7. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची

उपयोजित सूक्ष्‍मजीवशास्‍त्र (Applied microbiology)

काही आदिकेंद्रकी व दृश्‍यकेंद्रकी सूक्ष्‍मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने,उपयोजित अनुवंशशास्‍त्र, रेण्‍वीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्‍यास ज्‍या शाखेत केला जातो, त्‍या शाखेला उपयोजित सूक्ष्‍मजीवशास्‍त्र म्‍हणतात.
ह्या अभ्‍यासाचा वापर समाजासाठी केला जातो व सूक्ष्‍मजीवांच्‍या मदतीनेअन्‍न, औषधेयांसारखी उत्‍पादनेमोठ्या प्रमाणावर घेतली जातात.

औद्योगिक सूक्ष्‍मजीवशास्‍त्र (Industrial microbiology)

सूक्ष्‍मजीवांच्‍या व्‍यावसायिक वापराशी संबंधित शास्‍त्र असून यांमध्‍ये आर्थिक, सामाजिक व पर्यावरणदृष्‍ट्या महत्‍त्‍वाच्‍या प्रक्रिया व उत्‍पादनेयांचा समावेश आहे. यासाठी उपयुक्‍त ठरणाऱ्या सूक्ष्‍मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्‍या जातात.

औद्योगिक सूक्ष्‍मजीवशास्‍त्राचे प्रमुख पैलू

अ. किण्‍वन प्रक्रिया वापरून विविध उत्‍पादनेघेणे. उदा. पाव, चीज, वाईन, रसायनांसाठी लागणारा कच्‍चा माल, विकरे, अन्‍नघटक, औषधेइत्‍यादी.

ब. कचरा व्‍यवस्‍थापन व प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्‍मजीवांचा वापर

उत्‍पादने (Products)
अ. दुग्‍धजन्‍य उत्‍पादने (Dairy Products)

पुरातन काळापासून दूध टिकविण्‍यासाठी त्‍याचे विविध पदार्थांत रूपांतर केलेजात असे. जसे, चीज, लोणी, क्रीम, केफिर (शेळीच्‍या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ), योगर्ट (विरजण वापरून केलेलेदही) इत्‍यादी. हे पदार्थ बनताना दुधातील पाण्‍याचेप्रमाण, आम्‍लता यांत बदल होतात व पोत, स्‍वाद, सुगंध यांत वाढ होते.

आता ह्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर व अधिक कुशलतेनेघडवून आणल्‍या जातात. बहुतांश दुग्‍धजन्‍य उत्‍पादनांसाठी दुधात असलेल्‍या जीवाणूंचाच वापर केला जातो, फक्‍त चीज उत्‍पादनात तंतुकवकेवापरली जातात. योगर्ट, लोणी, क्रीम वगैरेंसाठी मूलभूत प्रक्रिया समान आहे. सर्वप्रथम दुधाचेपाश्‍चरीकरण करून त्‍यातील इतर सूक्ष्‍मजीव नष्‍ट केलेजातात. नंतर लॅक्‍टोबॅसिलाय जीवाणूंच्‍या साहाय्यानेदुधाचे किण्‍वन केलेजाते. या प्रक्रियेत दुधातील लॅक्‍टोज शर्करेचेरूपांतर लॅक्टिक आम्‍लात होतेव लॅक्टिक आम्‍लामुळेदुधातील प्रथिनांचे क्‍लथन (coagulation) होऊन, त्‍याचबरोबर स्‍वाद व सुगंध असलेली संयुगेबनतात. उदा. डाय अॅसेटिलला लोण्‍याचा स्‍वाद असतो.

आ. योगर्ट उत्‍पादन

लॅक्टोबेसिलाय जीवाणूंच्या मदतीने (विरजण वापरून) तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हणतात. त्‍यांचे औद्योगिक उत्‍पादन करतांना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते. दूध तापवून कोमट करून त्‍यात स्‍ट्रेप्‍टोकॉकस थर्माफिलीस व लॅक्‍टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंचे 1:1 प्रमाणातील मिश्रण मिसळले जाते. स्‍ट्रेप्‍टोकॉकसमुळे लॅक्टिक आम्‍ल तयार होऊन प्रथिनांचे जेल (gel) बनते व दह्याला घट्टपणा येतो.

