाने केल्या जाणाऱ्या किण्वन किंवा इतर जैवरासायनिक प्रक्रिया तसेच विविध रासायनिक प्रकियांमध्येH+ व OH- आयनांचे प्रमाण विशिष्ट मर्यादांमध्ये राखणे आवश्यक असते. शुद्ध पाण्याचे सुद्धा अतिशय थोड्या प्रमाणात विचरण होऊन H+ व OH- हे आयन समप्रमाणात तयार होतात.

 पाण्याचा हा जो विचरण पावण्याचा गुणधर्म आहे त्यामुळे कोणत्याही पदार्थाच्या जलीय द्रावणात H+ व OH- हे दोन्ही आयन असतात. मात्र त्यांची संहती वेगवेगळी असते.

 पाण्याच्या विचरणाने तयार होणाऱ्या H+ आयनांची संहती 250 C या तापमानाला 1×10-7 मोल/लीटर इतकी असते. याच तापमानाला 1M HCl या द्रावणात H+ आयनांची संहती 1 x 100 मोल/लीटर असते, तर 1 M NaOH ह्या द्रावणात H+ आयनांची संहती 1 x 10-14 मोल/लीटर इतकी असते. यावरून लक्षात येते की सर्वसामान्य जलीय द्रावणांमध्येH+ आयनांच्या संहतीची व्याप्ती 100 – 10-14 मोल/लीटर अशी खूप मोठी असते. रासायनिक व जैवरासायनिक प्रक्रियांमध्येअतिशय उपयोगी असे H+ आयनांच्या संहतीचे एक सोईस्कर असे नवे माप डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन याने इ.स. 1909 मध्येसुरू केले. हे माप म्हणजे सामू मापनश्रेणी (pH Scale : Power of Hydrogen) होय. ही मापनश्रेणी 0 ते 14 सामूअशी असते. या मापनश्रेणीनुसार पाण्याचा सामू7 असतो म्हणजेच शुद्ध पाण्यात ‘[H+]= 1x 10-7 मोल/लीटर’ असते. सामू7 हा उदासीन द्रावण दर्शवतो. हा सामूमापनश्रेणीचा मध्यबिंदूआहे. आम्लधर्मी जलीय द्रावणाचा सामू7 पेक्षा कमी तर आम्लारिधर्मी जलीय द्रावणाचा सामू7 पेक्षा जास्त असतो.

वैश्विक दर्शक (Universal Indicators)

काही नैसर्गिक तसेच संश्र्लिष्ट रंगद्रव्येआम्लधर्मी व आम्लारिधर्मी द्रावणांमध्ये दोन भिन्न रंग दाखवतात व अशा रंगद्रव्यांचा आम्ल आम्लारी दर्शक म्हणून उपयोग करतात.सामूमापनप्रणालीमध्ये आम्ल-आम्लारींच्या तीव्रतेप्रमाणे त्यांच्या द्रावणांचा सामू0 ते 14 असा बदलतो. सामूमधील हे बदल दर्शवण्यासाठी वैश्विक दर्शक वापरतात. वेगवेगळ्या सामूला वैश्विक दर्शक वेगवेगळे रंग दाखवतो.

अनेक संश्र्लिष्ट दर्शकांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून वैश्र्विक दर्शक बनवतात. वैश्विक दर्शकाचे द्रावण किंवा त्यापासून बनवलेल्या कागदी सामूदर्शकपट्टिकेचा उपयोग करून दिलेल्या द्रावणाचा सामूठरवता येतो. सामूमोजण्याची सर्वांत अचूक पद्धत म्हणजे सामू मापक (pH meter) हे विद्युतसाधन वापरणे. या पद्धतीत द्रावणात विद्युतअग्र बुडवून सामूमोजतात.

आम्ल व आम्लारींच्या अिभक्रिया 

1. उदासिनीकरण (Neutralization)

उदासिनीकरण अभिक्रिया : HCl च्या द्रावणामध्येNaOH चे द्रावण थेंबाथेंबाने मिसळल्यावर सामूवाढत का जातो? या मागचे कारण विचरणाच्या क्रियेमध्येआहे. HCl व NaOH या दोन्हींचे त्यांच्या जलीय द्रावणात विचरण होते. HCl च्या द्रावणात NaOH चे द्रावण मिसळणे म्हणजे मोठ्या संहतीतील H+ आयन मोठ्या संहतीतील OH आयनांमध्ये मिसळल्यासारखे आहे. परंतुपाण्याचे H+ आणि OH- आयनांमध्ये विचरण फार कमी प्रमाणात होते. त्यामुळे मिसळलेले जास्तीचे OH आयन जास्तीच्या H+आयनांबरोबर संयोग पावून पाण्याचे रेणूतयार होतात व ते द्रावक पाण्यामध्ये मिसळून जातात. हे बदल खालील आयनिक समीकरणाने दर्शवतात.

2. धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया

धातूबरोबर होणारी आम्लांची अभिक्रिया ही आम्लाची तीव्रता संहती तसेच तापमान व धातूची अिभक्रियाशीलता यानुसार ठरते. तीव्र आम्लाच्या विरल द्रावणाच्या अभिक्रिया मध्यम अिभक्रियाशील धातूंबरोबर सामान्य तापमानाला करणे सोपे आहे.

मॅग्नेशिअम धातूबरोबर तीव्र आम्लाच्या विरल द्रावणाची अभिक्रिया : वरील कृतीवरून लक्षात येते की मॅग्नेशिअम धातूची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबराेबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन हा ज्वलनशील वायूतयार होतो. हे होताना आम्लातील हायड्रोजनला मॅग्नेशिअम हा अभिक्रियाशील धातू विस्थापित करतो व हायड्रोजन वायूमुक्त होतो. त्याचवेळी धातूचे रूपांतर आम्लारिधर्मी मूलकामध्येहोऊन आम्लातील आम्लधर्मी मूलकाशी ते संयोग पावते व क्षार तयार होतो.

3. धातूंच्या ऑक्साइडबरोबर आम्लांची अभिक्रिया

रेड ऑक्साइडचे रासायनिक सूत्र Fe 2 O 3 आहे. पाण्यात अविद्राव्य असलेले रेड ऑक्साइड HCl बरोबर अभिक्रिया पावते व पाण्यात विद्राव्य असा FeCl 3 हा क्षार तयार झाल्याने पाण्याला पिवळसर रंग येतो. या रासायनिक बदलासाठी खालील रासायनिक समीकरण लिहिता येेते.

4. अधातूंच्या ऑक्साइडबरोबर आम्लारींची अभिक्रिया

अधातूंच्या ऑक्साइडबरोबर आम्लारींची अभिक्रिया होऊन क्षार व पाणी ही संयुगे तयार होतात.त्यामुळे अधातूंची ऑक्साइड आम्लधर्मी आहेत असे म्हणतात. कधीकधी अधातूंची ऑक्साइड ही आम्लांचीच उदाहरणे आहेत असेही म्हणतात.

झिंक ऑक्साइडची सोडिअम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रियाहोऊन सोडिअम झिंकेट(Na2 ZnO 2 ) व पाणी तयार होते. तसेच ॲल्युमिनिअम ऑक्साइडची सोडिअम हायड्राॅक्साइड बरोबर अभिक्रिया होऊन सोडिअम ॲल्युमिनेट (NaAlO2 ) व पाणी तयार होते.

5. धातूंच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लांची अभिक्रिया

फसफसण्याच्या स्वरूपात निर्माण होणारा वायूचुन्याच्या निवळीच्या संपर्कात येतो तेव्हा ती दुधाळ झालेली दिसते. ही कार्बनडायऑक्साइड ह्या वायूची रासायनिक परीक्षा आहे. म्हणजे, चुन्याची निवळी दुधाळ होते यावरून आपल्याला समजते की फसफसून आलेला वायूहा कार्बन डायऑक्साइड वायूआहे. धातूंच्या कार्बोनेट आणि बायकार्बोनेट क्षारांवरील आम्लांच्या अभिक्रियेने हा वायूतयार होतो व चुन्याच्या निवळी Ca(OH)2 बरोबर त्याची अभिक्रिया होऊन CaCO 3 चा साका तयार होतो. यामुळे हा वायूCO 2 असल्याचे समजते.

क्षार (Salts)

आम्ल व आम्लारी यांच्यातील अभिक्रियेने क्षार तयारहोतात हे आपण पाहिले. ह्या अभिक्रियेला जरीउदासिनीकरण अभिक्रिया असे म्हटले जाते, तरी निष्पन्न होणारे क्षार नेहमीच उदासीन नसतात. तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी ह्यांच्या उदासिनीकरणाने उदासीन क्षार तयारहोतो. ह्या क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू7 असतो. तीव्र आम्ल व सौम्य आम्लारी ह्यांच्या उदासिनीकरणाने आम्लधर्मी क्षार तयार होतो. आम्लधर्मी क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू7 पेक्षा कमी असतो. याउलट सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी ह्यांच्या उदासिनीकरणाने आम्लारिधर्मी क्षार तयार होतो. अशा क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू7 पेक्षा जास्त असतो.

स्फटिकजल (Water of Crystallization)

आयनिक संयुगे स्फटिकस्वरूप असतात. त्यांची स्फटिकी संरचना आयनांच्या विशिष्ट अशा मांडणीतून तयार झालेली असते. काही संयुगांच्या स्फटिकांमध्येपाण्यांच्या रेणूंचा सुद्धा समावेश ह्या मांडणीमध्येझालेला असतो. हेच स्फटिकजल होय.

आयनिक संयुगे व विद्युतवाहकता

जेव्हा विजेच्या दिव्यामधून विद्युत प्रवाह जातो तेव्हाच दिवा लागतो आणि जेव्हा विद्युत परिपथ पूर्ण होतो तेव्हाच हे घडूशकते. वरील कृतीत NaCl, CuSO4 , H2 SO4 व NaOH यांची जलीय द्रावणे वापरली असता विद्युत परिपथ पूर्ण होतो असे दिसते. याचा अर्थ असा की, ही द्रावणे विद्युत वाहक आहेत.

