6. वनस्पतींचे वर्गीकरण

सृष्टी : वनस्पती (Kingdom Plantae)

पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला ‘वनस्पती’ म्हणून ओळखले जाते. वनस्पती हरितद्रव्यांच्या साहाय्याने प्रकाशसंश्लेषण करीत असल्याने स्वयंपोषी झालेल्या आहेत. वनस्पतीसृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सर्व सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहेत.

वर्गीकरणाचा आधार

वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत कीनाहीत, हे विचारात घेतले जाते. त्यानंतर, पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊतीसंस्थांचे असणे किंवा नसणे विचारात घेतले जाते. वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का? आणि असल्यास बियांवर फळांचे आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो व शेवटी बियांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले जातात.

वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी आणि बिजांमध्येअसणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एकबीजपत्री व द्विबिजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात.

उपसृष्टी-अबीजपत्री वनस्पती (Cryptogams)

विभागI –थॅलोफायटा (Thallophyta)

या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. मूळ-खोड-पाने-फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या, हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला शैवाल (Algae) म्हणतात. शैवालामध्येखूप विविधता आढळते. एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाले आढळतात. उदा. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स,उल्वा, सरगॅसम, इत्यादी. यातील काही वनस्पती गोड्या तर काही खारट पाण्यात आढळतात. या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतूरूपी असते. ह्याच गटात हरीतद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व व बुरशांचा स्वतंत्रपणे समावेश होतो, त्यास कवके (Fungi) असे म्हणतात.

विभाग II- ब्रायोफायटा (Bryophyta)

ह्या गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे ‘उभयचर’ म्हटले जाते कारण त्या ओलसर मातीत वाढतात. परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिनीसारखी लांब असते. या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. उदा. मॉस (फ्युनारिआ), मर्केंशिया, अॅन्थॉसिरॉस, रिक्सिया, इत्यादी.

विभाग III- टेरिडोफायटा (Pteridophyta)

या गटातील वनस्पतींना मुळे, खोड,पाने असे सुस्पष्ट अवयव असतात, पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात. पण यांना फुले-फळे येत नाहीत. त्यांच्या पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजननहोते.उदा., फर्न्स – नेफ्रोलेपीस (नेचे), मार्सेलिया, टेरीस, एडीअँटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम, इत्यादी.

या वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजननहे युग्मक निर्मितीद्वारे होते. या वनस्पतींमध्येसुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते.

या सर्वांचे प्रजनन बीजाणूंद्वारे होते. त्यांच्या शरीरातील प्रजननसंस्था अप्रकट असल्याने त्यांना अबीजपत्री
(Cryptogams : लपलेली प्रजननांगे असणाऱ्या वनस्पती) म्हणतात.

उपसृष्टी-बीजपत्री (Phanerogams)

ज्या वनस्पतींमध्येप्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात, त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात. यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यांमध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया रुजतांना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापरहोतो. बिया फळांमध्येझाकलेल्या नसणे किंवा असणे ह्या वैशिष्ट्यांवरून बीजपत वनस्पतींचे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे विभाग केले आहेत

विभाग I- अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms)

अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. या वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात. पानांचा मुकुट तयार झालेला असतो. या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. यांच्या बियांवरनैसर्गिक आच्छादननसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत, म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. Gymnosperms म्हणजे Gymnos – न झाकलेले/अनावृत्त, Sperm- बीज.

उदा. सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (माेरपंखी), पायनस (देवदार) इत्यादी.

विभाग II- अनावृत्तबीजी वनस्पती (Angiosperms)

या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात. या बियांवर आवरण असते. Angios – Cover म्हणजे आवरण, sperm – बी.

ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांनाद्‌विबीजपत्री वनस्पती म्हणतात तरज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.