लॅक्‍टोबॅसिलसमुळे अॅसेटालडीहाईड सारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्‍ट स्‍वाद मिळतो. योगर्टमध्‍ये आताशा फळांचे रस इत्‍यादी मिसळून विविध स्‍वाद निर्माण केले जातात. उदा. स्‍ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट. योगर्टचे पाश्‍चरीकरण करून ते जास्‍त टिकवता येते व त्‍यातील प्रोबायोटीक गुणधर्म वाढतात.

इ. लोणी (Butter)

याचे स्‍वीट क्रीम व कल्‍चर्ड असे दोन प्रकार मोठ्या प्रमाणावर मिळवले जातात. त्‍यांपैकी कल्‍चर्ड प्रकाराच्‍या उत्‍पादनांत सूक्ष्‍मजीवांचा सहभाग असतो.

ई. चीज निर्मिती (Cheese production)

जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध असलेल्या गाईच्‍या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते. सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व सूक्ष्‍मजैविक परीक्षण होते. दुधात लॅक्‍टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्‍टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्‍ट्रेप्‍टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्‍मजीव व रंग मिसळले जातात. यामुळे दुधाला आंबटपणा येतो. यानंतर दह्यातील पाणी (whey) काढून टाकण्‍यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्‍यक असते.

ह्यासाठी जनावरांच्‍या अन्‍नमार्गातून मिळविलेला रेनेट विकर पूर्वीपासून वापरात येत असे, पण हल्‍ली कवकांपासून मिळविलेला प्रोटीएज (Protease) हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते. दह्यातून पाणी (whey) वेगळे काढले जाते (ज्‍याचे इतर काही उपयोग आहेत). घट्ट दह्याचे तुकडे कापणे, धुणे, रगडणे इत्‍यादीनंतर मीठ घालणे व त्‍यात आवश्‍यक ते सूक्ष्‍मजीव, रंग, स्‍वाद मिसळून चीज तयार होण्‍याच्‍या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. नंतर दाबून चीजचे तुकडे केले जातात व ते परिपक्‍वतेसाठी साठवून ठेवले जातात.

प्रोबायोटिक्‍स (Probiotics)

हे पदार्थही दुग्‍धजन्‍यच आहेत, पण त्‍यांमध्‍ये क्रियाशील जीवाणू असतात. उदाहरणार्थ, लॅक्‍टोबॅसिलस अॅसिडोफिलस, लॅक्‍टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्‍टेरिअम बायफिडम इत्‍यादी. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्‍मजीवांचा समतोल राखतात म्‍हणजे पचनप्रक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्‍मजीवांची वाढ करतात तर उपद्रवी सूक्ष्‍मजीवांना (उदा. क्‍लॉस्ट्रिडीअम) नष्‍ट करतात. प्रोबायोटिक्‍स उत्‍पादने योगर्ट, केफिर, सोअर क्रुट (कोबीचे लोणचे), डार्क चॉकोलेट, मिसो सूप, लोणची, तेले, कॉर्नसिरप, कृत्रिम स्‍वीटनर्स (गोडी आणणारे पदार्थ), सूक्ष्‍मशैवाले (स्पिरूलिना, क्‍लोरेल्‍ला व नीलहरित शैवालांचा समावेश असलेले समुद्री खाद्य) अशा विविध रूपांत उपलब्‍ध आहेत.

