उपयुक्त सूक्ष्मजीव (Useful Micro-organisms)
लॅक्टोबॅसिलाय (Lactobacilli)
या जीवाणूंचे नावलॅक्टोबॅसिलाय आहे. यांचाआकार सूक्ष्म आयताकृतीअसतो.लॅक्टोबॅसिलाय हे विनॉक्सी जीवाणूआहेत म्हणजे ऑक्सिजन शिवायही ते ऊर्जानिर्मिती करू शकतात.
लॅक्टोबॅसिलाय जीवाणूदुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्येरूपांतर करतात. यामुळे दुधाचा सामू(pH) कमी होतो व दुधातील प्रथिनांचे क्लथन (Coagulation) होते. त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकांपासून वेगळी होतात. यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात. लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो. त्याचा सामूकमी असल्याने दुधातील इतर घातक जीवाणूंचा नाश होतो.
रायझोबिअम: सहजीवी जीवाणू (Rhizobium : Symbiotic Bacteria)
नंतर 70% इथाइल अल्कोहोलच्या द्रावणात 4-5 मिनिटे ठेवा. निर्जंतुक पाण्यानेस्वच्छ करून गाठीचेअतिशय पातळ काप करा. एक चांगला काप सॅफ्रॅनिनच्या द्रावणात 2-3 मिनिटे ठेवा. काचपट्टीवरकाप ठेवूनआच्छादक काच ठेवा व संयुक्त सूक्ष्मदर्शीने निरीक्षण करा. इथेगुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारे जीव रायझोबिअम जीवाणूआहेत.
हेजीवाणूपाहण्यासाठी आपल्याला कडधान्यांच्या मुळांवरील गाठी शोधाव्या लागल्या. त्या वनस्पतींना रायझोबिअमचा उपयोग होत असेल की अपाय?
रायझोबिअमची भूमिका व महत्त्व (Role and Importance of Rhizobium)
मुळांवरील गाठीत राहणारेरायझोबिया त्या रोपट्याला नायट्रेट्स, नायट्राईट्स तसेच अमिनो आम्ले पुरवतात व त्या बदल्यात रोपट्यांकडून कर्बोदकाच्या रूपात उर्जा मिळवतात. अशा प्रकारेपरस्परांना फायद्याचेठरणाऱ्या नात्याला सहजीवन म्हणतात.
रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगेबनवतात. पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबिन, घेवडा व इतर कडधान्ये अशा शिंबावर्गीय (शेंगा) वनस्पतींची ‘यजमान’ (Host) म्हणून गरज असते. रायझोबियांनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळेच डाळी, कडधान्ये प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतात.
कडधान्याचे पीक संपल्यानंतर त्याची मुळे व रोपट्याचे काही भाग मुद्दाम मातीत मिसळून जीवाणूंचे प्रमाण कायम राखले जाते. रायझोबिअममुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळले जातात. खतांसाठीचा खर्च कमी झाल्याने शेतकऱ्याला फायदा होतो.
किण्व (Yeast)
काही पेशींना छोटे गोलाकार भाग चिकटलेले दिसले असतील. या आहेत यीस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी. प्रजननाच्या या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन/ कलिकायन (Budding) म्हणतात. यीस्ट हा कार्बनीपदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे.
यीस्ट (किण्व) हे एकपेशीय कवक असून त्यांच्या सुमारे 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत. यीस्टची पेशी दृश्यकेंद्रकी प्रकारची असते.
वरील प्रयोगात साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थामुळे यीस्टची वाढ होते व प्रजनन जलद गतीने होते. स्वत:चे पोषण करताना यीस्टच्या पेशी द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साइड वायूमध्ये करतात. या प्रक्रियेला किण्वन (Fermentation) म्हणतात.
जैव उपचार (Bio-remediation)
पामतेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ, इतर काही औदयोगिक प्रक्रियांमध्येमुक्त होणारे जड धातू, क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका (Yarrowia lipolytica)हे किण्व वापरतात. तर सॅकरोमायसिस सेरेविसी हे किण्व अर्सेनिक हया प्रदूषकाचे शोषण करते. Alcanyvorax जीवाणूंचा वापर करून समुद्रातील तेलगळती स्वच्छ केली जाते.
