8. प्रदूषण

प्रदूषण (Pollution) ः नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय.

प्रदूषके (Pollutants) परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या, अजैविक व जैविक घटकांवर (वनस्पती, प्राणी आणि मानवावर)घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते. प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्गनियमानुसार कालांतराने नष्ट होतात, याउलट मानवनिर्मित प्रदुषके नष्ट होत नाहीत.

अ. हवा प्रदूषण (Air pollution)

हवा प्रदूषणाची कारण

हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम

ओझोन थराचा ऱ्हास/नाश ः आपण पूर्वी अभ्यासले आहे की, वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून (UV-B) ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. परंतु आता या ओझोन थराला खालील कारणांमुळे धोका निर्माण झाला आहे.

हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ ः CO 2 वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. मागील शंभर वर्षांमध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणामधील CO 2 चे प्रमाण वाढले आहे. या CO 2 चा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच ‘हरितगृह परिणाम’ होय. CO 2 प्रमाणे नायट्रस ऑक्साइड, मिथेन वायू व CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. एकत्रितपणे त्यांना ‘हरितगृह वायू’ असे म्हटले जाते.

वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत चालले आहे. यामुळे हवामानात बदल घडून त्यामुळे पिकांचे उत्पादन, वन्यजीवांचे वितरण ह्यात बिघाड तसेच हिमनग व हिमनद्या वितळून समुद्रपातळीमध्ये वाढ दिसून येत आहे.

आम्लवर्षा (Acid Rain ) ः कोळसा, लाकूड, खनिज तेले यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फुरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रीक आम्ल तयार होते. ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्येमिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात.

 आम्लवर्षेचे परिणाम

  1. आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते. यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्‍थेवर विपरित परिणाम होतो.
  2. इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते.
  3. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमिअम आणि मर्क्युरीसारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्नसाखळीत शिरतात.
  4. जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टीकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.

हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय

  1. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात, हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा. उदा. निरोधक यंत्रणा (Arresters), गाळणीयंत्र (Filters) यांचा वापर करावा.
  2. शहरातील दुर्गंध पसरविणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी.
  3. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रेयांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे.
  4. CFC निर्मितीवर बंदी/बंधने आणावीत.

आ. जल प्रदूषण (Water Pollution)

नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ, विषारी होते, जेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो, साथीच्या रोगांचा फैलाव होतो. तेव्हा जलप्रदूषण झाले असे म्हणतात. गोड्या किंवा समुद्राच्या पाण्यामधील प्रदूषणामध्ये भौतिक, रासायनिक व जैविक बदलांचा समावेश होतो.

जलप्रदूषके (Water Pollutants)

अ. जैविक जलप्रदूषके ः शैवाल, जिवाणू, विषाणू व परजीवी सजीव यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही या जैविक अशुद्धीमुळे रोग पसरतात.

ब. असेंद्रिय जलप्रदूषके ः बारीक वाळू, धुलिकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमिअम, शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचे अंश.

क. सेंद्रिय जलप्रदूषके ः तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातील उत्सर्जके.

इ. मृदा प्रदूषण (Soil Pollution)

पृथ्वीवरील जमिनीने व्यापलेल्या एकूण भागांपैकी काही भाग बर्फाच्छादित आहे, काही भाग वाळवंटी तर काही भाग पर्वत व डोंगररांगानी व्यापलेला आहे. मानवी वापराला उपयुक्त जमीन खूप कमी आहे. मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरीत्या व मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात, त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते. तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात.

मृदा प्रदूषणाचे परिणाम

  1. कारखान्यातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी, मातीत मिसळल्याने माती नापीक बनते.
  2. किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमधून पिके, पाणी व मानव अशा अन्नसाखळीतून प्रवास करतात.
  3. मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतो. कारण विषारी द्रव्ये मृदेमधून जवळच्या पाणीसाठ्यात किंवा पाझरून भूगर्भजलात प्रवेश करतात, तसेच जीवजंतूमुळे विविध रोगांचा प्रसार होतो.

मृदा प्रदूषणाचा हवा तसेच जल प्रदूषण यांच्याशी असणारा संबंध

ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर न करता चुकीच्या पद्‍धतीने तो फेकून दिल्यास तो तेथे सडतो, कुजतो, त्यामध्ये हानिकारक रोगजंतूंची वाढ होते व हे वाहत्या पाण्यात मिसळले जाऊन पाणी प्रदूषण होते. शेतीसाठी कीटकनाशकांचा, रासायनिक खतांचा, तणनाशकांचा वापर केला जातो, त्यामुळे मृदा प्रदूषण होते. कीटकनाशक व तणनाशकांचा जास्त प्रमाणात केलेल्या त्या फवारणीमुळे ती रसायने हवेत मिसळतात व हवा प्रदूषण होते तसेच रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास ही रसायने पाण्यात मिसळतात व पाणी प्रदूषण होते. मानवी मलमूत्र, पशु, पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होते. ही घाण तेथे तशीच राहिल्यास त्यातून वेगवेगळे वायू बाहेर पडतात व दुर्गंधी सुटते, हे वायू हवेत मिसळतात व हवा प्रदूषण होते. हीच घाण पाण्यात मिसळल्यास पाणी प्रदूषण होते.

प्रदूषण – प्रतिबंध व नियंत्रण ः प्रदूषण नियंत्रण, नियमन व ते रोखण्यासाठी भारत सरकारने काही कायदे केले आहेत, प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायदे पुढीलप्रमाणे आहे.

  1. जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974
  2. हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981
  3. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986

जैव वैद्यकीय कचरा, धोकादायक उत्सर्ग, घनकचरा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण या सर्वांबाबत विविध कायदे व नियम अस्तित्वात आहे. कारखाने, औद्यागिक वसाहती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती इत्यादी संस्थांद्वारे वरील प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायदे यांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ या शासकीय संस्थांद्वारे केले जाते.