अलीकडच्‍या काळात प्रोबायोटिक्‍सना एवढे महत्‍त्‍व का प्राप्‍त झाले आहे? याचे कारण म्‍हणजे ही उत्‍पादने आपल्‍या अन्‍नमार्गात उपयुक्‍त सूक्ष्‍मजीवांच्‍या वसाहती करून इतर सूक्ष्‍मजीव व त्‍यांच्‍या चयापचय क्रियांवर नियंत्रण ठेवतात, प्रतिक्षमता वाढवतात, चयापचय क्रियेत निर्माण झालेल्‍या घातक पदार्थांचे दुष्‍परिणाम कमी करतात. प्रतिजैविकांमुळे अन्‍नमार्गातील उपयुक्‍त सूक्ष्‍मजीवही अकार्यक्षम होतात, त्‍यांना पुन्‍हा सक्रिय करण्‍याचे काम प्रोबायोटीक्‍स करतात. अतिसाराच्‍या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारांसाठी हल्‍ली प्रोबायोटीक्‍सचा वापर होतो.

पाव (Bread)

धान्‍यांच्‍या पिठांपासून पावांचे विविध प्रकार बनवले जातात. पिठामध्‍ये बेकर्सयीस्‍ट – सॅकरोमायसिस सेरेव्हिसी (Saccharomyces cerevisiae), पाणी, मीठ व इतर आवश्‍यक पदार्थमिसळून त्‍याचा गोळा केला जातो.

यीस्‍टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्‍वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बनडायॉक्‍साईड (CO2 ) व इथॅनॉलमध्‍ये होते. CO2 मुळे पीठ फुगते व भाजल्‍यानंतर पाव जाळीदार होतो. 7.2 प्रोबायोटिक्‍स 7.3 व्हिनेगर व्‍यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित (Compressed) यीस्‍टचा वापर होतो. तर घरगुती वापरासाठी ते कोरड्या, दाणेदार स्‍वरूपात उपलब्‍ध असते. व्‍यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्‍या यीस्‍टमध्‍ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्‍त्‍वे व खनिजे असे उपयुक्‍त घटक असतात. त्‍यामुळे यीस्‍ट वापरून बनविलेली पाव व इतर उत्‍पादने पौष्टिक ठरतात. हल्‍ली लोकप्रिय झालेल्‍या चायनीज खाद्यपदार्थांत वापरले जाणारे व्हिनेगर, सोयासॉस व मोनोसोडिअम ग्‍लुटामेट (अजिनोमोटो) हे तीन घटक सूक्ष्‍मजैविक किण्‍वनाने मिळवतात.

व्हिनेगर (Vinegar)

उत्‍पादन जगातील अनेक प्रदेशांमध्‍ये खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्‍यासाठी तसेच लोणची, सॉस, केचप, चटण्‍या हे पदार्थटिकवण्‍यासाठी व्हिनेगरचा वापर होतो. रासायनिक दृष्‍ट्या व्हिनेगर म्‍हणजे 4% अॅसेटिक आम्‍ल (CH3 COOH). फळांचे रस, मेपल सिरप, साखर कारखान्‍यातील ऊसाची मळी, मुळांतील स्‍टार्च अशा कार्बनी पदार्थांचे सॅकरोमायसिस सेरेव्हिसी ह्या कवकाच्‍या साहाय्याने किण्‍वन करून इथॅनॉल हे अल्‍कोहोल मिळवले जाते.

इथॅनॉलमध्‍ये अॅसिटोबॅक्‍टर प्रजाती व ग्‍लुकॉनोबॅक्‍टर ह्या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्‍याचे सूक्ष्‍मजैविक अपघटन केले जाते. यामुळे अॅसेटिक आम्‍ल व इतर उपउत्‍पादने मिळतात. मिश्रणाचे विरलन करून त्‍यातून अॅसेटिक आम्‍ल वेगळे केले जाते. पोटॅशिअम फेरोसायनाईड वापरून अॅसेटिक आम्‍लाचे विरंजन करतात. त्‍यानंतर पाश्‍चरीकरण होते. शेवटी अत्‍यल्‍प प्रमाणात SO 2 वायू मिसळून व्हिनेगर तयार होते.

