9. पर्यावरणीय व्यवस्थापन

हवामान (Weather)

एखाद्या ठिकाणी ठरावीक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असेम्हणतात. वातावरणाची ही स्थितीहवामानाच्या विविध घटकांवर अवलंबून असते.हवामानाची स्थिती ठरवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. (आकृती 9.1)

आपण बरेचदा ‘आज खूप गारठा आहे, आज खूप गरम वाटतेआहे.’ अशा वाक्यांमधून आपल्या ठिकाणीअसलेल्या हवामानाविषयी आपलेमत व्यक्त करत असतो.

हवामान हेहवेच्या त्या वेळच्या स्थितीवर अवलंबून असते. एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचेवर्षांनुवर्षे निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीतील काढलेली सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात.

हवामानातील बदल (Change in Weather)

हवामान हेसतत बदलत नाही. तेएका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते. यावरून असेलक्षात येतेकी हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो, तर हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो. हवेत अल्पकाळ बदल होतात, तर हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो.

हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा तसेच विविध व्यवसाय यांवर हवामानाचा परिणाम होतो. भारतासारख्या शेतीप्रधान देशांसाठी तर हवामानाचेमहत्त्व अनन्यसाधारण आहे. विमानांसाठी धावपट्ट्या बनवणे, बंदरनिर्मिती, मोठेपूल उभारणेआणि अतिउंच इमारती बांधणेआदी योजनांमध्ये हवामानाच्या विविध घटकांचा जसेवाऱ्याची दिशा व गती, तापमान व हवेचा दाब इत्यादी बाबींचा विचार केला जातो.

एखाद्या ठिकाणचे हवामान ठरवित असताना पूर्वी अभ्यासलेल्या हवामानाच्या विविध अंगांचा अभ्यास करावा लागतो. त्यांचे निरीक्षण करूननोंद ठेवण्यासाठी जगातील बहुतेक देशांनीहवामान खाते स्थापन केले आहे. यांना वेधशाळा असे म्हणतात. या वेधशाळा आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणांनी सुसज्ज आहेत.

वर्तमानकालीनहवामानाच्या स्थितीचे गतकालीनहवामानाच्या संदर्भात विश्लेषण केल्यास भविष्यकालीन बदलांचा अंदाज करता येतो. पण हवामान म्हणजे वातावरणाच्या विविध घटकांचे संमिश्र स्वरूप असल्याने त्याबाबत अंदाज करणे फारच गुंतागुंतीचे असते. एखाद्या ठिकाणचे हवामान सावकाश व मर्यादित स्वरूपात बदलत असेल तर तेथील बदलांचा अंदाज करणे सोपे असते. पण ज्या ठिकाणी हवामानात होणारे बदल गुंतागुंतीचे व परस्परावलंबी असतील आणि ते शीघ्रगतीने घडत असतील तर त्यांच्यातील बदलांचा अंदाज करणे कठीण असते.

हवामानशास्त्र (Meteorology)

हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय.

यात हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो.

भारतीय हवामान खाते (Indian Meteorology Department )

भारतीय हवामान खात्याची स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी सिमला येथे केली. त्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. मुंबई, कोलकता, चेन्नई, नागपूर व दिल्ली येथे याची प्रादेशिक कार्यालये आहेत. दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे तयारकेले जातात. 24 तासात 2 वेळाअसे नकाशे तयारकरून प्रसिद्धकेले जातात. येथे हवामानासाठी लागणारीउपकरणे, रडारच्या सहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंपमापनाशी निगडित हवामानाचे अंदाज, पर्जन्य संदर्भातील अंदाजासाठी उपग्रहाच्या मदतीने हवामानाचे अंदाज, हवा प्रदूषण इत्यादी विषयावर सातत्याने संशाेधन चालूअसते.

भारतीय हवामान खात्यातर्फे विमान उड्डाण खाते, नौकानयन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रात तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांचा समावेश होतो. धुळीची वादळे, वाळूची वादळे, मुसळधार पाऊस, उष्णतेची आणि थंडीची लाट, त्सुनामीइत्यादी संकटांचीपूर्वसूचना विविधखात्यांबरोबरच सर्व प्रसिद्धी माध्यमे व नागरिकांपर्यंत पोहचवली जाते. यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे अनेक उपग्रह भारताने अवकाशात सोडले आहेत. यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीचे पृथक्करण वा विश्लेषण करण्यासाठी भारतात अनेक ठिकाणच्या वेधशाळा उत्तम दर्जाचे काम करत आहेत. (www.imdpune.gov.in)

मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज (Monsoon Model and Climate Prediction)

भारतातील मान्सूनसंबंधीहंगामातील अंदाज वर्तवण्याचीपरंपरा शंभर वर्षांपेक्षा जुनी आहे. सन 1877 मध्येपडलेल्या दुष्काळानंतर IMD चे संस्थापक एच. एफ. ब्लेनफोर्ड यांनी 1884 मध्ये हिमालयातील बर्फवृष्टी हा घटक गृहीत धरून सर्वप्रथम असा अंदाज वर्तवला होता. 1930 च्या दशकात IMD चे तत्कालीन संचालक सर गिल्बर्ट वॉकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक व येथील मान्सूनचा संबंध अधोरेखित करून त्यांच्या उपलब्ध निरीक्षणांच्या आणि पूर्वीच्या नोंदींच्या आधारे येणारा मान्सून कसा असेल याचे गृहीतक मांडले. 1990 च्या दशकात डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप वापरले जात होते.