विजेच्या तारेमधून वीज वाहूननेण्याचे काम इलेक्ट्रॉन करतात आणि द्रावण किंवा द्रव यांमधून वीज वाहूननेण्याचे काम आयन करतात. बॅटरीच्या ऋण टोकाकडून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात व विदयुत परिपथ पूर्ण करून ते बॅटरीच्या धन टोकातून बॅटरीत जातात. परिपथामध्येजेव्हा द्रव/द्रावण असते तेव्हा त्यात दोन कांड्या/तारा/पट्टया बुडवतात. त्यांना विद्युतअग्र (Electrode) म्हणतात. विद्युतअग्र सामान्यत: विदयुत वाहक स्थायूचे बनवतात. बॅटरीच्या ऋण टोकाला वाहक तारेने जोडलेले विद्युतअग्र म्हणजे ऋणाग्र (Cathode) व बॅटरीच्या धन टोकाला जोडलेले विद्युतअग्र म्हणजे धनाग्र (Anode) होय.

आयनांचे विचरण आणि विद्युतवाहकता (Dissociation of Ions and Electrical Conductivity)

वरीलकृतीमध्येआढळले कीNaCl, CuSO 4 ,H 2 SO 4 व NaOH हया संयुगांची जलीय द्रावणे विदयुतवाहक आहेत. यापैकी NaCl व CuSO 4 हे क्षार आहेत, H 2 SO 4 हे तीव्र आम्ल व NaOH हे तीव्र आम्लारी आहेत. आपण पाहिले की क्षार, तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी ह्यांचे जलीय द्रावणात जवळजवळ पूर्णपणे विचरण होते. त्यामुळे या तिन्हींच्याही जलीय द्रावणात मोठया प्रमाणावर धन आयन व ऋण आयन असतात.

द्रव अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे कणांना असलेली गतिमानता (Mobility). हया गतिमानतेमुळे द्रावणातील धन आयन हे ऋणाग्राकडे आकर्षले जातात व ऋणाग्राच्या दिशेने प्रवास करतात. याउलट द्रावणातील ऋण आयन धनाग्राच्या दिशेने प्रवास करतात. द्रावणातील आयनांचा संबंधित विदयुतअग्राच्या दिशेने प्रवास म्हणजेच द्रावणातून विद्युतवहन होय. यावरून तुमच्या लक्षात येते की, द्रव/द्रावणामध्ये आयनांचे मोठ्या प्रमाणात विचरण झाल्याने त्यांना विद्युतवाहकता प्राप्त होते.

विदयुत अपघटन (Electrolysis)

द्रावणातील Cu2+ आयन हया प्रकारे वापरले जाऊनही द्रावणाचा रंग होता तसाच राहिला. कारण वीजप्रवाह चालू असताना धनाग्रातील तांब्याच्या अणूंपासून इलेक्ट्रॉन काढून ते विजेच्या तारेतून पाठवले गेले. त्यामुळे तयार झालेले C Cu2+  आयन द्रावणात उतरले. अशा प्रकारे वाहणाऱ्या वीजप्रवाहामुळे द्रावणातील द्राव्याचे अपघटन होते. त्यालाच विद्युत अपघटन (Electrolysis) म्हणतात. विदयुत अपघटनामध्येदोन क्रिया असतात, ते म्हणजे ऋणाग्र अभिक्रिया व धनाग्र अभिक्रिया होय .

शुद्ध पाण्यात विद्युत अग्रे बुडवून खटका चालूकेला तरी वीजप्रवाह वाहत नाही. म्हणजेच शुद्ध पाणी हे विजेचे दुर्वाहक असल्याचे कळते. हयाचेकारण आपण आधीच पाहिलेआहे. पाण्याचे विचरण खूपच कमी प्रमणाात होते. विचरणानेतयार होणाऱ्या H+ व OH- आयनांची संहती प्रत्येकी 1×10-7 mol/L इतकी असते. मात्र पाण्यात थोड्या प्रमाणात क्षार किंवा तीव्र आम्ल/आम्लारी मिसळलेअसता त्यांच्या विचरणानेपाण्याची विद्युतवाहकता वाढतेव त्यामुळेपाण्याचे विदयुत अपघटन होते.

पाण्याचे विद्युत अपघटन (Electrolysis of water)

ऋणाग्रापाशी तयार होणाऱ्या वायूचे आकारमान धनाग्रापाशी तयार होणाऱ्या वायूच्या दुप्पट आहे. वैज्ञानिकांनी हे दाखवून दिले आहे की ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायूतयार होतो तर धनाग्रापाशी ऑक्सिजन वायूतयार होतो. यावरून स्पष्ट होते की पाण्याचे विद्युत अपघटन होऊन त्याच्यातील घटक मूलद्रव्येमुक्त होतात. संबंधित विद्युतअग्र अभिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.