गहू किंवा तांदळाचे पीठ व सोयाबीन यांच्‍या मिश्रणाचे अॅस्‍परजिलस ओरायझी (Aspergillus oryzae) या कवकाच्‍या साहा य्याने किण्‍वन करून सोया सॉस बनवतात

पेयनिर्मिती (Production of beverages)

सूक्ष्‍मजैविक विकरे (Microbial Enzymes) :

 रसायन उद्योगांत आता रासायनिक उत्‍प्रेरकांऐवजी सूक्ष्‍मजीवांच्‍या साहाय्याने मिळवलेली विकरे वापरली जातात. तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकरे कार्य करतात, त्‍यामुळे ऊर्जा बचत होते व महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. विकरे विशिष्‍ट क्रियाच घडवून आणतात, अनावश्‍यक उपउत्‍पादिते बनत नाहीत व शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो.

सूक्ष्‍मजैविक विकरांच्‍या अभिक्रियांमध्‍ये टाकाऊ पदार्थांचे उत्‍सर्जन, त्‍यांचे विघटन टाळले जाते, तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो. म्‍हणून अशी विकरे पर्यावरणस्‍नेही ठरतात. ऑक्सिडोरिडक्‍टेजीस (Oxidoreductases), ट्रान्‍स्‍फरेजीस (Transferases), हायड्रोलेजीस (Hydrolases), लाएजेस (Lyases), आयसोमरेजीस (Isomerases), लायगेजीस (Ligases) ही सूक्ष्‍मजैविक विकरांची काही उदाहरणे आहेत.

 डिटर्जंट्समध्‍येविकरे मिसळल्‍याने मळ काढण्‍याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते. मक्‍यातील स्‍टार्चवर बॅसिलस व स्‍ट्रेप्‍टोमायसिस पासून मिळवलेल्‍या विकराची क्रिया घडवून ग्‍लुकोज व फ्रुक्‍टोज सिरप (तयार सरबताचे माध्‍यम) बनवतात. चीज, वनस्‍पतींचे अर्क, वस्‍त्रोद्योग, चामडे, कागद, अशा अनेक उद्योगांत सूक्ष्‍मजैविक विकरे वापरली जातात.

 

तुमच्‍या आवडीच्‍या आइस्‍क्रीम, पुडिंग, चॉकलेट्स, मिल्‍कशेक, चॉकलेट पेये, इन्‍स्‍टंट सूप्स यांना दाटपणा आणणारा झॅन्‍थॅन डिंक हा काय असतो? स्‍टार्च व मळीचेझॅन्‍थोमोनास प्रजातींकडून किण्‍वन घडवून हा डिंक बनवतात. गरम व थंड पाण्‍यात विरघळणे, उच्‍च घनता या वैशिष्‍ट्यांमुळेत्‍याचेअनेक उपयोग आहेत. रंग, खत, तणनाशके, वस्‍त्रांचे रंग, टूथपेस्‍ट, उच्‍च प्रतीचा कागद बनविण्‍यासाठी त्‍याचा वापर होतो.

प्रति‍जैविके (Antibiotics)

विविध प्रकारच्‍या जीवाणू व कवकांपासून मिळवलेल्‍या प्रतिजैविकांमुळे मानव व इतर प्राण्‍यांचे अनेक रोग आटोक्‍यात आले आहेत. पेनिसिलिन, सिफॅलोस्‍पोरिन्‍स, मोनोबॅक्‍टम्‍स, बॅसिट्रॅसिन, एरिथ्रोमायसिन, जेन्‍टामायसिन, निओमायसिन, स्‍ट्रेप्‍टोमायसिन, ट्रेट्रासायक्लिन्‍स, व्‍हॅन्‍कोमायसिन, इत्‍यादी प्रतिजैविके विविध प्रजातींच्‍या ग्रॅम पॉझीटीव्‍ह व ग्रॅम निगेटीव्‍ह जीवाणूंविरुध्‍द वापरली जातात. क्षयरोगाविरुध्‍द रिफामायसिन प्रभावी ठरते.

सूक्ष्‍मजीव व इंधने

1. मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकी, औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्‍मजैविक विनॉक्‍सी-अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते.