सध्या IITM तर्फेनवीन प्रारूपे तयार केली जात आहेत. सध्याची प्रारूपे अधिक उपयुक्त बनवणे, काही नवीन प्रारूपे आणि तंत्रज्ञान विकसित करणे अशा दोन्ही स्तरांवर काम सुरू आहे. यासाठी रडार यंत्रणा, उपग्रह तंत्रज्ञान यांच्या विकासावरही भर दिला जात आहे.

घनकचरा व्यवस्थापन : काळाची गरज (Solid Waste Management )

मानवाच्या रोजच्या विविध कृतींतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांना घनकचरा म्हणतात. जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. सध्या संपूर्ण जगासमोर घनकचराही मोठी समस्या निर्माण झाली असून यामुळेपाणी व जमीन दोन्ही प्रदूषित होत आहेत. घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या यादृष्टीनेमोठी गंभीर बाब आहे. त्यामुळेहवा, पाणी व जमीन प्रदूषण होऊन निसर्ग तसेच मानवी अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.

दैनंदिन जीवनात आपण अनेक पदार्थांचा, वस्तूंचा वापर करत असतो. आपल्या वापरात आलेल्या या पदार्थांचे, वस्तूंचेस्वरूप वेगवेगळेअसते. त्यातील काही टाकाऊ असतात तर काही पुनर्वापर करण्यायोग्य असतात. परंतु त्यांचा योग्य विनिमय केला गेला नाही तर त्याचे विपरित परिणाम पर्यावरणावर होतात.

विघटनशील कचरा (Biodegradable waste) : या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते. यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाकघरातील कचरा, खराब अन्न, फळे, भाज्या, माती, राख, शेण, झाडांचे भाग इत्यादींचा समावेश हाेतो.हा कचरा मुख्यत: सेंद्रीय प्रकारचा असून यालाच आपण ओला घन कचरा म्हणतो. याचे काळजीपूर्वक विघटन केले तर आपणास त्यापासूनउत्तम प्रकारचे खत व इंधन मिळते. अनेक शहरांत अशा प्रकारचे जैवइंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.

अविघटनशील कचरा (Non-biodegradable waste) : या प्रकारच्या कचऱ्याचे सहजरित्या विघटन होत नाही, कारण यांच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो शिवाय विविध तंत्रांचाही वापर करावा लागतो. यामध्येप्लॅस्टिक, धातूवा यांसारख्या इतर पदार्थांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या कचऱ्याला सुका घनकचरा असे म्हणतात.

घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता

  1. पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी व परिसर स्वच्छतेसाठी
  2. ऊर्जानिर्मिती तसेच खतनिर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती/कामाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी
  3. घनकचरा प्रक्रियेद्वारा नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी
  4. आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी

शहरी व औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारा घनकचरा, त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी व पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठीउत्पादन प्रक्रिया जास्त कार्यक्षम बनवून कचरा कमी कसा तयार होईल हे पाहणे, पुनर्वापराने कचरा निर्मिती कमी करणे व कचऱ्यापासून पुन्हा वस्तू तयार करणे. अशांचा अवलंब करावा लागेल.

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)

आपल्या सभोवताली वीज पडणे, महापूर येणे, आग लागणेअशा नैसर्गिक, तर अपघात घडणे, बॉम्बस्फ़ोट, कारखान्यातील रासायनिक दुर्घटना, यात्रा व गर्दीच्या ठिकाणी होणारी चेंगराचेंगरी, दंगली अशा मानवनिर्मित आपत्ती घडत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित तसेच आर्थिक हानी होते.

आपत्‍तीमध्‍ये जखमी झालेल्‍या आपद्ग्रस्‍तांना प्रथमोपचार

प्रथमोपचाराचा प्रमुख उद्देश जीवहानी टाळणे, प्रकृती खराब होत जाण्‍यापासून रोखणेआणि पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणेहा असतो. त्यामुळेप्रथमोपचार किंवा तातडीनेकरायच्या उपाययोजना कोणत्या आहेत हेजाणून घेणेमहत्त्वाचेआहे.

प्रथमोपचाराची मूलतत्त्वे : सुचेतनता आणि पुनरुज्‍जीवन (Life and Resucitation)

  1. श्‍वसनमार्ग (Airway) : आपद्ग्रस्‍ताला श्‍वास घ्‍यायला अडचण होत असेल तर डोकेउतरतेकरावे किंवा हनुवटीला वर उचलावे त्‍यामुळे श्‍वासनलिका खुली राहते.
  2. श्‍वासोच्‍छवास (Breathing) : जर श्‍वासोच्‍छवास बंद झाला असेल तर आपद्ग्रस्‍ताच्‍या तोंडातून कृत्रिम श्‍वासोच्‍छवास द्यावा.
  3. रक्ताभिसरण (Circulation) : जर आपद्ग्रस्‍त बेशुद्ध अवस्‍थेत असेल तर त्‍या व्‍यक्‍तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्‍वासोच्‍छवास द्यावा व नंतर छातीवर दोन तळव्‍यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देवून सोडणेही प्रक्रिया सुमारे15 वेळेस करावी. याला CPR (Cardio – Pulmonary Resuscitation) म्‍हणतात. आपद्ग्रस्‍त व्‍यक्‍तीचे रक्‍ताभिसरण परत सुरळीतपणे चालूहोण्‍यास मदत होते.

आपत्तीकाळातील इतर साधने: महापूरामध्येपाण्यातून लोकांना सुरक्षित बाहेर येण्यासाठी प्रशासनामार्फत बोटींचा वापर केला जातो. तातडीची मदत म्हणून लाकडी फळ्या, बांबूचा तराफा तसेच हवा भरलेली टायरची ट्यूब वापरणे फायद्याचे ठरते.