प्रतिजैविके (Antibiotics)
सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणूव कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविकेहोत. विसाव्या शतकातील प्रतिजैविकांमुळे औषधोपचारांमध्ये क्रांती घडली. क्षयासारख्या रोगाचे तर आता काही देशांतून जवळ जवळ निर्मूलन झाले आहे.
प्रतिजैविकेमुख्यत: जीवाणूंविरुद्ध कार्य करतात. काही प्रतिजैविकेआदिजीवांना नष्ट करू शकतात.
काही प्रतिजैविकेअनेक प्रकारच्या जीवाणूंविरुदध उपयोगी ठरतात, अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके (Broad spectrum antibiotics) असे म्हणतात. उदा. ॲम्पीसिलीन, ॲमॉक्झीसीलीन, टेट्रासायक्लीन इत्यादी. रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा Broad spectrum antibiotics चा वापर केला जातो.
जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके (Narrow spectrum antibiotics) वापरली जातात. उदा . पेनिसिलीन, जेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन इत्यादी.
पेनिसिलीन (Penicillin)
पेनिसिलीन (Penicillin) पेनिसिलिअम या कवकापासून मिळणारा प्रतिजैवकांचा गट असून स्टॅफायलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिआ, स्ट्रेप्टोकोकाय प्रजातींच्या जीवाणूंपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यास त्याचा वापर होतो. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूंमुळे होणारे संसर्ग तसेच न्यूमोनिआ, स्कार्लेट फीवर (लोहितांग ज्वर) यांवर उपचार करण्यासाठी पेनिसिलीनयुक्त औषधे उपयुक्त आहेत.
उपद्रवी सूक्ष्मजीव (Harmful Micro-organisms)
कवके (Fungi)
हवेमध्येकवकांचे सूक्ष्म बीजाणूअसतात. ओलावा मिळाल्यास सुती कापड, गोणपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थांवर हे बीजाणूरुजतात. कवकाचे तंतू या पदार्थांत खोलवर शिरून स्वत:चे पोषण व प्रजनन करतात. या प्रक्रियेत तो मूळचा पदार्थ कमकुवत होतो म्हणूनच बुरशी आलेले कापड, गोणपाट, चामड्याच्या चपला- बूट, पाकिटे, पट्टे फार काळ टिकत नाहीत. तसेच लाकडी वस्तू खराब होतात.
लोणची, मुरांबे, जॅम, सॉस, चटण्या अशा ओलसर अन्नांतही कवकांच्या विविध प्रजाती वाढतात. या अन्नातील पोषणद्रव्येशोषून स्वत:ची वाढ व प्रजनन करतात. या प्रक्रियेत बुरशीकडून मायकोटॉक्झिन्स ही विषारी रसायने अन्नात मिसळली जाऊन ते अन्न विषारी होते. त्यामुळे बुरशी आलेले अन्न खाण्यास अयोग्य ठरते.
क्लॉस्ट्रीडिअम (Clostridium)
समारंभातील जेवणावळीमध्येकाही व्यक्तींना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होते. हे अन्न अचानक विषारी कसे बरे बनते?
शिजवलेले अन्न खराब करणारे हे जीवाणूम्हणजेच क्लॉस्ट्रीडिअम. या जीवाणूंच्या सुमारे 100 प्रजातीतील काही स्वतंत्रपणे मातीत जगतात तर काही मानव व इतर प्राण्यांच्या अन्नमार्गात आढळतात.हे जीवाणूदंडाच्या आकाराचे असून प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू(Endospores) तयार करतात. या जीवाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत कारण ते विनॉक्सी परिस्थितीत वाढतात.
इतर रोगकारक सूक्ष्मजीव (Other Harmful Micro- organisms)
आपल्याला फक्त क्लॉस्ट्रीडिअममुळेच काही आजार होतात का?
इतर अनेक प्रजातींचे जीवाणू, विषाणू,आदिजीव व कवक हे सूक्ष्मजीवही अनेक मानवी रोगांसाठी कारणीभूत आहेत. जीवाणूपेक्षाही आकाराने लहान असणाऱ्या व फक्त सजीव पेशीतच वाढ व प्रजनन करणाऱ्या विषाणूंबद्दल तुम्हाला माहिती आहे. आता पाहूया ते आपल्याला त्रासदायक कसे ठरतात.