2. सॅकरोमायसिस किण्‍व जेव्‍हा ऊसाच्‍या मळीचे किण्‍वन करते तेव्‍हा मिळणारे इथॅनॉल हे अल्‍कोहोल एक स्‍वच्‍छ (धूररहित इंधन) आहे.

3. ‘हायड्रोजन वायू’ हे भविष्‍यातील इंधन मानले जाते. पाण्‍याचे जैविक प्रकाशअपघटन (Bio-photolysis of water) ह्या प्रक्रियेत जीवाणू प्रकाशीय क्षपण (Photo reduction) करतात व हायड्रोजन वायू मुक्‍त होतो.

इंधनाप्रमाणेच विविध औद्योगिक रसायने सूक्ष्‍मजैविक प्रक्रियांनी बनविली जातात. उदाहरणार्थ रसायन उद्योगांत कच्‍चा माल म्‍हणून उपयुक्‍त ठरणारी विविध अल्‍कोहोल्‍स, अॅसिटोन, कार्बनी आम्‍ले, मेदघटक, पॉलीसॅकराईड्स. प्‍लॅस्टिक व खाद्यपदार्थ उत्‍पादनांचा कच्‍चा माल म्‍हणून यांपैकी काही उपयोगी आहेत.

जैव इंधन :

नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतांमध्ये जैवइंधन हे महत्त्वाचे साधन आहे. ही इंधने घनरूप (दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष), द्रवरूप (वनस्पती तेले, अल्कोहोल), वायुरूप (गोबरगॅस, कोलगॅस) अशा स्वरूपात उपलब्ध होतात. ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात. भविष्यकाळात भरवशाची अशी ही इंधने आहेत.

सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण (Microbial pollution control)

वाढत्‍या लोकसंख्‍येबरोबर घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषके हेघटकही वाढत जातात. त्‍यांच्‍याबरोबर पसरणारी रोगराई व होणारा पर्यावरणाचा ऱ्हास ह्या जागतिक समस्‍या आहेत. विशेषतः लोकसंख्‍येची उच्‍च घनता असणाऱ्या भारतासारख्‍या देशाची शहरे ह्या समस्‍यांनी ग्रस्‍त आहेत. समस्‍यांचेयोग्‍य वेळी व योग्‍य प्रमाणात निराकरण न झाल्‍यास सर्व सजीवांच्‍या पुढच्‍या पिढ्यांचेजीवन अवघड ठरेल. सूक्ष्‍मजीवांची पर्यावरणीय भूमिका आता पाहूया. बायोगॅस संयत्र, कम्‍पोस्‍ट निर्मिती यांद्वारेघनकचऱ्याची विल्‍हेवाट लावतांना सूक्ष्‍मजीवांची मदत घेतली जाते, हेतर तुम्‍हांला माहीतच आहे. मग मोठ्या प्रमाणावर, काही टनांमध्‍ये दररोज जमा होणाऱ्या नागरी कचऱ्याची योग्‍य पद्धतीने विल्‍हेवाट कशी लावत असतील ?

भूमीभरण स्‍थळे (Landfilling)

शहरांत जमा होणारा विघटनशील कचरा या पद्धतीसाठी वापरला जातो. नागरी वस्‍तीपासून लांब, मोकळ्या जागेत खड्डे करून त्‍यांत प्‍लॅस्टिकचेअस्‍तर घातलेजाते. कचऱ्यातील अशुद्ध कि ंवा विषारी द्रव झिरपून मातीचेप्रदूषण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते.

दाबून गोळा केलेला कचरा (Compressed Waste) तयार केलेल्‍या खड्ड्यात टाकला जातो, त्‍यावर माती / लाकडाचा भुसा / हिरवा कचरा (पालापाचोळा इ.) / विशिष्‍ट जैवरसायनेयांचा थर पसरतात. काही ठिकाणी त्‍यात बायोरिअॅक्‍टर्स मिसळलेजातात. कचरा व माती (किंवा थरासाठी वापरलेले विशेष पदार्थ) यांतील सूक्ष्‍मजीव कचऱ्याचे विघटन करतात. खड्डा पूर्ण भरल्‍यानंतर माती लिंपून बंद केला जातो, काही आठवड्यांनी त्‍या ठिकाणी उत्‍कृष्‍ट खत मिळते. खत काढल्‍यानंतर रिकामे झालेलेभूमीभरण स्‍थळ पुन्‍हा वापरता येते.

सांडपाणी व्‍यवस्‍थापन (Sewage Management)

गावांमध्‍ये प्रत्‍येक घरातील सांडपाणी लगतच्‍या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रात सोडलेजाते. पण मोठ्या शहरांत जमा होणारेसांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्‍यावर सूक्ष्‍मजैविक प्रक्रिया कराव्‍या लागतात.

सांडपाण्‍यातील कोणत्‍याही संयुगांचे विघटन करणारे, त्‍याचप्रमाणेकॉलरा, हगवण, टायफॉईडच्‍या जीवाणूंना नष्‍ट करणारेसूक्ष्‍मजीव त्‍यात मिसळलेजातात. तेसांडपाण्‍यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून मिथेन, CO 2 मुक्‍त करतात. फिनॉल ऑक्सिडायझींग जीवाणू हेसांडपाण्‍यातील मानवनिर्मित (Xenobiotic) रसायनांचे विघटन करतात.

या प्रक्रियेत तळाला जाणारा गाळ (Sludge) हा खत म्‍हणून पुन्‍हा वापरता येतो. अशा सूक्ष्‍मजैविक प्रक्रिया झाल्‍यानंतर बाहेर पडणारे पाणी हे पर्यावरणदृष्‍ट्या निर्धोक असते. सांडपाण्‍याने प्रदूषित झालेल्‍या पर्यावरणाचे जैव उपचार करण्‍यासाठी सूक्ष्‍मजीवांचा वापर होतो.

स्‍वच्‍छ तंत्रज्ञान (Clean Technology) :

मानवाने तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती केली आहे. पण त्‍याचबरोबर पर्यावरणाच्‍या प्रदूषणाचे प्रमाणही त्‍याच वेगाने वाढते आहे. सूक्ष्‍मजीवांचा वापर करून वायू, भू व जल प्रदूषण यांवर नियंत्रण कसे ठेवतात ते पाहूया.

मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्‍याची क्षमता सूक्ष्‍मजीवांत नैसर्गिकरित्‍याच आढळते. या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्‍स व इतर रसायनांचे रूपांतरण केले जाते.

  1. काही सूक्ष्‍मजीव इंधनांमधून गंधक काढून टाकतात.
  2. हलक्‍या प्रतीच्‍या धातुकांमधून तांबे, लोह, युरेनिअम व जस्‍त असे धातू पर्यावरणात झिरपतात. थायोबॅसिलस व सल्‍फोलोबस जीवाणूंच्‍या साहाय्याने या धातूंचे झिरपण्‍यापूर्वीच संयुगांत रूपांतर केले जाते..

समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलिअम तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी घातक, विषारी ठरू शकते. पाण्‍यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही. पण अल्‍कॅनिव्‍होरॅक्‍स बॉरक्‍युमेन्सिस व स्‍युडोमोनास जीवाणूंमध्‍येपिरिडिन्‍स व इतर रसायने नष्‍ट करण्‍याची क्षमता आहे. त्‍यामुळे तेलाचे तवंग नष्‍ट करायला या जीवाणूंच्‍या समूहाचा वापर केला जातो. त्‍यांना हायड्रोकार्बनोक्‍लास्टिक बॅक्‍टेरिआ (HCB) म्‍हणतात. HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्‍यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत CO 2 व पाणी तयार होते.

प्‍लॅस्टिकच्‍या बाटल्‍या PET (Polyethelene terephthalate Polyster) या रासायनिक पदार्थापासून बनलेल्‍या असतात. अलीकडच्‍या काळात नागरी कचऱ्याचा फार मोठा भाग ह्या प्‍लॅस्टिकने व्‍यापलेला आहे. आयडोनेला साकीएन्सिस, व्हिब्रिओ प्रजाती PET चे विघटन करतात असे आढळलेले आहे. तसेच कचऱ्यातील रबराचे विघटन करण्‍याची क्षमता अॅक्‍टीनोमायसेटिस, स्‍ट्रेप्‍टोमायसिस, नॉर्कार्डीया, अॅक्टिनोप्‍लेन्‍स ह्या जीवाणूंच्‍या प्रजातींमध्‍ये आढळते.

खाणीतून बाहेर पडणारेपदार्थ व आम्‍ल पर्जन्‍य यामध्‍ये सल्‍फ्यूरिक आम्‍ल असते, त्‍यामुळेपुतळे,पूल व इमारतींमधील धातूंचेक्षरण होते,हेतुम्‍हांला माहितीच आहे.अॅसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडन्‍स वअॅसिडीफिलीयम प्रजाती या जीवाणूंसाठी सल्‍फ्यूरिक आम्‍ल हा ऊर्जास्रोत आहे. म्‍हणून आम्‍लपर्जन्‍यामुळेहोणारेभू-प्रदूषण हे जीवाणूआटोक्‍यात आणतात.

अणुऊर्जा प्रकल्‍पातून पर्यावरणात सोडल्‍या जाणाऱ्या उत्‍सर्गात व विद्युत विलेपन प्रक्रियेच्‍या टाकाऊ पदार्थांत युरेनिअमचे जलविद्राव्‍य क्षार असतात. जिओबॅक्‍टर हे जीवाणू या युरेनिअम क्षारांचेअविद्राव्‍य क्षारांत रूपांतर करून जमिनीतील पाण्‍याच्‍या साठ्यांत मिसळणेरोखतात.

सूक्ष्‍मजीव व शेती

सूक्ष्‍मजैविक संरोप (Microbial Inoculants)

किण्‍वन प्रक्रियेनेकाही सूक्ष्‍मजीवयुक्‍त संरोप बनविले जातात. पेरणीआधी बियाण्‍यांतून या पोषक संरोपाची फवारणी केली जाते, तर काही संरोप वनस्पतींमध्ये सोडले जातात. संरोपातील सूक्ष्‍मजीव त्‍या वनस्‍पतींना पोषक द्रव्‍यांचा पुरवठा करून वाढीस मदत करतात, वनस्‍पतीजन्‍य अन्‍नाचा दर्जा वाढवतात. सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनेज, अझॅटोबॅक्‍टरयुक्‍त द्रव्‍ये वापरली जातात.

रासायनिक खतांमुळे होणारे भू-प्रदूषण या द्रव्‍यांमुळेरोखले जाते. शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यांमधून फ्लुरासिटामाईडसारखी रासायनिक द्रव्‍ये मातीत मिसळतात. ती इतर वनस्‍पती व गुरांसाठी घातक ठरतात, मानवासाठी त्‍वचारोगकारक ठरतात. ही मातीतील कीटकनाशकेसूक्ष्‍मजीवांमार्फत नष्‍ट करता येतात.

जैव कीटकनाशके (Bio insecticides)

जीवाणू व कवक यांपासून मिळवलेली व पिकांवरील कीड, कीटक, रोगजंतूंचा नाश करणारी द्रव्‍ये, जीवाणूंपासून मिळवलेली टॉक्झिन्‍स जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्‍पतींमध्‍येचअंतर्भूत केली जातात. कीटकांसाठी ही विषारी असल्‍यानेकीटक त्‍या वनस्‍पतींना खात नाहीत. जीवाणूंप्रमाणेच  कवके व विषाणूंच्‍या काही प्रजातींचा वापर जैव कीटकनाशकेम्‍हणूनहोतो. किण्‍वन प्रक्रियेत मिळणारे उप-त्‍पादन स्‍पायनोसॅड हे जैव कीटकनाशक आहे.